पोशाख दुकान

कपड्यांचे दुकान सुरू करायचे आहे त्यासाठी काही नवीन आयडिया सुचवा?

1 उत्तर
1 answers

कपड्यांचे दुकान सुरू करायचे आहे त्यासाठी काही नवीन आयडिया सुचवा?

5
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांच्या पैकी आपण सर्वात जास्त खर्च करतो तो अर्थातच खाण्यापिण्यावर आणि त्यानंतर नंबर लागतो तो कपड्यांचा. आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे ग्राहकांची सुद्धा काहीच कमी नाही. आणि सध्याचा काळ हा रेडिमेड कपड्यांचा आहे असे म्हणता येईल. कारण य शिंप्यां कडून कपडे शिवून घेण्याचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे.

वय वर्ष एक ते 16 17 या वयोगटातील मुला-मुलींच्या कपड्यांची मागणी खूपच आहे. कारण सतत बदलत्या शरीराच्या मापा मुळे यांना वारंवार नवीन कपड्यांची खरेदी करावी लागते.

याव्यतिरिक्त कारखान्यांमधील कामगारांना लागणारे कपडे, हॉस्पिटलमधील वॉर्ड बाॉय, नर्सेस यांना लागणारे कपडे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे वैशिष्ट्यपूर्ण कपडे आपण पुरवू शकता.

तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे सुरु करणार आहे ते ठरवावे, स्वतःची जागा असेल तर ठीक आहे भाड्याने असेल तर सर्व प्रकारच्या कायदेशीर करार पूर्ण करून घ्यावे,करण तुम्हाला भाड्याने जागा असेल तर तात्पुरते फर्निचर करता येतं लोखंडी प्लस ग्लास,

सर्वप्रथम तुम्ही कापड दुकान टाकायचे हे निश्चित करून अनुभव म्हणून कोणत्याही कापड दुकानात कमीत कमी दोन ते तीन महिन्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे,तेथ तुम्ही सर्व प्रकारच्या साईज व फॅब्रिक याचे चांगले ज्ञान मिळवू शकता.

आता राहिला विषय खरेदी चा तर तुमच्या बजेट नुसार तुम्ही खरेदी करू शकता,तुमच्या जिल्ह्यातील कापड होलसेलर distributer कडे तुम्ही hosiery व तूट वाण घेऊ शकता,

पण मुख्य खरेदी ही manufacturer कडे केलेली कधीही फायदेशीर असते,

खरेदी साठी शहरे

कोलकाता,मुंबई,उल्हासनगर, सोलापूर,इंदोर, दिल्ली, अमरावती, नागपूर,जबलपूर, बंगलोर, अहमदाबाद,तिरुपुर,लुधियाना, हे सर्व रेडीमेड manufacturer मंडी आहेत.

साडी साठी

सुरत,कोलकता,बनारस,महू,बंगलोर,मुंबई,धर्मावरम,मालेगाव,बेळगाव असे अनेक शहरे आहेत तेथे आपण स्वतः जाऊन खरेदी करू शकता.

राहिला खर्चाचा व भांडवलाचा तर तुम्ही कमीत कमी पाच लाख रुपयाने व्यवसाय सुरू करू शकता फक्त रेडिमेड दुकान पण जर तुम्हाला मल्टीब्रँड ठेवायचे आहे तर आणखी भांडवल लागेल.

तुम्ही एकदा व्यवसाय सुरू केला की आपल्या व्यवसायवर बँक कॅश क्रेडिट कर्ज देते त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता व एकदा तुमचा व्यापाऱ्यांशी (manufacturer) व्यावसायिक संबंध जुळली की तुम्हाला 45 दिवसाचे क्रेडिट ही मिळते.

पण त्या साठी आपला व्यवहार व क्रेडिट हे उत्कृष्ट व कुशल असावे.
उत्तर लिहिले · 18/11/2020
कर्म · 20065

Related Questions

मुलगी बघायला जाताना कोणता पोशाख परिधान केला पाहिजे, सोबतच अजून काय काळजी घेतली पाहिजे?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
गावातील घर पोशाख वाहने यांची यादीलिहा?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?
एखादे जुने कापड कोणत्या दोन वस्तू तयार करा?
शिलाई मशीन दोरा का तोडते, कारण काय?
कात कशापासून तयार होते ?