प्रवास

आम्हाला येत्या मार्चमध्ये गिरणार , द्वारका , सोरटी सोमनाथ यात्रा स्वतःच्या वाहनाने करायची आहे आम्ही पुणे परिसरात राहतो तर प्रवास कसा करावा लागेल, मुक्काम कोठे करावा लागेल तसेच या ठिकाणांचा क्रम कसा असावा कृपया याबाबत कुणाला काही माहिती असेल तर सांगा ही विनंती?

1 उत्तर
1 answers

आम्हाला येत्या मार्चमध्ये गिरणार , द्वारका , सोरटी सोमनाथ यात्रा स्वतःच्या वाहनाने करायची आहे आम्ही पुणे परिसरात राहतो तर प्रवास कसा करावा लागेल, मुक्काम कोठे करावा लागेल तसेच या ठिकाणांचा क्रम कसा असावा कृपया याबाबत कुणाला काही माहिती असेल तर सांगा ही विनंती?

1
यात्रा करणार आहात तर यात्रा सफल होण्यासाठी शुभेच्छा
यात्रेसाठी स्वतः च वाहन घेऊन जाणार आहात ते ठिक आहे .  टोल  मात्र भरपूर आहेत  पुण्याला जाण्यासाठी 16/17तास लागतील. गुजरात मध्ये सौराष्ट्र गुजरात लागेल तिथे सौराष्ट्र फाॅरेस्ट आहे ते जंगल फिरण्यासाठी एक तास लागतो.ते फिरण्यासाठी तिथे तिखट आहे आणि त्यांच्याच वाहणाने जावं लागतं
आणि नंतर पुढे सोरटी सोमनाथ तिथे गेल्यावर तुम्हाला देवदर्शन. करायचे असेल तर तुम्हाला तिथे राहावं लागेल.तिथे रूम घ्यावे लागेल.तिथे धर्मशाळा ही आहेत हाॅटेल आहेत तिथे रूम मिळतील जेवणाची सोय हाॅटेल मध्ये किंवा मंदिरांच्या ट्रस्ट तर्फे जेवणाची सोय असते जेवणाची वेळ 11ते 1वाजेपर्यत आणि संध्याकाळी 6ते7वाजे पर्यंत.मंदिरात दर्शनासाठी जाताना आपल्या कडे असलेले पैशाचं पाकीट आणि मोबाईल तिथे कांऊटर असतात तिथे जमा करावे लागते ते आपल्याला टोकन नंबर दिला जातो दर्शन घेऊन झाल्यावर आपला टोकन नंबर देऊन आपलं सामान घ्यावे
सोमनाथच दर्शन झाल्यावर नागेश्वराच दर्शन करावे 
तुम्हाला देवदर्शन करायचे असेल तर तुमचं वाहण न नेता तिथे रिक्षावाले असतात ते आपल्याला सर्व देवदर्शन करून देतात आणि आणि आपल्या रूमवर आणून सोडतात सोमनाथ ला एक रात्र राहिल्या वर आपलं स्वतः च वाहण घेऊन दुसऱ्या दिवशी द्वारका द्वारकाधीश ,रणछोड हे दर्शन करून तुम्हाला गिरणारीला जायचे असेल तर तुम्हाला सोमनाथ जशी पध्दत आहे तसेच तुम्हाला तिथे रूम घेऊन राहावं लागेल जेवणाची वेळ हि सोमनाथला आहे तसेच आहे  स्वतः चे वाहण घेऊन गिरणारीला जावे मग तिथे गेल्यावर तिथे विसाव्या साठी रुम घ्यावी तिथे आपलं सामान ठेवावे मग तिथे जाण्यासाठी वयस्कर वृद्धांसाठी चांगली सुविधा आहे त्यांना सहज रित्या दर्शन घेऊ शकतात गिरणार रोपवे. आहे त्याची तिकिट आहे त्आपल्याला दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून पार करून जावे लागते. मंदिरात जाण्यासाठी 10,000पायऱ्या आहेत.

गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालतात. गिरनारच्या भोवती घनदाट जंगल आहे. या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञा शिवाय अनुमती मिळत नाही. फक्त परिक्रमेच्या कालावधीत येथे 5 दिवसांसाठी भाविकांना प्रवेश देण्यात येते.
 आपली यात्रा सफल होवो ही सदिच्छा
ओम नमः शिवाय 🙏🙏

उत्तर लिहिले · 16/2/2023
कर्म · 48555

Related Questions

आपल्या एखाद्या स्मरणीय प्रवासाचे चाळीस ओळीत प्रवास वर्णन लिहा?
मुंबई ते पोलिस मुख्यालय नाशिक ग्रामीण कसे जायचे?
76% दोन्ही कानाने बहिऱ्यांना ST प्रवासात सवलत आहे काय?
प्रवास वर्णन म्हणजे काय?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
108 हि ॲम्बुलन्स सेवा परतीच्या प्रवासासाठी म्हणजे रुग्णालयातून रुग्णाला घरी पोचविण्यासाठी उपलब्ध असते का?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?