2 उत्तरे
2 answers

गूतवणूक कशी करावी?

4
वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई आणि भविष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे किंवा गरजा यांच्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. खाली काही महत्वाच्या गुणतवूकी विषयी माहिती देत आहे
 

@इक्विटी:
भारतीय शेअर बाजाराला मोठी क्षमता आहे. भारतीय कंपन्या सतत चांगली वाटचाल करीत आहेत. बर्‍याच क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढत आहे. ब्लू-चिप्स कंपन्या या सर्व वेळत म्हणजे जेंव्हा अर्थव्यवस्था चांगली असते अथवा आजच्या परिस्थितीसारखी आशंकित असेली तरी खरेदी करण्या योग्य असतात. . एच डी एफ सी बँक , रिलायन्स, बजाज फायनान्स आणि मारुती टी सी एस सारखे स्टॉक भविष्यात एक चांगला परतावा देऊ शकतात .
@म्युच्युअल फंड:
ज्यांना डायरेक्ट इक्विटी समजू शकत नाही, त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी म्युच्युअल फंड हे सर्वोत्तम मार्ग आहे. त्यातही एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे ज्यात ४/५ प्रकारचे वेगवेगळे म्युच्युअल फंड असतील. कोर आणि सॅटेलाईट दृष्टिकोनातून असा पोर्टफोलिओ तयार करण्याचा विचार केला पाहिजे. या पॅटर्नमध्ये इंडेक्स फंडात किंवा लार्ज आणि मिडकॅप फंडामध्ये पैसा अधिक प्रमाण जवळजवळ ५०% गुंतविला जातो . एसआयपी गुंतवणूकीसाठी लार्ज-कॅप मध्ये १० ते ११% उत्पन्न मिळवू शकते. हे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान करतात आणि शेयर बाजारातील चढ़ उताराचा धोका कमीतकमी करण्याचा प्रयत्न करतात उरलेला लहान हिस्सा २० ते १५% चांगल्या प्रतीच्या मिड आणि स्मॉल कॅप फंडामध्ये सॅटेलाइट पोर्टफोलिओ च्या अंतर्गत गुंतविला जातो ज्यामध्ये १३ ते १६% पर्यंत उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. उरलेले २५ ते ३०% हे चांगल्या प्रतीच्या हायब्रीड इक्विटी फंडात गुंतवू शकतात जेणेकरून पडत्या बाजारात हा फंड तुमची जोखीम कमी करण्या साठी उपयूक्त ठरू शकेल . अशा प्रकारे बनवलेला पोर्टफोलिओ तुम्हाला चांगला परतावा पण देऊ शकतो असेच तुमची जोखीम हि योग्य प्रमाणात ठेवतो.
@डेट मालमत्ता वर्गातील गुंतवणुकीची साधनें :

नियमित उत्पन्न आणि भांडवली लाभ या दुहेरी फायद्यासाठी डेट मालमत्ता वर्गातील गुंतवणुकीची साधनें हा चांगला पर्याय आहे. हि साधने इक्विटी बाजारातील चढ-उतारांचा पोर्टफोलिओ च्या मूल्यावर होणार प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतात . खालील काही डेट वर्गातील उत्तम गुंतवणुकीचे पर्याय आहेत.
@डेट म्युच्युअल फंड:
चांगल्या प्रतीच्या डेट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा. इक्विटीच्या तुलनेत डेट गुंतवणूक भांडवल संरक्षण आणि उत्पनाची हमी देते असते . डेट म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडा पेक्षा अस्थिरता कमी आहे. बर्‍याच वेळा चांगल्या प्रतीच्या बॅलन्स फंडाने परताव्या मध्ये लार्ज-कॅप फंडलाही मागे टाकले आहे. हायब्रीड फंड हा देखील चांगला एक पर्याय आहे. अल्प मुदतीच्या फंडांमध्ये अल्प मुदतीच्या आर्थिक उद्दीष्टांसाठी एसआयपी आणि मध्यम-मुदतीच्या तसेच दीर्घ मुदतीच्या उद्दीष्टांसाठी दीर्घ मुदतीच्या डेट म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक करू शकतात. लिक्विड फंड आणि आर्बिट्राज फंड हि चांगले पर्याय आहेत.
@पीपीएफ:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. पीपीएफ सर्वोत्तम आणि सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूकींपैकी एक पर्याय आहे परंतु याचा लॉकिंग कालावधी १५ वर्षांचा आहे. हि योजना भारत सरकार चालविते. त्यामुळे पीपीएफ वरील व्याज आणि आपली गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते, पीपीएफ EEE प्रकरात मोडते. म्हणजे गुंतवणूक करताना तुम्ही ८० क अंतर्गत गुंतवणुकीवर वर १,५०,००० लाख पर्यंत कराची सवलत घेऊ शकतात. वर्षभरात कमावलेले व्याज पूर्णपणे करमुक्त आणि जेंव्हा तुमचे पीपीएफ ची मुदत पूर्ण होते तेव्हा सर्व रक्कम हि करमुक्त असते.
@बँक मुदत ठेवी:
बँक एफडी हे भारतीयांमध्ये गुंतवणूकीचे सर्वात आवडता पर्याय आहे. जे हमी व्याज देखील देतात आणि तुमची गुंतवणूक देखील सुरक्षित ठेवतात
या शिवाय एनपीएस (NPS) आणि पोस्ट च्या छोट्या बचत योजना बँक आवर्ती ठेव योजना अश्या अजून काही योजना येतात.
     @ सोने:
महागाईविरूद्ध सोन्याला एक चांगले हत्यार मानले गेले आहे.सोन्यात ५ ते १०% गुंतवणूक (एक्सपोजर) पुरेशी आहे. आपण गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड बाँडद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता.
स्थावर मालमत्ता: स्थावर मालमत्तेच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवासी मालमत्तांच्या किंमती स्थिर आहेत. परंतु व्यावसायिक मालमत्ता आणि जमिनीवर केलेली गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरू शकते.
उत्तर लिहिले · 20/1/2021
कर्म · 210095
0

