औषधे आणि आरोग्य आयुर्वेद

कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे?

1
वनस्पति, औषधी : रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून ( उदा., पाने, मुळे, खोड इ. ) तयार केलेले काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.

इतिहास : फार प्राचीन काळापासून प्राणिसृष्टी तिच्या दररोजच्या गरजा भागविण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून रहात आहे. एकूण जीवसृष्टीमध्ये वनस्पतीच स्वयंपूर्ण आहेत. आदिमानवाच्या काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष पुरवू लागला. निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे, फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे, हे त्याने नीट पाहिले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे वर्गीकरण केले. अमुक एक वनस्पती खाद्योपयोगी आहे, तिची रूची गोड आहे, ती कोणत्या ऋतुमानात येते, तीपासून खाद्योपयोगी पदार्थ कसा बनविता येईल इ. आडाखे त्याने बांधले. काही ठराविक वनस्पती सारक आहेत, काही शरीराच्या वाढीस उपयुक्त, तर काही निरूपयोगी आहेत. ह्या वनस्पतिसृष्टीच्या अनुभवाबरोबरच आयुष्यक्रमात निरनिराळ्या निसर्ग आविष्करांचाही त्याने अनुभव घेतला. त्यामुळे झालेल्या काही परिणामांनी जेव्हा तो त्रस्त झाला, तेव्हा त्याने पंचमहाभूतांची पूजा केली, प्राण्यांचा बळी दिला, वनस्पतींच्या समिधांचा होम केला. वनस्पतींवर विश्वास ठेवून संकट निवारण व्हावे म्हणून त्या भक्षण केल्या. बऱ्यावाईट अनुभवांनंतर वनस्पतींच्या निरनिराळ्या उपयोगांचे त्याला ज्ञान झाले. जादुटोण्याकरिता वापरावयाच्या जालीम वनस्पतींबरोबरच अंगाचा दाह कमी करण्यासाठी उटणी म्हणून वापरावयाच्या वनस्पती त्याने शोधून काढल्या. वेगवेगळे अनुभव व निरीक्षणे ह्यांवर आधारित अनुभवी माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, तसेच रोग दूर करून आराम देणाऱ्या दिव्य औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.

भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे. 

चरकसंहितेमध्ये ७०० च्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. इ. स. दुसऱ्या शतकातील ह्या ग्रंथामध्ये वनौषधी व त्यांचे उपयोग इतकेच नाही, तर वनस्पती कशा ओळखाव्यात, केव्हा व कशा रीतीने गोळा कराव्यात, ह्याची देखील नोंद केली गेली आहे.

वैद्यकशास्त्राचा ‘औषधिविद्या’ नावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे वर्णन व औषधी योजना असे दोन पोटविभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग, आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे आहे.

वनौषधी ओळखण्याची सुलभ पद्धत म्हणजे तिला दिलेले शास्त्रीय द्विनाम. वनस्पतीस द्विनाम द्यावयाची पद्धत यूरोपमध्ये अठराव्या शतकात कार्ल लिनीअस यांनी सुरू केली परंतु भारतात त्याही पूर्वी तज्ञांनी औषधी वनस्पतीच्या वर्गीकरणाची एक पद्धत सुरू केली होती. उदा., बलाचे किंवा रानमेथीचे वेगवेगळे प्रकार वेगळ्या नामावलींनी दर्शविले आहेत : बला (सिडा ॲक्यूटा ), अतिबला (सिडा ऱ्हाँबिफोलिया ), भूमिबला (सिडा व्हेरोनिसिफोलिया ), नागबला (सिडा स्पायनोजा ) (कंसात लॅटिन द्विनामे तुलनेसाठी दिली आहेत).

