निवडणूक मतदान कार्ड

रंगीत मतदान कार्ड कसे बनवावे?

1 उत्तर
1 answers

रंगीत मतदान कार्ड कसे बनवावे?

3
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे.

👨🏼‍🦰 *तुम्हालाही जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देत आहोत.*

1. रंगीत मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या घराच्या पत्त्यासंबंधीचा पुरावा (address proof), वय व जन्मतारखेसंबंधित पुरावा आणि तुमचा एक फोटो सोबत ठेवा.

2. नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) च्या वेबसाईटवर जा

3. होमपेजवर व्होटर पोर्टल बॉक्सवर क्लिक करा. आता तुम्हाला https://voterportal.eci.gov.in पोर्टल दिसेल.

4. या पेजवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला नवीन अकाऊट बनवावं लागेल. इथे तुम्ही गुगल, फेसबुक किंवा कोणत्याही इतर अकाउंटचा वापर करु शकता.

5. रजिस्ट्रेशननंतरच्या पेजवरील फॉर्म भरा.

6  इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि इतर माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर एकदा फॉर्म तपासा आणि खाली दिलेल्या सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर काही दिवसांनी तुमचं रंगीत मतदार ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.
उत्तर लिहिले · 4/12/2020
कर्म · 569205

Related Questions

एक देश एक, निवडणूक म्हणजे काय?
निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय?
ग्रामपंचायत निवडणूक किती वर्षांनी होतात?
राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते?
विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व कोणत असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसा निवडून येतो?
मला एक जल प्रदुषण प्रकल्प करायचा आहे व त्याचे मुद्दे प्रस्तावना,प्रकल्पाची निवड, उद्दिष्टे, प्रकल्पाचे महत्त्व, अभ्यास पद्धती, माहितीचे संकलन व सादरीकरण, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष, शिफारशी, संदर्भग्रंथ सुची, मुल्यमापन तक्ता, प्रमाणात इ सर्व कसे करावे?
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते?