रामायण

रामायण हे महाकाव्य हे किती श्लोक वा कांड यामध्ये?

1 उत्तर
1 answers

रामायण हे महाकाव्य हे किती श्लोक वा कांड यामध्ये?

1
या सात कांडांमध्ये २४,६०० संस्कृत श्लोक असून, ते १८२० पृष्ठांचे आहे. वाग्देवता मंदिरात समर्थांच्या या सर्व ग्रंथ संपदेचे जतन (रिस्टोरेशन) करण्यात आले आहेत. त्याचे डिजिटलायझेशनही झाले असून, समर्थांचे वाल्म‌िकी रामायणाचे सातही कांड सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत यासाठी वाग्देवता मंदिरातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
रामायण
संस्कृत महाकाव्य

रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ आहे.[१]


रामायणात वर्णिलेले लंकेचे महायुद्ध (चित्रनिर्मिती: इ.स. १६४९-५३)
रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत.[२] रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.[३]

नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ, हिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब,[४] इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.

रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.[५][६]

रामायणातील कांडे 
रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यांतील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे.[७] वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत. रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे.[८]

बाल कांड – रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस.
विश्वामित्रांनी त्यांना राक्षसांच्या संहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदी घटनांचा समावेश.
अयोध्या कांड – या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो.
अरण्य कांड – वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.
किष्किंधा कांड – सीतेच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतात. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतेस शोधण्यास प्रारंभ करतात.
सुंदर कांड – या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान समुद्र लांधून लंकेत प्रवेश करतात. लंकादहन घडवितात. रावणाच्या राज्यातील अशोकव न येथील सीतेच्या उपस्थितीबद्दल रामास कळवितात.
युद्ध कांड - या भागात राम - रावण यांचे युद्ध, रावण वध, त्यानंतर रामाचे सहपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.
उत्तर कांड – रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.[९]
शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.[१०]

रामायणातील पात्रे, वगैरे 
वाल्मीकी ऋषि, वाल्याकोळी, नारद मुनी, क्रौंच पक्षी
सूर्यवंशी : इक्ष्वाकु मांधाता दिलीप रघु
दशरथ, कौसल्या, कैकयी, सुमित्रा
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न
मिथिलानगरी
जनक
सीता, ऊर्मिला
वसिष्ठ ऋषि, विश्वामित्र ऋषि
शिवधनुष्य
त्राटिका, अहल्या, गौतम
मंथरा, सुमंत, शबरी
अंजनी, केसरी, वायुपुत्र मारुती/हनुमंत/वज्रांगबली/हनुमान, इंद्र, शिव, विष्णू, ब्रम्हा, गणेश
सुग्रीव, वाली, जांबुवंत, अंगद, नल, नील, जटायू, संपाती, रोमा/रुमा
लंका, शूर्पणखा, मारिच, रावण, मंदोदरी, मेघनाद/इंद्रजित, विभीषण, कुंभकर्ण, कुंभ, निकुंभ, अहिरावण, महिरावण
रामेश्वर, द्रोणागिरी
पुष्पक विमान
लव, कुश
रामायणातील नीतिपाठ 
वाल्मीकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मीकी रामायणचा अभिप्राय आहे.[११]

नारदमुनी हे संक्षेप रामायण या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे -
१. गुणवान - नीतिवंत
२. वीर्यवान- शूर
३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार
४. कृतज्ञ ,
५. सत्यवाक्य – सत्यवचनी
६. दृढवृत्त – आत्मविश्वासी,
७. चरित्र्यवान – चारित्र्य चांगले असणारा,
८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा
९. विद्वान
१०. समर्थ
११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा
१२. आत्मवंत – धैर्यस्थ,
१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला ,
१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला ,
१५. अनसूयक – असूया नसलेला,
१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगे' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा.


रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्ये) पुढील काळात रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.

रामायणाचा काळ 
परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात - त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली. रचयिते वाल्मीकी हे सुद्धा या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते.

रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे.

रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - राम, सीता, दशरथ, जनक, वसिष्ठ, विश्वामित्र हे वाल्मीकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथांत व वेदांत आढळतात.[१२][१३] रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव(?), ब्रह्मा, विष्णु वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या.

सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे.[१४] बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचिती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे.

रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे काल्पनिक वर्णन आढळते. इतिहासकार एच.डी. सांकलिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकातला असल्याचे प्रतिपादले आहे.[१५] तर इतिहासकार ए.एल. भाषम हे रामकाळ इ.पू. ७व्या वा ८व्या शतकाचा असल्याचे मानतात.[१६]

रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते.[१७]

’रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ (प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, २०१५) या प्रफुल्ल मेंडकी यांनी लिहिलेल्या पुस्तकात रामायणातील वेगवेगळ्या घटना किती वर्षांपूर्वी घडल्या ते निश्चित करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

विभिन्न भाषांतरे/रूपांतरे 
जैन /पंप रामायण 
कथेचा सारांश 
रामायणाचा विश्वव्यापी प्रभाव 
इंडोनेशिया 
मर्यात्तम प्रभू श्रीराम
वाल्मिकी ऋषी
रामायणाचे रचनाकार

राम
विष्णूचा एक अवतार/ हिंदू देवता

रामायणाची विविध रूपे


उत्तर लिहिले · 25/8/2021
कर्म · 121725

Related Questions

उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
राम नाम' हे रामावताराच्या आधीपासूनच होते का?
राजा राम मोहन?
रामायणात रावणाच्या पत्नीचे नाव व गाव काय आहे?
रामराज्याची कल्पना कोणी मांडली?
रामायण व महाभारत या अगोदरचे वाडमय कोणते?
राम आणि रावण घडून गेलेत की काल्पनिक आहे, तुम्हाला काय वाटते. योग्य उत्तर द्या UPSC मुलाखतीचा प्रश्न आहे?