बहुधा एकाच कुलातील वनस्पती ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जात असावी. प्राचीन काळी औषधी वनस्पतिज्ञानाच्या प्रबोधनासाठी होमहवनाबरोबर चर्चासत्रेही आयोजित केली जात असत. त्यांमध्ये गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषीही भाग घेत असत. बुद्धकाळामध्ये परोपकार, दया यांबरोबरच रूग्णांच्या शुश्रूषेलाही महत्त्व होते. बुद्ध-अशोक काळात भारतीय औषधी ज्ञानभांडार उच्च प्रतीचे मानले गेले होते.

पुढे यावनी आक्रमणानंतर ह्या सर्व संशोधनात खंड पडून अर्धवट ज्ञानी किंवा बैरागी, वैदू वा आदिवासी यांनी औषधी वनस्पतींची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अर्धवट ज्ञानाने चुकीच्या काष्ठौषधी पुरवल्या जाऊन औषधांचा गुण येईनासा झाला. चांगल्या, उत्तम ज्ञानी वैद्यांनी वनौषधींचे ज्ञान पुढील पिढीस दिले नाही किंवा तसे शिष्यगणही निर्माण केले नाहीत.

पुढे ब्रिटिश कारकीर्दीत मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनास सुरूवात झाली. भारतीय वनस्पतींवर व समृद्ध निसर्गावर ब्रिटिश, यूरोपीय शास्त्रज्ञांनी अनेक पुस्तके लिहिली. डब्ल्यू. डॉयमॉक, जी. वॉट आदि परकीयांबरोबरच व्ही. सी. दत्त, ⇨कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, बी. डी. बसू, आर्‌. एन्‌. चोप्रा, के. एम्‌. नाडकर्णी वगैरे भारतीयांनीही वनौषधींच्या ज्ञानात भर घातली.

महाराष्ट्रात वनौषधी जागृतीचे काम आयुर्वेद महोपाध्याम शंकर दाजीशास्त्री पदे ह्यांनी केले. त्यांनी १८८८ साली आर्यभिषक नावाचे मासिक सुरू करून ठिकठिकाणी वैद्यसभांची स्थापना केली. १८९३ मध्ये वनौषधी गुणादर्श हा ग्रंथ सात भागांमध्ये त्यांनी लिहिला. वा. ग. देसाई ह्यांनी ओषधीसंग्रह म्हणजे वनस्पती कशा ओळखाव्यात, त्यांचे गुणदोष, उपयोग, द्यावयाचे प्रमाण, तयार करण्याच्या पद्धती इत्यादींचा सुबोध ग्रंथ १९२७ मध्ये मातृभाषेतून−मराठीतून–लिहिला. ह्या ग्रंथात निरनिराळ्या रोगांवर उपयोगी अशा सु. १,००० वनस्पतींची माहिती आहे. भारतात इतर भाषांमधूनही वनौषधींवर काम झाले. वनस्पतींची शास्त्रीय दृष्ट्या बरोबर व रेखीव चित्रे मात्र अजूनही कीर्तिकर आणि बसू ह्यांचीच प्रमाणभूत मानण्यात येतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शं. पु. आघारकरांच्या नेतृत्वाखाली स. रा. गोडबोले ह्यांनी महाराष्ट्रातील वनस्पतींचे संकलन केले. स. य. सावंत व कोल्हापूरच्या हरिचंद मेहता पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अनेक पुस्तिका ह्यांनी महाराष्ट्राच्या वनस्पतीसंबंधीच्या माहितीत महत्त्वाची भर घातली.
उत्तर लिहिले · 24/8/2021
कर्म · 121725
0
आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. आयुर्वेद हा विष्णू अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे.
उत्तर लिहिले · 26/8/2023
कर्म · 9415

Related Questions

मोतीबिंदुवर घरगुती उपचार कोणता करता येईल?
अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न कराल?
रेबीज या आजाराची लस कोणी तयार केली?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात?
चेहऱ्यावरील मुरमाचे डाग कसे घालवावे?
वजन कसे कमी होते?
फंगल इनपेक्शन्स' कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?