वजन-उंची

लठ्ठपणा टाळण्यासाठी साठी तुम्ही तुमच्या स्वतावर कोणता उपाय करू शकाल?

1 उत्तर
1 answers

लठ्ठपणा टाळण्यासाठी साठी तुम्ही तुमच्या स्वतावर कोणता उपाय करू शकाल?

3
लठ्ठपणा टाळण्यासाठी


लठ्ठपणा
लठ्ठपणाची कारणे
शरीराचं वजन
वजन कसे कमी करावे ?
लठ्ठपणा या स्थितीत शरीरातील अडीपोज ऊतींमधे अतिरीक्त प्रमाणात चरबी जमा होते आणि आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते.

लठ्ठपणाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे अकाली मृत्युसुध्दा होऊ शकतो.
लठ्ठपणामुळं उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी वाढणं, हृदयरोग, मधुमेह, पित्ताशयात खडे किंवा ठराविक प्रकारचा कर्करोग होऊ शकतो.
अतिप्रमाणात खाणे आणि शारीरिक कार्यं कमी होणं यांच्यामुळं लठ्ठपणा येतो. तथापि, अनुवांशिक कारणामुळेही लठ्ठपणा येऊ शकतो.
लठ्ठपणाची कारणे
शरीरात ऊर्जेची निर्मिती आणि तिचा वापर यांच्यात तीव्र स्वरुपात असंतुलन झाल्यानं लठ्ठपणा किंवा स्थूलपणा येतो.
आहारातून अति प्रमाणात चरबी घेणे यामुळे सुध्दा लठ्ठपणा येतो.
व्यायाम नसणे आणि बैठी जीवनशैली ही लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत.
गुंतागुंतीचं वागणं आणि मानसिक घटक यामुळं अतिअन्न सेवन केलं जातं आणि परिणामी लठ्ठपणा येतो.
ऊर्जेचा वापर करण्यातील चयापचयाच्या चुकांनी चरबी जमा होण्याला प्रोत्साहनच मिळतं.
बाल्यावस्था आणि पौगंडावस्थेतील लठ्ठपणामुळं प्रौढ वयात लठ्ठपणा येतो.

शरीराचं वजन
शरीराचं आवश्यक वजन म्हणजे युवा प्रौढांच्या बाबतीत त्यांच्या उत्कृष्ट शारीरिक कार्यक्षमतेत वजन आणि उंची यांचं प्रमाण. त्यासाठी सर्वात सामान्यतः वापरलं जाणारं मोजमाप म्हणजे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि ते किलोग्रॅममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गानं भागण्याव्दारे काढलं जातं. (वजन (किलो) / उंची (मीटर) २).


 

वजन कसे कमी करावे ?
तळलेले पदार्थ कमी खावेत
भाज्या आणि फळे अधिक प्रमाणात खावीत
संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेले धान्य यासारखे चोथ्याने समृध्द अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खावेत.
शरीराचं वजन सामान्य पातळीत ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.
शरीराचं वजन हळू आणि संयमानं कमी करावं.
आति प्रमाणात उपवास करण्यानं आरोग्य संकटात पडू शकतं.
आपली शारीरिक कार्यं संतुलित ठेवण्यासाठी विविध प्रकारचं अन्न घ्या.
नियमित अंतरानं थोड्या प्रमाणात अन्न सेवन करा.
साखर, चरबीयुक्त पदार्थ आणि अल्कोहोल कमी करा.
कमी चरबी असलेलं दूध घ्या.
वजन कमी करण्याचा आहार हा प्रथिनांनी समृध्द आणि कर्बोदकं तसंच चरबी यांच्याबाबतीत कमी असावा.



:

उत्तर लिहिले · 16/11/2021
कर्म · 121725

Related Questions

भारतातील हत्तीचे वजन किती असेल?
वस्तु चे पृथ्वीवरील वजन?
एका माणसाचे वजन पृथ्वीवर 60 किलो असेल तर चंद्रावर किती असेल?
लसणाचे सेवन करा आणि झटपट वजन कमी करा?
माझे वजन 108 किलो आहे ते कसे कमी करता येईल?
एक आठवड्यात एक किलो वजन वाढवायचं आहे ... कोणी मदत कराल का? प्रेयसी सोबत लग्न ठरणार आहे! उपाय सांगा.
एका व्यक्तीची तब्येत मागील तीन चार महिन्यांपर्यंत चांगली होती.वजनही साठ किलो होतं.पण मागील तीन चार महिन्यांपासून त्या व्यक्तीचे वजन 42 किलोपर्यत कमी झाले असून त्याला थायरॉईड झाला असल्याचे रिपोर्टमधे निष्पन्न झाले आहे.आता औषधांनी थायरॉईड बरा होऊन तब्येत पूर्वीसारखी चांगली होऊ शकेल का?(early answer)