1 उत्तर
1
answers
पाटण तालुक्यातील भुयाराबद्दल माहिती दया?
0
Answer link
कोरीव मूर्ती अन् प्राचीन भुयार.
एकनाथ माळी, तारळे सातारा
तारळे विभागात अनेक मंदिरे ऐतिहासिक व पौराणिक पाऊलखुणा दाखवत असून कडवे बु॥ (ता.पाटण) येथील पांडवकालीन महादेव मंदिर आजही पर्यटनाच्या दृष्टीने व पुरातत्व विभागापासून दूर राहिले आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने मंदिराचा सखोल अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तारळे गावच्या पश्चिमेला सुमारे सहा किलोमीटर अंतरावर कडवे बु॥ हे गाव आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेल्या या गावामध्ये ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. त्याठिकाणी अखंड पाषाणात कोरलेले महादेव मंदिर आहे. मुख्य गाभार्यासह दोन ठिकाणी स्वयंभू पिंड असून पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. गावाजवळून वाहणार्या ओढ्याच्या तीरावर अखंड पाषाणात मंदिर कोरण्यात आले आहे. मंदिराच्या सभामंडपात दोन तर मंदिराच्या पूर्व व पश्चिमेला दोन अशी चार ठिकाणी पाषाणात कोरलेल्या खोल्या असून यात अनेक देवदेवतांच्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. काळाच्या ओघात मंदिरासह मूर्तींची दुरवस्था होत आहे. वेळोवेळी ग्रामस्थांकडून मंदिराची डागडुजी केली जात असून पुरातत्व विभागाने मंदिराचा अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.
एका अखंड पाषाणात कोरलेल्या मंदिरात सभामंडपात दगडी खांब उभे असून गाभार्यात स्वयंभू पिंड आहे.सभामंडपाच्या पूर्वेला सूर्यदेवतेची तर पश्चिमेला विष्णूची पाषाणाच्या मूर्तीची दोन मंदिरे आहेत. विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर छिद्र ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या पूर्वेला असलेल्या पाषाणाच्या बारमाही पाणी असलेल्या कोरीव मंदिरात विष्णूची मूर्ती असून त्याभोवती विष्णूच्या चौदा अवतारांतील मूर्ती आहेत. तर मंदिराच्या पश्चिमेला स्वयंभू पिंड आहे. त्याठिकाणी पूर्वी चिठ्ठी ठेवली तर भांडी निघत होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या पाठीमागे दगडातच विहीर होती, ती आता मुजून गेली आहे. उत्तर व पश्चिमेच्या कोपर्यात भुयार आहे. ते मातीने भरले आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी गावातील काही युवकांनी त्या कोपर्यातील माती काढून बघितली असता खाली खाली पायर्या भुयारात उतरु लागल्यानंतर तो प्रयत्न सोडून देण्यात आला. तेथेही एखादे मंदिर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंदिराच्या पश्चिमेला थोड्या अंतरावर एका ठिकाणी पायाचे ठसे असून ते ठसे पांडवांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
दै पुढारी