उच्च शिक्षण
0
Answer link
डिग्री +व्यवसाय असे 4 वर्षाचे कोर्स आहेत.
https://www.aef.edu.in/ace/pages/B.Sc.-B.Ed.-course
या पेज वर भेट द्या म्हणजे कॉलेजचे नाव व माहिती संपर्क मिळेल. असे कॉलेज कितीपत सुरू आहे याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा कारण बऱ्याच ठिकाणी अजून कोर्स सुरू नाहीत.
1
Answer link
MBBS साठी असं काही निश्चित सांगता येत नाही. काही पॉईंट वरून नंबर लागत असतात. त्यासाठी तुम्ही मागील वर्षाचे मेरिट पाहून अंदाज करू शकतात त्याच्या थोड्या फार फरकाने मेरिट बहुतेक वेळा लागते पण तरी तुम्ही परीक्षेची तयारी करा त्यात तुम्ही कोणत्या वर्गात ( कॅटेगरीत ) आहात हे देखील महत्वाचे आहे. तुम्ही परीक्षेची उत्तम तयारी करा यश निश्चित मिळेल. शुभेच्छा
1
Answer link
MCVC for 'Minimum Competency Vocational Courses'.
एमसीव्हीसीचे संपुर्ण रूप म्हणजे ' किमान पूरक व्यवसायिक अभ्यासक्रम '. हे विविध शिक्षण किंवा शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वापरले जाणारे एक शब्द आहे. एमसीव्हीसी हे एक संक्षिप्त रूप आहे जे किमान योग्य व्यावसायिक अभ्यासक्रम ठरते. हे विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वापरले जाते ज्यात किमान योग्यता आवश्यक आहे
एमसीव्हीसी म्हणजे काय? भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे एक परिवर्णी शब्द आहे. ते प्रामुख्याने लेखा, लेखापरिक्षण, विपणन, सेल्समॅनशिप, पर्यटन, प्रवास इत्यादी विषयांमध्ये देतात.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखांसारखीच एच.एस.सी. व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी ही करियरला पूरक अशी विद्या शाखा उपलब्ध आहे. या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती आपण या लेखात करून घेऊ.
देशातील बेरोजगारी दूर व्हावी, या उद्देशाने डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार ११वी व १२वीच्या धर्तीवर व्यवसाय अभ्यासक्रमांची अथवा व्होकेशनल अभ्यासक्रमांची सुरुवात सन १९८९-९० मध्ये झाली. त्यावर्षी ३० अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती.
हे अभ्यासक्रम उद्योग क्षेत्राच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बनविण्यात आले आहेत. प्रॅक्टिकल नॉलेज अथवा प्रात्यक्षिकांवर या अभ्यासक्रमांचा विशेष भर आहे. या व्यवसाय अभ्यासक्रमांना पूर्वी एमसीव्हीसी या नावाने ओळखले जायचे. आता याचे नामकरण एच.एस.सी. व्होकेशनल झाले आहे.
या अभ्यासक्रमांची १२वीची परीक्षा उच्च माध्यमिक मंडळातर्फे, मुंबई बोर्ड घेण्यात येते. इतर शाखांप्रमाणेच या परीक्षेची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते. १२वीनंतर विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला तसेच कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो.
टेक्निकल ग्रुपचा विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतो. उदा. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतो. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. यासंबंधी माहिती महाविद्यालयात उपलब्ध होईल.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन म्हणजेच महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरून होणार आहे.
गटनिहाय अभ्यासक्रम
l टेक्निकल ग्रुप -
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी.
l कॉमर्स ग्रुप -
लॉजिस्टिक अॅण्ड सप्लाय मॅनेजमेंट, मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, फायनान्सियल ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग, इन्शुरन्स.
l हॉस्पिटॅलिटी ग्रुप -
फूड प्रोडक्शन, टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट.
l पॅरामेडिकल ग्रुप -
मेडिकल लॅब टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, चाइल्ड अॅण्ड हेल्थकेअर सर्व्हिसेस.
0
Answer link
एमसीव्हीसी म्हणजे काय ? आणि त्या मध्ये बेस्ट करिअर कसं निवडायचं यासाठी मार्गदर्शन
दहावी नंतर काय करावे? बारावी नंतर काय करावे?
! तुम्ही एमसीव्हीसी हे नाव ऐकूनच असाल. तुमच्या घरातील किंवा आजू बाजूच्या परिसरातील एखादा विद्यार्थी mcvc हा कोर्स करत असेल तुम्हाला म्हणजे नक्की काय माहिती आहे का? एमसीव्हीसी म्हणजे काय जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही काल आजच्या आम्ही एमसीव्हीसी म्हणजे काय?
Mcvc full form in Marathi:
Mcvc चहा इंग्रजी अर्थ ” Minimum Competency and Vocation Course” असा आहे तर mcvc full form in Marathi ” किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम” असा होतो.
Mcvc हा कोर्स भारत सरकारच्या अंतर्गत घेण्यात होतो या कोर्समध्ये कमी वेळामध्ये आपण जास्त व्यावसायिक क्षेत्राचे ज्ञान घेऊ शकतो. तसेच दहावी झाल्यानंतर या कोर्ससाठी आपण निवेदन देऊ शकतो.
Mcvc म्हणजे काय?
Mcvc म्हणजेच minimum Competency and Vocation Course ज्याला मराठी भाषेमध्ये किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असे म्हटले जाते.
Mcvc हा course भारत सरकारकडून चालविण्यात येतो या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एका खास trends बद्दल शिकवली जाते. या कोर्स मार्फत विद्यार्थ्यांना अधिकाधिक एखाद्या विषयांमध्ये किंवा कोर्ससाठी प्रोत्साहित केले जाते कमी वेळेमध्ये अधिक ज्ञान देऊन व्यवसायिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. देशातील अनेक खाजगी आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजमध्ये या कोर्सचे शिक्षण दिले जाते.
Mcvc या course मध्ये tele communications, computer science, technical engineering, event management, food preservation हे सर्व डिप्लोमा कोर्स सामाविष्ट होतात.
दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची या mcvc कोर्स साठी पात्र ठरतो.