गुंतवणूक (Investment) कशी करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, खासकरून जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याची आर्थिक योजना करत असता. गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि कोणता मार्ग निवडायचा हे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, जोखमीच्या क्षमतेवर आणि वेळेवर अवलंबून असते.

गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी:

  • आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा: तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत, किती वेळेसाठी गुंतवायचे आहेत आणि त्या गुंतवणुकीतून तुम्हाला काय मिळवायचे आहे, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे.
  • तुमची जोखीम क्षमता ओळखा: काही गुंतवणुकींमध्ये जास्त धोका असतो, तर काही गुंतवणुकींमध्ये कमी. तुमची जोखीम घेण्याची तयारी किती आहे, हे ठरवणे महत्त्वाचे आहे.
  • संशोधन करा: गुंतवणूक करण्यापूर्वी विविध पर्याय आणि त्यांच्याशी संबंधित धोके तसेच फायदे समजून घेणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीचे काही सामान्य मार्ग:

  1. शेअर बाजार (Stock Market): शेअर्समध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या मालकीचा भाग खरेदी करणे. यात जास्त फायदा होण्याची शक्यता असते, पण धोकाही जास्त असतो.
  2. रोखे (Bonds): रोखे म्हणजे सरकार किंवा कंपनीकडून घेतलेले कर्ज. हे शेअर्सपेक्षा कमी धोकादायक असतात.
  3. म्युच्युअल फंड (Mutual Funds): म्युच्युअल फंड अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून शेअर्स, रोखे आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. हे वैयक्तिक शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कमी धोकादायक असतात.
  4. रिअल इस्टेट (Real Estate): जमीन, घर किंवा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे म्हणजे रिअल इस्टेट. यात भाडे मिळण्याची शक्यता असते आणि मालमत्तेचे मूल्य वाढू शकते.
  5. ठेवी (Deposits): बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. यात व्याज मिळते, पण इतर गुंतवणुकींपेक्षा कमी परतावा मिळतो.
  6. सरकारी योजना (Government Schemes): सरकार नागरिकांसाठी विविध गुंतवणूक योजना चालवते, जसे की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना.

गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक निवडण्यास मदत करू शकतात.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 160

Related Questions

क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
A, B व C यांनी प्रत्येकी 20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, 5 महिन्यानंतर A ने 5000 रुपये व B ने 4000 रुपये गुंतवणूक काढून टाकली व त्याच वेळी C ने आपली गुंतवणूक 6000 रुपयांनी वाढवली, जर वर्षाअखेर त्यांना एकूण नफा 69,000 रुपये झाला असेल तर त्यातील C चा वाटा किती?
भारतीय कंपनीने ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
श्री.सुरेंद्र यांनी जिल्हा सहकारी बँकेत 2001 मध्ये 500 रुपये, 2002 मध्ये 1500 रुपये, 2003 मध्ये 2500 रुपये याप्रमाणे 2020 पर्यंत दरवर्षी रक्कम गुंतवली, तर त्यांची एकूण गुंतवणूक 2020 अखेर किती राहील?
स्थिर भांडवल म्हणजे काय?
भांडवलाचे प्रकार सोदाहरण सविस्तर स्पष्ट करा?
निर्गुंतवणूक म्हणजे काय?