Topic icon

तालुका

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
जी हुजुर, जी सुजाण नागरिक हो...
सत्संगाविन विवेक ना होय ...
एकत्व सत्य प्रेम नम्रता.....ही माणसाला प्रकाशाकडे नेते. माणसाला माणूस हा प्रिय असावा...
 कारण ज्ञान एक अधिक नरमें...
सत्गुरूविन ज्ञान नाही... 
सत्गुरूविन कोण दाखविल वाट... 
सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..

.म्हणून जाणतेणं गुरू भजिजे,तेणें कृतकार्य होईजे,जैसे मूळसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती ||

वरील सर्व बाबींचा विचार करून सहजतेने विशालतेकडे झेपावत रहातं येते .

सहकार ....सहकारिता....जाणा ,माना व जुडा

आपल्या महाराष्ट्रात अनेक मुद्दे आणि मंथन होत असते .

त्यास विवेकी पालकत्व हवे आणि ते सांभाळण्यात अनेक माहिर आहेत .याला संतांनी ही साथ दिली व शाहिरांची ही डफावर थाफ पडली व त्यांंनी शिव छत्रपतीची जीवनकथा गायिली.

कृर्तुत्वाने विश्वासाने जीवभाव लावून एकजीवी एकरसी एकनिष्ठ बांधिलकी प्रेमभाव निर्माण करून महाराष्ट्र उभा राहिला व समन्यायी परिवर्तनातून मिलवर्तनाचं काम करत समन्वय समतोल संवेदनशील समाजमन ठेवून माणुसकी धर्म जतला .
आणि म्हणूनच जनजागृती करावी व एकदिलाने एकरूप होऊन सुस्वरूपता धारण केली व किल्ले गडकोट त्याकाळी मावळ्यांचा सहकार कसा होता ,हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा रस्ता सुरक्षा प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास या आपल्या मातीला घट्ट आकार देऊन हे जीवनमान उंचावणेसाठी मर्द मराठा ऊभा राहिला .
इतकं सख्य या सह्याद्रीच्या कडीकपारीत स्थापन झाले , आईची भूमिका साकारण्याची संधी महिलांनी सर्वोच्च स्तरावर नेली.
 सर्व समर्पणाची एक आख्यायिका आहे,उगीच हिरकणी तयार झाली नाही? गड आला पण सिंह गेला ? किती तरी उदाहरणे आहेत..होता जीवा म्हणून वाचला शिवा... असो . तर ही एक या मातीतून नवलाई उद् यास आली . हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

असं संघटन कौशल्य चातुर्य कथा या महाराष्ट्राच्या ओळखी आहेत .
मराठी संस्कृतीने घराघरात मनामनात रानावनात आरोळ्या देत देशभक्ती केली , ही माती ... माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्ग लोकांहून थोर ,मला हिचे महिमान |

सह्याद्री हा एक परिस आहे, काय सांगू मी या संतांचे उपकार, निरंतर मज जागवती. ! 

असो , तर सहकार सहकार्य संघटन कौशल्य चातुर्य वाढीस लागावे म्हणून समाजधुरीनांनी जाणले आणि या महाराष्ट्राला उद्धरून नेणेस मनांमनांची एक साथ मिळाली तर महाराष्ट्रात निश्चित परिवर्तन मिलवर्तन घडून माझा तुमचा एकजीवी दैदिप्यमान महाराष्ट्र उभा राहू शकतो यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी जोडले.
आपली ओळख आपली  संस्कृती सुसंगत संयमी संवेदनशील आणि ...त्यातूनच  निर्मल भक्ति सार्थ होईल हे ईप्सित जाणले..
 ते समाज सुधारक मा. यशवंतराव चव्हाण, विखे पाटील , गाडगीळ, शाहू महाराजांच्या विचारांची अनेक माणसे या मातीतून सहज निर्माण होतील हे जाणकारांनी जाणले व तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सहकार संघटन वाढीसाठी आवश्यक ती कामगिरी अनेक स्तरांतून साकारली.

