पोशाख वनस्पतीशास्त्र झाडे

कात कशापासून तयार होते ?

1 उत्तर
1 answers

कात कशापासून तयार होते ?

2
कात : मुख्यतः खैर वृक्षाच्या (ॲकेशिया कॅटेच्यू) लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळविल्यावर जो धन पदार्थ मिळतो त्यास `कात’ असे म्हणतात. खैराशिवाय थोडया प्रमाणात ताज्या सुपाऱ्या, आवळी फळ, गॅंबिअर झाडाची (युन्कॅरिया गँबीर) पाने कात तयार करण्यासाठी वापरतात. खैर झाडापासून `कात’ व `कच्छ’ असे दोन पदार्थ मिळतात. ज्यामध्ये कॅटेचीन जास्त प्रमाणात असते त्यास `कात’ व ज्यामध्ये कॅटेच्यू टूनिक अम्ल जास्त असते त्यास `कच्छ’ असे म्हणतात. भारतामध्ये कात विड्यातून खातात तसेच त्याचा औषधातही उपयोग करतात. कच्छचा उपयोग कपडे रंगविण्यासाठी व कापड छपाईमध्ये तसेच गॅंबिअर काताऐवजी कधीकधी करतात. सामान्यतः `कात’ आणि `कच्छ’ या दोहोंनाही कात म्हणूनच ओळखले जाते. खैर वृक्ष भारत व ब्रह्मदेश या देशांतील जंगलात आढळतात.

सरळ झाडापेक्षा वेड्यावाकड्या झाडांपासून कात जास्त मिळतो. नुकत्याच तोडलेल्या झाडापासून मिळणाऱ्या काताचे प्रमाण वाळलेल्या झाडापेक्षा जास्त असते. मेलेल्या झाडापासून कात निघत नाही. शरद ऋतूत व हिवाळ्यात तोडलेल्या झाडांपासून कात जासत मिळतो. झाडाचा बुंधा ६०-१२० सेंमी. व्यासाचा झाल्यावर व झाडावर पांढऱ्या रेषा किंवा ठिपके दिसल्यास ती तोडतात. एका झाडापासून त्याच्या लाकडाच्या ७%   कात मिळतो.

खैर झाडामध्ये एल एपिकॅटेचीन, रॅसेमिक ॲककॅटेचीन व कॅटेच्यू टूनिक अम्ल ही संयुगे असतात. जून झाडात `खीरसळ’ हे करडे पांढरे स्फटिकीय चूर्ण सापडते. त्यात प्रामुख्याने एल एपिकॅटेचीन हे संयुग आढळते. कात तयार होत असताना एपिकॅटेचिनाचे रॅसेमिक ॲककॅटेचिनामध्ये रुपांतर होते. ते थंड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे), तर उष्ण पाण्यात विद्राव्य असून पाण्याच्या सानिध्यात त्याचे ऑक्सिडीकरण  [ऑक्सिडीभवन] होऊन कॅटेच्यू टूनिक अम्ल बनते.
उत्तर लिहिले · 27/9/2020
कर्म · 3835

Related Questions

वनस्पतीची वाढ करणे हे.कोणत्या ऊतीचे महत्वाचे कार्य आहे?
भारतात भारतातील वनांचे वर्गीकरण सविस्तर लिहा?
पिकांमध्ये वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना ______म्हणतात?
युरेनियम व आर्सेनिक शोषून घेणारी वनस्पती कोणती?
कीटकभक्षी‌ वनस्पतींचा रंग आकर्षक असतो त्याचा कारण कोणते?
स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीतील स्वयंपोषी वनस्पती कोणत्या पातळीवर आहेत?
मानव प्राणी व वनस्पतीमुळे खडकांचे कोणती विदारण होते?