
गुंतवणूक व नफा

- Bitcoin | BTC
- Dogecoin | DOGE
- Ethereum | ETH
- Litecoin
- Shiba Inu | SHIB
- Ripple |XRP
- Cardano | ADA
- Tether | USDT
- Solana | SOL
- Cryptocurrency चा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे यात फसवणुक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
- क्रिप्टोकरन्सी मध्ये अकाऊंटची सुरक्षितता खुपच जास्त असते. अणि ह्यासाठी यात वेगवेगळया Cryptography Algorithm चा देखील यात वापर केलेला असतो.
- Cryptocurrency मध्ये एकवेळा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराला रिव्हर्स करता येत नाही.
- क्रिप्टोकरेंसी चा Wallet चा ID हरवला तर आपल्याला आपल्या वॉल्लेट मधील रक्कम काढता येत नसते.
या गणितानुसार, श्री.सुरेंद्र यांनी जिल्हा सहकारी बँकेत 2001 ते 2020 पर्यंत दरवर्षी काही रक्कम गुंतवली आहे. त्यांची एकूण गुंतवणूक काढण्यासाठी, प्रत्येक वर्षी गुंतवलेली रक्कम आणि एकूण वर्षे विचारात घ्यावी लागतील.
श्री.सुरेंद्र यांनी दरवर्षी गुंतवणूक वाढवत नेली आहे. 2001 मध्ये 500 रुपये, 2002 मध्ये 1500 रुपये, 2003 मध्ये 2500 रुपये... याप्रमाणे. यावरून प्रत्येक वर्षी 1000 रुपयांची वाढ होत आहे.
2001 ते 2020 पर्यंत एकूण 20 वर्षे होतात.
हे गणित सोडवण्यासाठी आपण अंकगणिती श्रेणीचा (Arithmetic Progression) वापर करू शकतो.
पहिला हप्ता (First term, a): 500 रुपये (2001 मध्ये गुंतवलेली रक्कम)
Ortowa (Common difference, d): 1000 रुपये (प्रत्येक वर्षी वाढणारी रक्कम)
n (Number of terms): 20 (एकूण वर्षे)
अंकगणिती श्रेणीनुसार एकूण गुंतवणूक (Sum of n terms, Sn) काढण्याचे सूत्र:
Sn = n/2 [2a + (n-1)d]
आता या सूत्रानुसार:
Sn = 20/2 [2*500 + (20-1)*1000]
Sn = 10 [1000 + 19*1000]
Sn = 10 [1000 + 19000]
Sn = 10 * 20000
Sn = 2,00,000 रुपये
म्हणून, श्री.सुरेंद्र यांची 2020 अखेर एकूण गुंतवणूक 2,00,000 रुपये (दोन लाख रुपये) असेल.
@इक्विटी:
भारतीय शेअर बाजाराला मोठी क्षमता आहे. भारतीय कंपन्या सतत चांगली वाटचाल करीत आहेत. बर्याच क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढत आहे. ब्लू-चिप्स कंपन्या या सर्व वेळत म्हणजे जेंव्हा अर्थव्यवस्था चांगली असते अथवा आजच्या परिस्थितीसारखी आशंकित असेली तरी खरेदी करण्या योग्य असतात. . एच डी एफ सी बँक , रिलायन्स, बजाज फायनान्स आणि मारुती टी सी एस सारखे स्टॉक भविष्यात एक चांगला परतावा देऊ शकतात .