 .. महाराष्ट्रातून सहकार कार्य वजा केले तर हा महाराष्ट्र निव्वळ उजाड दिसेल . हे जाणा ,माना व एक तत्व दृढ धरी मना... हरिशी करुणा येईल तुझी . असो . तर एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ...

या सहकारी साखर कारखानदारीने, सहकारी दूध उत्पादक शेतकरी संघ , सूतगिरण्या, सहकारी सोसायट्या, सहकारी ग्राहक संस्था, पतसंस्था,बॅंकानी  गोरगरिबांना सेवा देत कृपाप्रसाद हाती ठेवलाय .

तरी परंतु, काही संस्थांनी निर्मल सेवा दिली नसेल तर  ते परिणाम ही आपण भोगत आहोत .

चांगल्याला चांगलं म्हणण्याची पद्धत आहे ती जोपासली पाहिजे. वाईट वंगाळ प्रदूषित कर्मांचा ही त्याग केला पाहिजे.
अहंकारी निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगणे ही विघातक कृत्य आहे ..
निखळ चोखंदळ निरागस निर्मोही निर्व्याज निर्लेप  प्रेम भावना जोपासून आपण विवेकी विचारधारा जपुया व समर्पित भावनेने संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत जायचं आहे.

आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी कराड तालुका अग्रेसर आहे. कोण किती पाण्यात खोलात आहे हे लक्षात घेऊन आपण विवेक विचाराने हा वर्तमान हसत खेळत आनंदी ठेवूया त्यासाठी हा कराड तालुका एक पारसमणी आहे, आपण हात हातात घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना ध्यानात घेऊन एकत्र येऊ या .

जो या मातीत जन्माला आला आहे त्यांने सहकारी वारसा जपावा व या मातीशी एकरूप होऊन सुस्वरूपता धारण करून हे जीवन सार्थकी कसे लागेल हे पाहू या.
 
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे... करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी.आपला माणूस त्याला अंतर्मुख होऊन पहावे . माणसाला माणूस प्रिय असावा, त्याला नाकारू नये . 
ध्यानात घ्या , कोण चूकत नाही. आजचं वर्तमान समोर आहे किती लोक बेइमानी, लायक नाहीत , असे चित्र आहे.. तरीही जे घडतंय त्यालाही एक किनार आहे, आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी स्थिर विश्वासाची विवेकी पालकत्व सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली आहे .
 यासाठी समर्पित कार्यकर्ता पाहिजे त्यांने गुणदोष दाखविले तर आत्मपरीक्षण आत्मज्ञानानं आत्मभानानं हृदय चोखंदळ करून सहजतेने विशालतेकडे जाण्यासाठी नेत्यांनी मन मोकळं खुलं करून दोषांचे निराकरण करायला हवे.

आपल्या अंगी सद्गुणांची दिव्य रास आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. छत्रपती शिवाजी राजे जाणता राजा होते.खरे आपण मर्द मराठा मावळे आहोत ... एकदिलाने वागूया आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून हा वर्तमान समोर यावा यासाठी कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळाला या सहकाराला त्यांनी बोलते कर्म लाभले आहे ते बोलते कर्म सिद्ध करुन आचरणातून कर्मनिष्ठ त्यागातून दाखविले पाहिजे.
.
पण होतंय काय, हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा कोण आहे कां ? सगळा परिवार सत्तेत सहभागी आहे. सगळ्यांनी सर्व सहकारी संस्था ताब्यात घेऊन अहंकारी वृत्तीने काम सुरू ठेवले आहे.. 

आम्ही सभासदांनी गुणदोष दाखविले तर आम्हांलाच वेठीस धरतात . ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच जाणता राजा ने अजाणता दाखवू नये. हे साखर सम्राटांनी जाणावे.

