शिवाजी महाराज
संभाजी महाराज
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याची का ठरवले?
4 उत्तरे
4
answers
संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याची का ठरवले?
2
Answer link
21 681 पासून सन सोळाशे 80 पर्यंत गोव्याचा मुख्य मुख्य गरज नसून छत्रपती शंभूराजे कदाचित गोवा हस्तक करून आपला उठाव करतील या भीतीने
2
Answer link
*
सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून छत्रपती शंभूराजे कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करतील या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.
आजच्याच दिवशी छत्रपती संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्रास ( शाहू ) चे अभिनंदन केले.
*#मराठा - पोर्तुगीज*
औरंगजेब ५ लाख फौज घेऊन ,
दख्खन मध्ये उतरला , तो मोहिमांवर मोहिमा
आखत होता , पण यश काय मिळत नव्हतं ,
कारण छत्रपती शंभूराजांच्या युद्धनीतीपुढे त्याचं वा त्याच्या सेनापतींचं वा त्याच्या सेनेच काहीही चालत नव्हतं , अखेर औरंगजेबाने धोरण बदलले , त्याने पोर्तुगीजांना हाताशी घ्यायचे ठरविले . खरोखरच औरंगजेब एक मुरब्बी राजकारणी होता , पण नेहमी छत्रपती संभाजी महाराज , सर्वच बाबतीत एक पाऊल
पुढे होते . औरंगजेबाने , पोर्तुगिजांचा व्हाइसरॉय , विजरई कोंद - दी - आल्व्हर , सोबत पत्रव्यवहार सुरू केला .... पत्रात औरंगजेबाने , पोर्तुगीजांना आज्ञा केली की , " संभाजीच्या मुलखात धुमाकूळ घाला , लुटा , जाळपोळ करा , जो मुलुख जिंकाल तो कायमस्वरूपी तुमच्या अधिपत्याखाली राहील , तसेच लवकरच आम्ही कोकणवर स्वारी करणार आहोत , त्यामुळे कोकणप्रांत ही तुम्हांस आम्ही स्वाधीन करू " औरंगजेबाचे शाही पत्र मिळाल्यानंतर , व्हाईसरॉय अत्यंत खुश झाला ,
कोकण प्रांत पोर्तुगीजांच्या साम्राज्याला जोडणे
ही धूर्त पोर्तुगीजांची खूप आधीपासून इच्छा होती . लगोलग व्हाईसरॉय मराठ्यांच्याविरुद्ध
कुरघोड्या काढू लागला . व्हाईसरॉय फ्रान्सिस्कु द तांव्हर कोंद - दी - आल्व्हर , हा शूर व घमेंडी होता , गोव्याला येण्यापूर्वी स्पेनविरुद्ध झालेल्या अनेक लढायांत त्यानं भाग घेतला होता , तो याआधी आंगोलचा गव्हर्नर होता , युद्धविषयक त्याचा अनुभव दांडगा होता ; त्यामुळेच पुढे सन १६८१ मध्ये गोवा येथे व्हाईसरॉय झाला होता . सुरवातीला छत्रपती संभाजीराजे आणि आल्व्हर ह्यांच्यात संबंध बरे होते , पण नंतर आल्व्हरने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली ; कारण छत्रपती संभाजी महाराजांचे चे सैन्य पळपुट्या शिपायांनी भरलेलं आहे , अशी त्याला गुप्त पण खात्रीशीर खबर मिळाली होती , आपल्या कवायती शिपायांच्या आणि मजबूत तोफांच्या भरवशावर आपण छत्रपती शंभुराजांचा सहज पाडाव करू शकू , अशी त्याला खात्री होती . त्याच्या हालचाली वाढल्या होत्या , तो मोगलांस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करू लागला , किनाऱ्यावरील मराठा मुलखात विनाकारण त्रास देऊ लागला , तेथील हिंदूंच्या मंदिरांना उपद्रव देत असत , आपल्या देवांच्या सुंदर मूर्त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवित होत्या , स्त्रीया - मुलांना पळवून नेत असत , सक्तीने धर्मपरिवर्तन करवून घेत असत , त्यामुळे राजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे ठरविले ..
सुरवातीला पोर्तुगीज मराठ्यांशी , मैत्रीचे संबंध जोडून होते , नंतर व्हाईसरॉयने सन १६८२ च्या डिसेंबरमध्ये , स्वराज्यावर हल्ला केला , आणि मोगली सैन्यास काही सवलती व वाट दिली , पोर्तुगीजांनी इतकी लगोलग आणि उतावेळपणे मदत केली की ह्याचे उत्तर आपणांस व्हाईसरॉयने औरंगजेबास पाठविलेल्या पत्रातून मिळते , पत्रात व्हाईसरॉय लिहितो , " मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन दो मानूएल लोबु द सिलव्हेरा , तसेच चौल , वसई , व , दमण या तिन्ही ठाण्यांच्या कॅप्टनला पत्रे पाठवून आपल्या राज्यात जीवनो - पयोगी वस्तू खरेदी देण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते . तसेच आपल्या नौकांना
आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्याकरिता आमच्या अधिकाऱ्यांना सूचना पाठविल्या होत्या [ ह्याचा औरंगजेबाला फायदा असा झाला की , त्याला उत्तरेतून व सुरतेतून मोठ्या प्रमाणात रसद जहाजामार्फत येणार होती ] , मला आशा आहे की आपणाकडून या राज्याला
उदार सवलती प्राप्त होतील " . एकंदर मराठा - मोगल संघर्षातून जेवढा अधिक फायदा आपला होईल तेवढा जमेल तसा , जमेल त्या मार्गाने करून घ्यावा असा पोर्तुगीजांचा मनसुभा होता , तर पोर्तुगीजांमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मात करणे , हा औरंगजेबाचा मनसुभा होता ....