रामायण
रामायणात रावणाच्या पत्नीचे नाव व गाव काय आहे?
1 उत्तर
1
answers
रामायणात रावणाच्या पत्नीचे नाव व गाव काय आहे?
2
Answer link
रावणाला दोन बायका होत्या. दैत्य राजा मय याची कन्या मंदोदरी ही रावणाची पट्टराणी होती. मय हे हे राज्य जोधपूर जवळील मंडोर असावं असं मानलं जातं, तर काहींच्या मते ते मध्यप्रदेश मधील मंदसोर हे ठिकाण असाव. धन्यमालिनी ही त्याची दुसरी राणी होती.
मंदोदरीची थोरली बहीण माया ही वैजयंतपुरचा राजा संभर याची राणी होती. रावण वैजयंतपुरला गेला असता त्याने मायावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. संभर याला हे समजताच त्याने रावणाची रवानगी तुरुंगात केली. याच वेळी वैजयंतपुरवर पर राज्याचे आक्रमण झाले त्यात तो मारला गेला. मायाने प्राण त्याग निर्णयचा निर्णय घेतला, तेंव्हा रावणाने परत तिला वश करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मायाने त्याला शाप दिला की स्त्रीचं शिलभंग करण्याच्या त्याच्या स्वभावामुळेच त्यांचा अंत होईल.
वेदवती नावाची एक कन्या विष्णूला आपला पती बनवण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाची नजर तिच्यावर पडली. तो तिचे केस खेचून तिला पळवून नेऊ लागला. वेदवतीने त्याला शाप दिला की एक स्त्रीचं त्याच्या मृत्यच कारण बनेल, आणि तिने प्राण सोडले. याच तपश्चर्येने वेदवती पुढील जन्मात सीता बनून विष्णु अवतारी रामाची पत्नी बनली.
रंभा ही स्वर्गलोकीची अप्सरा होती. तसेच ती रावणाचा मोठा भाऊ कुबेर याचा पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. असं असतानाही त्याने वासनांध होऊन तिचे जबरदस्तीने शिलभंग निर्णयचा प्रयत्न केला. यामुळेच त्याला नलकुबेराने शाप दिला की या पुढे त्याने कुठल्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला तर त्याचे १०० तुकडे होतील! यामुळेच तो सीतेला स्पर्श करू शकला नाही.
कालकेय हे एक दानवांचे राज्य होते. तिथला राजा हा शूर्पणकेचा पती होता. त्यांचं आणि रावणाचं वैर होतं. जेंव्हा रावण कालकेयवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याने मंदोदरीला वचन दिले होते की तो शूर्पणकेचा सौभाग्याचं रक्षण करेल पण युद्धात तिचा पतीला रावणाने मारून टाकले. व शूर्पणकेला आपल्या मावस भावासोबत दंडकारण्यात पाठवले. असंही म्हणतात की पतीच्या हत्येचा बदला घ्यावा म्हणूनच तिने हे सर्व घडवून आणले
दशग्रंथी, शिवभक्त विद्वान रावण काय किंवा दानशूर कर्ण काय.. स्त्रीची अवहेलना करणं किंवा त्यात सहभागी असणाऱ्यांना साथ देने या मुळेच ते मारले गेले.