या वर्तमानी समाजात जनजागृती नित्य नियमाने सतत सक्रीय आहे इतके जनमानस समृध्द करण्याचे काम या सहकाराने करायला हवे .प्रेम प्रेरणा नम्रता ही सर्वोत्तम कामगिरी  आहे ती करत गेल्यास सहकार समृद्धी समाधान देत राहिल हा विश्वास आहे... इतके मीडियाने ही बारकाईने पहावून सहकाराची वाहवा करावी.
सध्या शिक्षणाने अभूतपूर्व क्रांती झाली आहे.त्यामुळे सगळीकडे स्कील आहे, आणि म्हणूनच जाणकारांनी सहकारात ठराविकांना तहहयात जोपासू नये . प्रत्येकाला संधीचा लाभ हवाय हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरवा.

एका एका घरात चार चार पदवीधर आहेत जे सर्व स्तरातील शिक्षण उपक्रमातून स्किल डेव्हलपमेंट करून सेवेत सादर आहे . मग असा मतदार असेल तर ही किमया जाणावी ,कोणीही अनादर करू नये . कोण लहान कोण मोठा याला काही अर्थ नाही. सर्व आपले आहेत आपलीच माणसं आहेत .कष्ट जिद्द चिकाटी प्रयास परिश्रमाने माणसं जळी स्थळी काष्ठी पाषाणी अव्याहत कर्म करीत आहेत. गगनाला गवसणी घातली आहे.. सातासमुद्रापार भरारी घेतली आहे.. हे सत्कृत्य आज या कराड तालुक्यात कमी नाही , हे परिवर्तन मिलवर्तन घडून आले आहे .
ते सुकृत.. बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी.. असे या सह्याद्रीच्या कडीकपारीत स्थापन करण्यात आपली ओळख आपली गावे आपली ओळख देत आहेत .

मी आहे म्हणून जग आहे ,असं जीवनगाणं कोणी गाऊ नये. 
माझं माझं म्हणसी नरा , काहीच नाही नरा तुझं ..

आपले व्हिजन यथार्थपणे प्रकाशमान होवो हीच खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती युक्ती आहे ती कृती व शांती, प्रीती आहे.आपला सहकार असा बळकट व्हावा . हे समाज सुधारकांना अपेक्षित आहे.

आणि म्हणूनच सहकारात कराड तालुका अग्रेसर आहे. 
लाली मेरे लाल कि जिथं जिथं लेखू तिथं लाल ...लाली देखंन,मैं चली ,मैं भी हो गयी लाल..

 इतकं या मातीचं ,या सह्याद्रीच्या कडीकपारीत महत्व आहे.
सह्याद्री हा पारस मणी आहे त्यामुळे कृष्णाकाठ ऋणानुबंध वाचा , प्रेरणादायी आहे, आपण़ कृष्णा कोयना प्रितीसंगमावरील पथिक आहोत .. यासाठी समर्पित व्हा ..पथिक हो ,हा विरंगुळा येथे घ्या एक क्षणभर विसावा.... ...देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणें चारी मुक्ती साधियेल्या !!

आता हटायचं नाय... सहकार माझा मी सहकाराचा ...हां यासाठी जाणतेणं गुरू भजिजे.... सह्याद्री हा.पारस मणी आहे...

 सत्संगती या कराड तालुकी ...
 समृद्धी चे लेणं लेवून उभी .. 
अहंकार त्यागी ... एकजीवी एकरसी.... 
माणसाला माणूस प्रिय मानी ..
म्हणून आपणही या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी विश्वासाने हाती घेऊ ...
एक तत्व दृढ धरी मना... हरिसी करुणा येईल तुझी...
अशी निर्मल सेवा अमृता सारखी देत ... सगळ्यांना बरोबर घेऊन विवेक वृत्ती ने शुभाशिर्वाद लाभावेत यासाठी समर्पित होऊ या. ९/०४/२०२४..... संपतराव बोबडे, 7620575828.
 



उत्तर लिहिले · 10/4/2024
कर्म · 455
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात जन्म- मुत्यु नोंद करून दाखले देतात. दर 10 वर्षाने नोंद ही पंचायत समितीकडे वर्ग केली जाते. ग्रामीण भागातील आरोग्य सेविका नोंद करून ग्रामपंचायत कार्यलयाकडे देतात.
उत्तर लिहिले · 11/1/2022
कर्म · 11745