1 उत्तर
1
answers
पासपोर्ट कार्यालयात कोण कोणते प्रश्न विचारले जातात?
6
Answer link
पासपोर्ट कार्यालयाचे काम तुमचे कागदपत्रे तपासून तुम्हाला पासपोर्ट देणे किंवा त्यात बदल करणे इतकेच असते. तुमची मुलाखत घेणे पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकारात येत नाही.
पासपोर्ट कार्यालयात तुमचे कागदपत्रे पडताळून पाहिले जातात. आणि त्यात काही त्रुटी असेल तर ती दूरस्थ करायला लावतात. म्हणून तुम्ही सगळे मागितलेली कागदपत्रे सोबत घेऊन जा.
तरीही प्रश्न विचारलेच तर ते तुमच्या कागदपत्रांसंबंधी असतील किंवा असे असतील ज्याची तुम्हाला तयारी करायची गरज नाही.
खरी मुलाखत पोलीस पडताळणीच्या वेळेस होते, जिथे तुम्हाला पोलीसाकडून अनेक प्रश्न विचारले जातील जेणेकरून तुम्ही गुन्हेगार नाही असे सिद्ध होऊन तुम्हाला पासपोर्ट दिला जाईल.