1 उत्तर
1
answers
कोकणात जागेचा ब्राम्हण माहिती मिळेल का?
5
Answer link
स्थळ ब्राम्हण देवता
कोकण भूमी ही इतर भूमी पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे बाकीचा क्षेत्रा पेक्षा या ठिकाणी काही गोष्टी वेगळ्या आहेत. कोकणातील प्रत्येक भाग विशिष्ट ठेवणी ने बनलेला आहे आणि त्याचे पालन करणारेच या कोकणात टिकतात. काही वेळा याच काही गोष्टींना आपण कोकणी भुते म्हणून हिणवतो. पण त्याची जाण बाहेरील लोकांना नाही आहे . त्याच बरोबर कोकणातील अलीकडच्या पिढीना देखील नाही आहे. परशुरामांनी पृथ्वी जेव्हा नि:क्षत्रिय करून( माजलेल्या क्षत्रियांना मारून) कश्यप ऋषींना दान केली. तेव्हा कश्यप ऋषिंनी दान केलेल्या वस्तू चा स्वतःला उपभोग घेता येत नाही याची जाणीव श्री परशुरामांना करून दिली. तेव्हा परशुरामांनीआपल्या वास्तव्या साठी समुद्र मागे हटवून या कोकण भूमी ची निर्मिती केली. त्यामुळे या प्रदेश ची जडणघडण वेगळी आहे. प्रत्येक गावात रहाठी आणि विशिष्ट तत्वनी प्रत्येक गावातील भागांची रचना केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी महापुरुष ,ब्राम्हण, त्याचे रक्षक यांचा अधिकारात ही भूमी आहे. त्या भागात राहणाऱ्या लोकांच रक्षण, राखण रखवाली आणि धन द्रव्य देण्याचे काम हे स्थळातील ब्राम्हण देव करत असतो. प्रत्येक दीड ते दोन किमी परिसरात स्वतंत्र असा ब्राम्हण असू शकतो. भूमी मालक तो ब्राम्हण असल्याने त्याचा मर्जी ने कुळ त्या स्थळात राहत असते. त्यामुळे कुळ जेवढे पाठीशी उभे तेवढेच हा स्थळातील ब्राम्हण राजी असणे आवश्यक असते. कारण हा ब्राम्हण गाव देवी चा हुकुमात असतो ज्या स्थळात राहतो त्या ठिकाणी सुख समृद्धी द्यायचे काम हे या ब्राम्हण देवा चे असते. गाव देवी ला जेव्हा कौल लावले जातात तेव्हा हा स्थळातील ब्राम्हण राजी असेल तर कौल नीट होतात . मी पाहिलेल्या जास्तीत जास्त कोकणातील लोकांना त्रास चे मुख्य कारण माहीत नसते. जास्तीत जास्त लोकांना त्रास हा या स्थळातील ब्राम्हण चे चालीरीती न केल्याने होत असतो. त्याचा वार्षिक मानपान त्याचा रक्षक चा लोपाचार या गोष्टी नीट झाल्यावर त्या राहत्या स्थळांमध्ये वर्षभर राखण आणि धन द्रव्य द्यायचं काम हा क्षेत्रातील ब्राम्हण मार्फत होत असते.
काही लोकांना स्थळातील ब्राम्हण म्हणजे काय हे माहीत नसते किंवा आपल्या आजूबाजूला त्याच स्थान कोठे आहे याची जाण नसते. किंवा माहिती असून त्याचे वार्षिक देणे काय याची माहिती असून कित्येक वर्षे त्याची आठवण केलेली नसते. प्रत्येक क्षेत्रा प्रमाणे त्याची चालरीत केली जाते. ब्राम्हण देवते साठी मुख्यतः ब्राम्हण द्वारे एकादशमी करून ब्राम्हण भोजन केले जाते. हे शक्य नसल्यास त्याचा नावाने शिदा मान्य करून ब्राम्हण ला दान केले जाते. किंवा गोडा नैवेद्य ब्राम्हण देवतेला दाखवला जातो. कधीही चांगले कार्य घरी असेल तेव्हा या देवतेची आठवण केली जाते. किंवा चांगले कार्य करते वेळी गाव देवी सोबत या स्थळतील ब्राम्हण देवतेची आठवण काढल्या शिवाय पुढे जाऊ नये.
