शिक्षण
उच्च शिक्षण
ई-कॉमर्स
एखाद्या विद्यार्थ्याचे अकरावीची शिक्षण कॉमर्समधून झाली असेल आणि त्याला बारावी आर्ट्स मधून करायचे आहे तर ते शक्य आहे का?
1 उत्तर
1
answers
एखाद्या विद्यार्थ्याचे अकरावीची शिक्षण कॉमर्समधून झाली असेल आणि त्याला बारावी आर्ट्स मधून करायचे आहे तर ते शक्य आहे का?
8
Answer link
११वी मधून १२वी कक्षेत तुम्हाला तुमची शाखा(stream) बदलायची असल्यास तुम्ही नक्कीच बदलू शकता.. पण हे तेव्हाच
बदलता येईल जेव्हा तुम्ही ११वी मध्ये असताना तुमचे १२वी चे बोर्ड रजिस्ट्रेशन झाले नसेल..
बोर्ड रजिस्ट्रेशन ११वी मध्येच शेवटच्या टप्प्यात होते.. (ध्यानात घ्या, तुमचे नाव बोर्ड मध्ये रजिस्ट्रेशन झाले असेल तर तुम्ही स्ट्रीम बदलू शकत नाही.)
तुमचे नाव तुमच्या शाळा/कॉलेजने १२वी बोर्डासाठी रजिस्ट्रेशन केले आहे की नाही हे माहिती करण्यासाठी तुमच्या शाळा/कॉलेज मध्ये भेट घेऊन तुमचे वर्गशिक्षक यांच्याशी बोलून घ्यावे..
[एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाताना पूर्णपणे विचार करून प्रवेश घ्यावे.. कारण ११वी मध्ये जे आपण शिकतो तेच १२वी मध्ये अभ्यासक्रम असते.. वाणिज्य अगदीच कठीण होत असल्यास थेअरी साठी कला शाखा उत्तम ठरेल..]