1 उत्तर
1
answers
मानवी पुरुष जननसंस्था कशी काम करते?
2
Answer link
. मानवी
पुरुष प्रजनन संस्था
शुक्राणू तयार करणे, त्यांचे पोषण करून त्यांना कार्यक्षम राखणे, योग्य त्या वेळी त्यांचे वहन करणे आणि समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे यासाठी पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
पुरुष प्रजननसंस्था - अंतर्गत व बाह्य पुरुष जननेंद्रिये - समोरून
पुरुष प्रजननसंस्था - अंतर्गत व बाह्य पुरुष जननेंद्रिये - बाजूने
अवयवांची रचना व कार्य
पुरुष प्रजननसंस्थेमध्ये[३] काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश पुरुष प्रजननसंस्थेत होतो.
अंतर्गत पुरुष जननेंद्रिये
वृषण
(वृषणे बाहेरून दिसत असली तरी वृषणाची निर्मिती आणि विकास उदरपोकळीत होत असल्याने त्यांचे वर्णन इथे केले आहे.) मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून आद्यशुक्रजंतू तयार होतात. शुक्रजंतूंच्या पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव ’सर्टोली’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन () या संप्रेरकाची निर्मिती करतात. याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी प्रजननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी अंतःस्रावी ग्रंथी असे दुहेरी कार्य वृषण करते.
अधिवृषण: वृषणाच्या मागील व वरील बाजूस अधिवृषण असते. ही घट्ट गुंडाळी केलेली लांब नलिका असते. वृषणाच्या मागच्या भागातून बाहेर पडणार्या नलिकांतून शुक्रजंतू अधिवृषणात प्रवेश करतात. येथे शुक्रजंतूंचा पुढील विकास होतो व ते रेतोवाहिनीत प्रवेशतात.
रेतोवाहिनी
अधिवृषणाच्या खालच्या टोकपासून ही नलिका सुरू होते. रेताशय व अष्ठीला ग्रंथीतून पुढे गेल्यावर तिचे स्खलनवाहिनीत रूपांतर होते. अधिवृषणामधील शुक्राणू पुढे सरकून रेतोवाहिनीमध्ये साठून राहतात.
रेताशय
मूत्राशयाच्या खाली, दोन्ही रेतोवाहिन्यांच्या शेजारी दोन रेताशय असतात. वीर्याचा 70 ते 85 % भाग रेताशयातील स्रावांचा असतो. त्यामधे प्रथिने काही उत्प्रेरके, श्लेश्म इत्यादीबरोबर क जीवनसत्व आणि फ्रक्टोज शर्करा असते. फ्रक्टोज शुक्रजंतूंना ऊर्जा पुरवते.
स्खलन वाहिनी: रेताशयातून निघणारी वाहिनी त्या बाजूच्या रेतोवाहिनीला मिळून स्खलन वाहिनी बनते. दोन्ही बाजूच्या स्खलन वाहिन्या अष्ठीला ग्रंथीत शिरून तिच्यातून जाणार्या मूत्रवाहिनीला मिळतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिन्यांतून वीर्य मूत्रनलिकेत व तिथून शिश्नावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये सोडले जाते.
अष्ठीला ग्रंथी
वीर्याचा 20 ते 30 % भाग अष्ठीला ग्रंथीमधील स्त्रावांचा असतो. त्यात प्रथिने, उत्प्रेरके, शर्करा व इतर पदार्थांबरोबर झिंकही असते. हा स्राव आणि रेताशयातील स्राव शुक्रजंतूंबरोबर मिसळून वीर्य तयार होते. अष्ठीला ग्रंथीमध्ये फायब्रिनोजेन हे गोठण द्रव्यही असते.
मूत्रनलिका: उत्सर्जन-प्रजनन संस्थेतील ही अंतिम नलिका आहे. वीर्य व मूत्र उत्सर्जनाचा हा समाईक मार्ग आहे.
कंदमूत्रमार्ग ग्रंथी ( (काउपर ग्रंथी - ): ह्या दोन ग्रंथी शिश्नाच्या मुळाशी, मूत्रमार्गाच्या पाठीमागे दोन बाजूंना असतात. यांतील स्राव बुळबुळीत व श्लेष्मल असतो. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी हा स्राव दोन नलिकांवाटे मूत्रमार्गात टाकला जातो. त्यामुळे संभोग सुलभ होतो. याच प्रकारच्या व हेच कार्य करणार्या ग्रंथी स्त्रीमधेही आढळतात (बार्थोलिन ग्रंथी)
अंतःस्रावी ग्रंथी संपादन करा
अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या अनेक संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे -१२च्या सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून ( पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - ) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाला चालना मिळते आणि शुक्रजंतू निर्मितीसाठी आवश्यक विशिष्ट प्रथिननिर्मिती करण्यासाठी 'सर्टोली' पेशीं उत्तेजित होतात. तसेच पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील 'लायडिग' पेशींमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियांची वाढ होते आणि ती कार्यान्वित होऊन पुरुषाचा लैंगिक विकास पूर्ण होतो.
याशिवाय लैंगिक अवयव व मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीचेही सहाय्य होते.
बाह्य पुरुष जननेंद्रिये
पुरुष प्रजजन संस्थेमधील बाहेरून दिसणारी प्रमुख इंद्रिये म्हणजे शिस्न, वृषणकोश आणि वृषण. त्यांपैकी वृषणाची माहिती 'अंतर्गत पुरुष जननेंद्रिये' येथे दिली आहे.
शिश्न
हे संभोगाचेपुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा कॅवर्नोझा पुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा कॅवर्नोझा ...
लिग उत्थानक्षम पुरुष इंद्रिय आहे. ओटीपोटाच्या खाली चिकटलेले मूळ, दंडगोलाकृती मध्यभाग आणि टोकाशी शिस्नमणी असे शिश्नाचे तीन भाग असतात. शिश्नाच्या दंडगोलाकृती भागामध्ये स्पंजासारख्या सच्छिद्र उतीच्या बनलेल्या तीन दंडगोलाकृती कांडया असतात. त्यांपैकी खालच्या कांडीतून मूत्रनलिका जाते व शिश्नमण्याच्या टोकावर उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य यांचे वहन होते. सच्छिद्र उतीच्या दंडगोलाकृती कांडया उत्थानक्षम असतात. संभोगाचे वेळी त्यांच्यात रक्त साठून त्यांचे आकारमान वाढते व त्या ताठ होतात. त्यामुळे शिश्न ताठ व योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होते. संभोगाचे वेळी शिश्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित केले जाते. शिश्नावर सैल त्वचावरण असते व ते शिश्नमण्यावर दुहेरी घडीच्या स्वरूपात पसरलेले असते. ही त्वचेची घडी व शिश्नावरील त्वचा सैल असल्याने शिश्नाचा आकार मोठा झाला तरी ती शिश्नास सामावून घेते.
वृषणकोश
शिश्नाच्या खालील बाजूस असलेली त्वचा व स्नायूंची सैल पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणांचे संरक्षण करणे व त्यांचे तापमान नियंत्रित करणे ही कामे वृषणकोश करतो. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्नायूमुळे (क्रेमास्टर स्नायू - वृषणकोश सैल किंवा आकसलेले राहण्यास मदत होते. थंडीमध्ये वृषणकोश आकसून वृषणे शरीराजवळ उबदार ठेवली जातात तर उन्हाळ्यात ती शरीरापासून थोडी दूर लोंबती ठेवल्यामुळे थंड राहतात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.