शिक्षण उच्च शिक्षण

मी एमसीव्हीसी हे क्षेत्र निवडले आहे,पण मला पुढे कोणत्या क्षेत्रात जाता येईल?

1 उत्तर
1 answers

मी एमसीव्हीसी हे क्षेत्र निवडले आहे,पण मला पुढे कोणत्या क्षेत्रात जाता येईल?

1
MCVC for 'Minimum Competency Vocational Courses'.

एमसीव्हीसीचे संपुर्ण रूप म्हणजे ' किमान पूरक व्यवसायिक अभ्यासक्रम '. हे विविध शिक्षण किंवा शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वापरले जाणारे एक शब्द आहे. एमसीव्हीसी हे एक संक्षिप्त रूप आहे जे किमान योग्य व्यावसायिक अभ्यासक्रम ठरते. हे विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वापरले जाते ज्यात किमान योग्यता आवश्यक आहे

एमसीव्हीसी म्हणजे काय? भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे एक परिवर्णी शब्द आहे. ते प्रामुख्याने लेखा, लेखापरिक्षण, विपणन, सेल्समॅनशिप, पर्यटन, प्रवास इत्यादी विषयांमध्ये देतात.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखांसारखीच एच.एस.सी. व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी ही करियरला पूरक अशी विद्या शाखा उपलब्ध आहे. या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती आपण या लेखात करून घेऊ.

देशातील बेरोजगारी दूर व्हावी, या उद्देशाने डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार ११वी व १२वीच्या धर्तीवर व्यवसाय अभ्यासक्रमांची अथवा व्होकेशनल अभ्यासक्रमांची सुरुवात सन १९८९-९० मध्ये झाली. त्यावर्षी ३० अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती.
हे अभ्यासक्रम उद्योग क्षेत्राच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बनविण्यात आले आहेत. प्रॅक्टिकल नॉलेज अथवा प्रात्यक्षिकांवर या अभ्यासक्रमांचा विशेष भर आहे. या व्यवसाय अभ्यासक्रमांना पूर्वी एमसीव्हीसी या नावाने ओळखले जायचे. आता याचे नामकरण एच.एस.सी. व्होकेशनल झाले आहे.

या अभ्यासक्रमांची १२वीची परीक्षा उच्च माध्यमिक मंडळातर्फे, मुंबई बोर्ड घेण्यात येते. इतर शाखांप्रमाणेच या परीक्षेची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते. १२वीनंतर विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला तसेच कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो.

टेक्निकल ग्रुपचा विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतो. उदा. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतो. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. यासंबंधी माहिती महाविद्यालयात उपलब्ध होईल.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन म्हणजेच महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरून होणार आहे.

गटनिहाय अभ्यासक्रम

l टेक्निकल ग्रुप -

इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी.

l कॉमर्स ग्रुप -

लॉजिस्टिक अॅण्ड सप्लाय मॅनेजमेंट, मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, फायनान्सियल ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग, इन्शुरन्स.

l हॉस्पिटॅलिटी ग्रुप -

फूड प्रोडक्शन, टु‌रिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट.

l पॅरामेडिकल ग्रुप -

मेडिकल लॅब टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, चाइल्ड अॅण्ड हेल्थकेअर सर्व्हिसेस.


उत्तर लिहिले · 5/6/2022
कर्म · 48555

Related Questions

जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
सावित्रीबाई विद्यापीठ कुठे आहे?
मुक्त विद्याीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर llb साठी प्रवेश मिळतो का?
B.sc + B.ed विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहेत?
मला AIIMS नागपूर कॉलेज मध्ये MBBS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे? पण जर मला 130 ते 200 ते 300 मार्क्स मिळाले तर तिथे मला ऍडमिशन मिळेल का?
एमसीव्हीसी म्हणजे काय? त्यामध्ये उत्तम करीअर कोणते आहे?
B.B.A. नंतर कोणते कोर्स करता येतात?