उपहारगृह
ताज हॉटेल कोणाचे आहे?
3 उत्तरे
3
answers
ताज हॉटेल कोणाचे आहे?
9
Answer link
मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. जरी दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या तरी सुद्धा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्रज्ञांकडून झालेले आहेत.
ताजमहाल पॅलेस हॉटेल
जॅकलीन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, ए्डिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, ॲंजेलिना जॉली, बॅडपीट, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा या जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसला भेट देऊन तेथील आदरातिथ्य घेतले
धन्यवाद..
0
Answer link
ताज हॉटेल हे 'इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड' (Indian Hotels Company Limited) च्या मालकीचे आहे, जी टाटा समूहाचा (Tata Group) भाग आहे.
या कंपनीची स्थापना जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांनी 1903 मध्ये केली.
पहिला ताजमहाल पॅलेस हॉटेल (Taj Mahal Palace Hotel) मुंबईमध्ये बांधला गेला, जो भारतातील पहिला लक्झरी हॉटेल होता.