एक लक्षात घ्या कोकण भूमी ही या ब्राम्हण ची, महापुरुष ची भूमी आहे. सत्पुरुष ने या गावराठी ची तत्व जोडून हे महापुरुष त्या ठिकाणी बसवलेले आहेत. (कोण काय कुठे? हे प्रश्न मी या गोष्टी गुप्त असल्यामुळे फोड करत नाही) आणि स्वतः लुप्त अवस्थेत आहेत. नाथांनी ही पाषाण मध्ये संजीवनी देऊन ती कौल मार्फत बोलती केलेली आहेत आणि हे ब्राम्हण या सगळ्यांच्या सांभाळ करत आहेत. जरी गावरहाटी 12 /5 तील पूर्वज सांभाळत असले तरी हे शाबूत ठेवायच काम हे ब्राम्हण किंवा महापुरुष करत असतात. या भूमी चा मूळ मालक जो गौडा किंवा परबु होता त्यांचा वंश खंड झालेला आहे. आता सध्या जी कुळे या जमिनी चा उपभोग घेत आहेत ते राजसत्ते प्रमाणे बाहेरून आलेली कुळे आहेत म्हणून या कोकण भूमी ला निर्वाशीक भूमी बोलले जाते. आपला या भूमी वर पूर्ण अधिकार नाही . आपली कुळे आहेत ती त्याचा भूमी चा उपभोग घेत आहेत. त्यामुळे आपल्या कुळांना देखील या स्थळातील देवतेचा विचार घ्यावा लागतो. तंत्र मंत्र करणारे देखील आपले कुळ बंधनात ठेवण्या अगोदर या स्थळातील ब्राम्हण देवतेला बंधन करतात. जे लोक खोट आणतात ते लोक पण खोट्या गोष्टी आणताना पाहिले स्थळातील ब्राम्हण देवतेला बंधन ठेवतात किंवा भ्रष्टाचार करतात. आपल्याला जे स्वप्न दृष्टांत होतात ते होण्यामागे पण या स्थळातील ब्राम्हण देवतेची कृपा असते. वड, पिंपळ, औदुंबर, वारूळ अशा ठिकाणी यांचं वास्तव्य असते. त्याचा जवळ च त्याचा देवचार व रक्षक चाळा असतो. कोकणात मिरग लागला की या देवचार रक्षक चे लोपाचार करून (वाडवळ) राखण देणे झाले की या या ब्राम्हण चे ठिकाण स्वच्छ करून ब्राम्हण द्वारे ब्राम्हण भोजन केले जाते. कुळदेवता ,ग्रामदेवता, स्थळदेवता, वस पितर्गत देवता या सामील असतील तर कोणत्याही कामात अडथळा येत नाही. ब्राम्हण देवता जर रुष्ट असेल तर त्या स्थळांमध्ये असणाऱ्या देवतांच काहीही चालत नाही. मुळपुरुष देवता कारणाशिवाय मध्ये हस्तक्षेप करत नाही. ब्राम्हण देवता त्या स्थळात उभे करत असणाऱ्या अवसार किंवा संचार सुद्धा रोखू अथवा मोकळा करू शकतो कारण ज्या ठिकाणी आपली वास्तू असते त्या जागेचा मुळ मालक च तो असतो. या ब्राम्हण देवते च्या कोपा मुळे आपली होणारी कामे देखील रखडू शकतात. पैशाआकड्या संबंधी ची देवता ही ब्राम्हण देवता त्यामुळे त्या जागेत यश अपयश देणे हे देखील ब्राम्हण देवते चे कार्य असते. ज्या ज्या स्थळात मुलपुरुषाने आपली पिलगी वसवलेली आहे त्या ठिकाणी त्याची जबाबदारी ही या ब्राम्हण देवते जवळ दिलेली असते. या स्थळातील देवते चा माध्यमातून तळखांब म्हणजे वस पितर्गत कार्य करत असते.
मुळपुरुष देवता
( सर्व माहिती कुठल्याही पुस्तकांतून घेतलेली नाही. कोकणातील संस्कृती विषयी चालत असताना अनुभवातून आणि जुन्या जाणत्या च्या मार्गदर्शन मधून मिळवलेली आहे. या मध्ये मतमतांतरे असू शकतात. कुणाला काही गोष्टी पटत नसतील तर कृपया वाद घालत बसू नये. )