@म्युच्युअल फंड:
ज्यांना डायरेक्ट इक्विटी समजू शकत नाही, त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी म्युच्युअल फंड हे सर्वोत्तम मार्ग आहे. त्यातही एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे ज्यात ४/५ प्रकारचे वेगवेगळे म्युच्युअल फंड असतील. कोर आणि सॅटेलाईट दृष्टिकोनातून असा पोर्टफोलिओ तयार करण्याचा विचार केला पाहिजे. या पॅटर्नमध्ये इंडेक्स फंडात किंवा लार्ज आणि मिडकॅप फंडामध्ये पैसा अधिक प्रमाण जवळजवळ ५०% गुंतविला जातो . एसआयपी गुंतवणूकीसाठी लार्ज-कॅप मध्ये १० ते ११% उत्पन्न मिळवू शकते. हे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान करतात आणि शेयर बाजारातील चढ़ उताराचा धोका कमीतकमी करण्याचा प्रयत्न करतात उरलेला लहान हिस्सा २० ते १५% चांगल्या प्रतीच्या मिड आणि स्मॉल कॅप फंडामध्ये सॅटेलाइट पोर्टफोलिओ च्या अंतर्गत गुंतविला जातो ज्यामध्ये १३ ते १६% पर्यंत उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. उरलेले २५ ते ३०% हे चांगल्या प्रतीच्या हायब्रीड इक्विटी फंडात गुंतवू शकतात जेणेकरून पडत्या बाजारात हा फंड तुमची जोखीम कमी करण्या साठी उपयूक्त ठरू शकेल . अशा प्रकारे बनवलेला पोर्टफोलिओ तुम्हाला चांगला परतावा पण देऊ शकतो असेच तुमची जोखीम हि योग्य प्रमाणात ठेवतो.
@डेट मालमत्ता वर्गातील गुंतवणुकीची साधनें :
नियमित उत्पन्न आणि भांडवली लाभ या दुहेरी फायद्यासाठी डेट मालमत्ता वर्गातील गुंतवणुकीची साधनें हा चांगला पर्याय आहे. हि साधने इक्विटी बाजारातील चढ-उतारांचा पोर्टफोलिओ च्या मूल्यावर होणार प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतात . खालील काही डेट वर्गातील उत्तम गुंतवणुकीचे पर्याय आहेत.
@डेट म्युच्युअल फंड:
चांगल्या प्रतीच्या डेट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा. इक्विटीच्या तुलनेत डेट गुंतवणूक भांडवल संरक्षण आणि उत्पनाची हमी देते असते . डेट म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडा पेक्षा अस्थिरता कमी आहे. बर्याच वेळा चांगल्या प्रतीच्या बॅलन्स फंडाने परताव्या मध्ये लार्ज-कॅप फंडलाही मागे टाकले आहे. हायब्रीड फंड हा देखील चांगला एक पर्याय आहे. अल्प मुदतीच्या फंडांमध्ये अल्प मुदतीच्या आर्थिक उद्दीष्टांसाठी एसआयपी आणि मध्यम-मुदतीच्या तसेच दीर्घ मुदतीच्या उद्दीष्टांसाठी दीर्घ मुदतीच्या डेट म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक करू शकतात. लिक्विड फंड आणि आर्बिट्राज फंड हि चांगले पर्याय आहेत.
@पीपीएफ:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. पीपीएफ सर्वोत्तम आणि सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूकींपैकी एक पर्याय आहे परंतु याचा लॉकिंग कालावधी १५ वर्षांचा आहे. हि योजना भारत सरकार चालविते. त्यामुळे पीपीएफ वरील व्याज आणि आपली गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते, पीपीएफ EEE प्रकरात मोडते. म्हणजे गुंतवणूक करताना तुम्ही ८० क अंतर्गत गुंतवणुकीवर वर १,५०,००० लाख पर्यंत कराची सवलत घेऊ शकतात. वर्षभरात कमावलेले व्याज पूर्णपणे करमुक्त आणि जेंव्हा तुमचे पीपीएफ ची मुदत पूर्ण होते तेव्हा सर्व रक्कम हि करमुक्त असते.
@बँक मुदत ठेवी:
बँक एफडी हे भारतीयांमध्ये गुंतवणूकीचे सर्वात आवडता पर्याय आहे. जे हमी व्याज देखील देतात आणि तुमची गुंतवणूक देखील सुरक्षित ठेवतात
या शिवाय एनपीएस (NPS) आणि पोस्ट च्या छोट्या बचत योजना बँक आवर्ती ठेव योजना अश्या अजून काही योजना येतात.
@ सोने:
महागाईविरूद्ध सोन्याला एक चांगले हत्यार मानले गेले आहे.सोन्यात ५ ते १०% गुंतवणूक (एक्सपोजर) पुरेशी आहे. आपण गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड बाँडद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता.
स्थावर मालमत्ता: स्थावर मालमत्तेच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवासी मालमत्तांच्या किंमती स्थिर आहेत. परंतु व्यावसायिक मालमत्ता आणि जमिनीवर केलेली गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरू शकते.