सामान्य ज्ञान तालुका

महाराष्ट्रात तालुके किती?

1 उत्तर
1 answers

महाराष्ट्रात तालुके किती?

4
महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ (१६) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ, रायगड (१५), नाशिक (१५), जळगाव (१५), चंद्रपूर (१५) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मुंबई शहर या जिल्ह्यात एक पण तालुका नसून मुंबई उपनगर या जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली व कुर्ला असे ३ तालुके असून ते फक्त प्रशासकीय कारभारासाठी आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना वगळता महाराष्ट्रात सगळ्यात कमी तालुके हे धुळे (४) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ हिंगोली (५), नंदुरबार (६), वाशिम (६) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

प्रशासकीय विभागानुसार जिल्हावार तालुक्यांची संख्या :

१. कोकण विभाग : एकूण जिल्हे : ७, एकूण तालुके : ५०

रायगड (१५) : अलिबाग (जिल्हा मुख्यालय), पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा.
रत्नागिरी (९) : रत्नागिरी (जिल्हा मुख्यालय), मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर.
सिंधुदुर्ग (८) : सावंतवाडी, कणकवली, कुडाळ (ओरस), देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी.
पालघर (८) : पालघर (जिल्हा मुख्यालय), वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड.
ठाणे (७) : १. ठाणे शहर (महापालिका क्षेत्र) (जिल्हा मुख्यालय), कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर्, उल्हासनगर, मुरबाड.
मुंबई उपनगर (३) : अंधेरी, बोरिवली, कुर्ला.
मुंबई शहर : एकही तालुका नाही.
२. पुणे विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५८

पुणे (१४) : पुणे शहर (जिल्हा मुख्यालय), आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे, शिरूर, हवेली.
कोल्हापूर (१२) : कोल्हापूर - करवीर (जिल्हा मुख्यालय), आजरा (महाल), कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, गारगोटी (भुदरगड), राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले.
सोलापूर (११) : उत्तर सोलापूर (जिल्हा मुख्यालय), दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा.
सातारा (११) : सातारा (जिल्हा मुख्यालय), कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव, कोरेगांव, पाटण, जावळी, खंडाळा.
सांगली (१०) : शिराळा (महाल), इस्लामपूर (वाळवा), तासगांव, विटा (खानापूर), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगांव.
३. नाशिक विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५४

नाशिक (१५) : नाशिक (जिल्हा मुख्यालय), सटाणा (बागलाण), सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर.
अहमदनगर (१४) : अहमदनगर (जिल्हा मुख्यालय), अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर.
जळगाव (१५) : जळगाव (जिल्हा मुख्यालय), चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड.
नंदुरबार (६) : नंदुरबार (जिल्हा मुख्यालय), अक्कलकुवा, धडगाव (अक्राणी), तळोदा, नवापूर, शहादा.
धुळे (४) : धुळे (जिल्हा मुख्यालय), शिरपूर, साक्री, शिंदखेडा.
४. औरंगाबाद विभाग : एकूण जिल्हे : ८, एकूण तालुके : ७६

नांदेड (१६) : नांदेड (जिल्हा मुख्यालय), अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव (खैरगाव), उमरी.
बीड (११) : बीड (जिल्हा मुख्यालय), किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर (कासार), वडवणी.
लातूर (१०) : लातूर (जिल्हा मुख्यालय), उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर (अनंतपाळ), औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर.
परभणी (९) : परभणी (जिल्हा मुख्यालय), गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर.
औरंगाबाद (९) : औरंगाबाद (जिल्हा मुख्यालय), खुलताबाद, सोयगांव, सिल्लोड, गंगापुर, कन्नड़, फुलंब्री, पैठण, वैजापूर.
उस्मानाबाद (८) : उस्मानाबाद (जिल्हा मुख्यालय), तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा.
जालना (८) : जालना (जिल्हा मुख्यालय), अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा, जाफ्राबाद.
हिंगोली (५) : हिंगोली (जिल्हा मुख्यालय), औंढा नागनाथ, सेनगांव, कळमनुरी, बसमत.
५. नागपूर विभाग : एकूण जिल्हे : ६, एकूण तालुके : ६४

चंद्रपूर (१५) : चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर.
नागपूर (१४) : नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही.
गडचिरोली (१२) : गडचिरोली (जिल्हा मुख्यालय), चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज (वडसा), भामरागड, मुलचेरा.
वर्धा (८) : वर्धा (जिल्हा मुख्यालय), आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर, कारंजा, देवळी, हिंगणघाट.
गोंदिया (८) : गोंदिया (जिल्हा मुख्यालय), अर्जुनी - मोरगाव, आमगाव, सडक - अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, तिरोडा, देवरी.
भंडारा (७) : भंडारा (जिल्हा मुख्यालय) साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर.
६. अमरावती विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५६

यवतमाळ (१६) : यवतमाळ, बाभुळगाव, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा (केळापूर), मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड, आर्णी, झरी जामनी.
अमरावती (१४) : अमरावती (जिल्हा मुख्यालय), धारणी (मेळघाट), चिखलदरा, अचलपूर, चांदुर बाझार, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, भातकुली, तिवसा, दर्यापूर, नांदगाव (खेडेश्वर), चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे.
बुलढाणा (१३) : खामगांव, चिखली, संग्रामपूर, सिंदखेडराजा, देउळगांव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव जामोद, शेगांव.
अकोला (७) : अकोला (जिल्हा मुख्यालय), अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी-टाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर.
वाशिम (६) : वाशिम (जिल्हा मुख्यालय), कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, मानोरा.
?
उत्तर लिहिले · 20/8/2021
कर्म · 121725

Related Questions

सामर्थ्य पाहिजे चळवळीचे,जो जो करील तयाचे ? कराड तालुका व परिसर एक पारस आहे ..जो सत्कर्म करून दिशा दाखवतो व इतरांचा सहज उद्धार म्हणजेच विकास करतो ...हा एक परिणाम आशिर्वाद समजावा ? उत्तर विवेकी विचार मंथनातून द्यावे ?
ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती तालुका ठिकाणी झाली तर जन्म नोंद कुठे करतात?
परभणीत किती तालुके आहेत?
माणिकडोह बिबट्या केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
चोपडा तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो?
तरंगणारा दगड कोकणात सापडला त्याची माहिती दया?
पाटण तालुक्यातील भुयाराबद्दल माहिती दया?