प्रवास
108 हि ॲम्बुलन्स सेवा परतीच्या प्रवासासाठी म्हणजे रुग्णालयातून रुग्णाला घरी पोचविण्यासाठी उपलब्ध असते का?
2 उत्तरे
2
answers
108 हि ॲम्बुलन्स सेवा परतीच्या प्रवासासाठी म्हणजे रुग्णालयातून रुग्णाला घरी पोचविण्यासाठी उपलब्ध असते का?
3
Answer link
🚑 *108 वर कॉल करा आणि मोफत आरोग्य सुविधा मिळवा*
🔸🔹 *महा डिजी | आरोग्य*🔹
🩺राज्य आरोग्य विभागाने रुग्णांना आपातकालीन सेवा मिळावी म्हणून राज्यात *108* क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तात्काळ डॉक्टरांनी सुसज्ज रुग्णवाहिका पाठवून मदत केली जाते.
💉 रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना *गोल्डन अवर(GOLDEN HOUR)* मध्ये उपचार मिळवण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
💊 मुंबईत *108 अंतर्गत सुमारे 937 रुग्णवाहिका* कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे अनेकांसाठी वरदान ठरत आहे.
📍रुग्ण अथवा इतर कोणाकडून 108 क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. *जीपीएसच्या मदतीने* त्या भागात कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते.
0
Answer link
हो, त्यासाठी 108 ला फोन करण्याची आवश्यकता नसते रुग्णालयात विचारणा केल्यास किंवा रुग्णालया बाहेरच ॲम्बुलन्स उपलब्ध असते.