शब्दाचा अर्थ ई-कॉमर्स

ई-कॉमर्स म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

ई-कॉमर्स म्हणजे काय?

4
ई-कॉमर्स म्हणजे काय?

ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण जी काही ऑनलाईन शॉपिंग करतो,ती सगळी ई कॉमर्स मध्ये येते.

सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांनी केली.त्यांनी 2007 साली Flipcart ही कंपनी काढली आणि ऑनलाईन पुस्तके विकण्यास सुरवात केली.आता Flipcart चा विस्तार खूप मोठा झाला आहे आणि ह्या कंपनीची किंमत अंदाजे 1000 बिलियन डॉलर इतकी आहे.भारतात ई कॉमर्सचा पाया हा Flipcart ने घातला.

ई कॉमर्स चे चार प्रकार आहेत:

1)Business to Business
2)Business to customer
3)customer to Business
4)customer to customer

ई कॉमर्समुळे व्यापार क्षेत्राचा विस्तार झाला आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीची वस्तू थेट घरबसल्या मिळू शकते.Cash on delivery ने तर ग्राहक वर्गात देवाणघेवाणाच्या बाबतीत सुरक्षितेची हमी निर्माण केली आहे.

ई कॉमर्समुळे मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांसाठी बाजारपेठ मिळते. ई कॉमर्स मध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाची भूमिका फार महत्त्वाची आहे.ई कॉमर्स द्वारे आपण आपला प्रॉडक्ट ई कॉमर्स वेबसाईटवर कोठे विकू शकतो.आपल्याला ई कॉमर्स मुळे बाजारपेटीचा सागर मिळतो.

उत्तर लिहिले · 17/2/2021
कर्म · 14895
2
ई कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती | E-Commerce Information in Marathi

ई कॉमर्स चे संक्षिप्त रूप इलेक्ट्रॉनिक कॉमर्स होय. या मध्ये इंटरनेट आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवेची खरेदी आणि विक्री चे व्यवहार होत असतात आणि या व्यवहारा संबंधित पैसे सुद्धा ऑनलाईन पाठवले जातात, हि सर्व प्रक्रिया ऑनलाईन इंटरनेट च्या माध्यमातून पूर्ण होत असते.

ईकॉमर्स ला अधिक सोप्या शब्दात सांगायचे तर ऑनलाइन इंटरनेट वर शॉपिंग करणे यालाच ई-कॉमर्स म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स हा संपूर्ण जगामध्ये इंटरनेटसारख्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक नेटवर्क च्या जाळ्या च्या मदतीने व्यवसाय करण्याचा एक सर्वोकृष्ट मार्ग आहे. हा इंटरनेटवरचा व्यवसाय आहे. ई-कॉमर्स हे इंटरनेटवर उत्पादनांची खरेदी आणि विक्री मानले जाते. 
             
ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडण्याची काहीही गरज पडत नाही. तसेच तुम्ही खरेदी केलेल्या प्रॉडक्ट ची डिलेव्हरी घरपोच मिळते. अश्याच प्रकारे खूप सारे लोक घरी बसून शॉपिंग करतात. जसे कि amazon, flipkart, ebay, paytm, myntra, OLX इ. इंटरनेटद्वारे 
ऑनलाईन शॉपिंग करण्याची सुविधा प्रदान करतात.


तसेच ई कॉमर्स मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची खरेदी केल्यानंतर पेयमेन्ट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये कॅश व डिलेव्हरी म्हणजेच आपल्याला जेव्हा त्या प्रॉडक्ट ची डिलेव्हरी केल्या जाईल तेव्हा पैसे देणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे ई-पेमेंट ऑनलाईन पेयमेन्ट करणे होय. जसे कि, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट किंवा UPI व्यवहार इ.

ई-कॉमर्स चे प्रकार | Type of Ecommerce in Marathi

जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स चा विचार केल्या जातो तेव्हा साधारणतः पुरवठादार आणि ग्राहक या दोन व्यक्ती मध्ये ऑनलाइन व्यवहार होत असतो. तर चला ई-कॉमर्स चे चार मूलभूत प्रकार याबद्दल जाणून घेऊ.
  • व्यवसाय ते ग्राहक। Business to Consumer (B2C)
या ई कॉमर्स च्या प्रकारांमध्ये व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात व्यवहार केल्या जातो. म्हणजेच व्यवसाय एखाद्या वस्तूची विक्री थेट ग्राहकांना करतो. जसे कि, Flipkart, Amazon या कंपनी कडून ग्राहक थेट वस्तू किंवा सेवा खरेदी करतो
  • व्यवसाय ते व्यवसाय । Business to Business (B2B)
यामध्ये व्यवसाय ते व्यवसाय यांच्या व्यवहार केले जातात म्हणजेच एखाद्या व्यवसायाला लागणार कच्चा माल किंवा इतरहि काही माल किंवा प्रॉडक्ट व्यवसायाला प्रदान केले जाते.
  • ग्राहक ते ग्राहक । Consumer to Consumer (C2C)
जेव्हा एखाद्या ग्राहकाने त्याचे उत्पादन दुसऱ्या ग्राहकाला इंटरनेटवर विकले तेव्हा या व्यवहाराला ग्राहक-ते-ग्राहक व्यवहार म्हणतात. जसे किं, OLX.
  • ग्राहक ते व्यवसाय । Consumer to Business (C2B)
B2C मध्ये व्यवसाय ग्राहकाला वस्तू किंवा सेवेची विक्री करत असतो अगदी त्याच्या उलट यामध्ये ग्राहक हा व्यवसायाला उत्पादने किंवा सेवा प्रदान करत असतो. C2B यामध्ये Google Adsense, Commission Junction आणि Amazon इत्यादींचा समावेश होतो.

ई कॉमर्स काय आहे? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्हाला ई-कॉमर्स याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या मराठी स्पिरिट साईट ला नक्की व्हिझिट करा, तेथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात महत्वाची आणि उपयुक्त माहिती मिळेल एकदा नक्कीच भेट द्या.

उत्तर लिहिले · 31/5/2022
कर्म · 2195

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?