आधार कार्ड

माझे आधारकार्ड हरवले आहे, ते मला परत मिळवायचे आहे ते कसं मिळेल, माझ्याकडे आधारनंबर व मोबाईल नंबर नाही?

1 उत्तर
1 answers

माझे आधारकार्ड हरवले आहे, ते मला परत मिळवायचे आहे ते कसं मिळेल, माझ्याकडे आधारनंबर व मोबाईल नंबर नाही?

1


Aadhaar Card हरवला असेल तर या सोप्या पद्धतीने पुन्हा मिळवा नवीन कार्ड



भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. यात नाव, पत्ता आणि इतर माहितीसह बॉयोमेट्रिक माहिती देखील असते. पण जर आपलं Aadhaar Card हरवले असेल आणि आपला मोबाईल नंबर देखील त्याशी जुळलेला नसेल किंवा नंबर बदलून गेला असेल तर uidai च्या वेबसाइटवर 'ऑर्डर आधार रीप्रिंट' सेवेचा लाभ उचलू शकता. आधार रीप्रिंट करण्यासाठी आपल्याला 50 रुपये भुगतान करावं लागेल.
 
या प्रक्रियेद्वारे इंडिया पोस्ट द्वारे आधार कार्ड आपण नोंदवलेल्या पत्त्यावर पोहचून जाईल. जाणून घ्या प्रक्रिया...
 
- प्रक्रिया दरम्यान आपल्याला ओटीपी प्राप्त होईल पण अशात रजिस्टर नंबर नसल्यास हरकत नाही.


- आधार रीप्रिंट करवण्यासाठी आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर विजिट करावं लागेल.
- अधिकृत वेबसाइटवर आपल्याला Get Aadhaar सेक्शनमध्ये दिसत असलेल्या ऑर्डर आधार रीप्रिंट (Order Aadhaar Reprint (Pilot Basis) पर्याय दिसेल ज्यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आधार नंबर, सिक्योरिटी कोड आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचे आहे. येथे आपल्याला 2 पर्याय दिसतील. जर आपल्याकडे रजिस्टर मोबाइल नंबर नाही तर Do Not Have Registered Mobile Number वर टिक करून आपण रजिस्टर करू इच्छित असलेला नंबर टाकू शकता ज्यावर ओटीपी पाठवण्यात येईल.
- सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबरवर आलेल्या ओटीपीला स्क्रीनच्या उजवीकडे दिसत असलेल्या OTP बॉक्समध्ये टाकावे लागणार.
 
OTP नोंद झाल्यावर Aadhaar Card प्रीव्यू शो करेल. प्रीव्यूमध्ये नाव, जन्म तारीख आणि पत्ता या सारखी माहिती दिसेल. जर आपण रजिस्टर मोबाइल नंबरने लॉग-इन केलेले नाही तर OTP टाकल्यावर आपल्याला आधार कार्ड प्रीव्यू शो दिसणार नाही.
 
- यानंतर आपल्याला मेक पेमेंट (Make Payment) वर क्लिक करायचे आहे ज्यासाठी 50 रुपए शुल्क लागेल. आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआई (UPI) यातून कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता.
- भुगतान केल्यावर आधार कार्ड आपल्या पत्त्यावर पोहचून जाईल.

उत्तर लिहिले · 25/4/2022
कर्म · 48555

Related Questions

माझ्या मित्राला आधार कार्ड काढायचे आहे पण कोणतेही कागदपत्रे नाही काय करावे?
आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा?
वाक्याचे गुण उदारणासह कसे स्पष्ट कराल?
मतदान कार्ड(मतदार ओळखपत्र)आधार कार्ड शी लिंक कसे करावे?
आधार कार्ड चा वापर करून पैसे काढण्यासाठी कोणता अँप वापरावा?
माझ्या माझ्या लग्नाच्या नंतर बायकोचे आधार कार्ड नव्हते तर आता काढायचे असेल तर काय करावे लागेल?
माझे आधार कार्ड हरवले?