सण

बेंदूर म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

बेंदूर म्हणजे काय?

2
बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात.

नेमका काय आहे बेंदूर सण? ‌
शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो. प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते. बेंदूर सण कधी आहे? तो कसा साजरा करतात? 
    
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो. बेंदूर सण कधी आहे? तो कसा साजरा करतात? जाणून घेऊया....




कधी आहे बेंदूर सण?

आषाढी एकादशीपासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण-उत्सवांना सुरुवात होते. देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात. यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्त्व प्राप्त असणार सण म्हणजे बेंदूर. या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा ४ जुलै २०२० रोजी हा सण साजरा करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला 'पोळा' असे म्हणतात. कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागात हा सण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

कसा साजरा करतात बेंदूर सण?


बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे. मात्र, बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर, पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते.



बैलांची खांदे मळणी

बैलांच्या वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात.

गुरु परमात्मा परेशू! जाणून घ्या गुरुपूजन, गुरुमहती आणि गुरुमहत्त्व

बैलांची मिरवणूक

बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. करोना संकटामुळे यंदा बैलांची मिरवणूक काढली जाणार नसल्याचे समजते.

उत्तर लिहिले · 6/9/2021
कर्म · 121725

Related Questions

चंपाषष्टी या सणाचे महत्व काय आहे?
दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?
नवरात्रीत अखंड दीप लावण्याची योग्य पद्धत कोणती?
होळी आणि रंगपंचमीबद्दल माहिती मिळेल का?
मकर संक्रात विषयी काय सामाजिक संदेश देता येईल?
दसरा पूजन कसे करावे?
पाकिस्तान मध्ये नवरात्र उत्सव साजरा करतात का?