1 उत्तर
1
answers
भारत देश कोणकोणत्या वस्तू आयात करतो?
6
Answer link
भारत असो व कोणताही देश हे त्यांच्या गरजेनुसार वस्तूंना आयात करत असतो. भारत ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी साठी भारताला इतर राष्ट्रांवर अवलंबून रहावे लागते. ह्याचा अर्थ असा नाही की भारत निर्यात करत नाही,पण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण आहे अशी कोणतच राष्ट्र ह्या जगात नाही. भारत सध्या बऱ्याच क्षेत्रातल्या वस्तू आयात करतो.
सध्या स्थितीत भारत पुढील गोष्टीवर इतर राष्ट्रांवर अवलंबून आहे.
खनिज तेल
शस्त्र सामुग्री
सोने-चांदी
मौल्यवान रत्ने (कचय्या स्वरूपात)
इलेक्ट्रॉनिक वस्तू
औद्योगिक यंत्रे
रासायनिक खते
डाळ व कडधान्य (गरज भासल्यास)