पोशाख
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरचे लोक तुम्हाला बारकाईने बघत असतात. त्यामुळे काही खास गोष्टींची काळजी घ्या.
मुलगी बघायला जाताना या गोष्टींची घ्या काळजी
: जुळवलेल्या लग्नात मुलीला बघायला जाणं हे सर्वात पहिली आणि महत्वाची प्रोसेस असते. जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल किंवा मुलगी बघायला जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरचे लोक तुम्हाला बारकाईने बघत असतात. त्यामुळे काही खास गोष्टींची काळजी घ्या.
1) बघायला जात असलेल्या मुलीच्या घरच्यांबाबत पूर्ण माहिती घ्या. घरातील लहान मुलांची नावे जाणून घ्याल तर तुमचं इम्प्रेशन पडेल.
2) कपडे असे घाला ज्यात तुम्ही सहज असाल. जास्त फॅशनच्या फंद्यात विचित्र दिसाल असे कपडे परिधान करु नका.
(पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!)
(पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!
असे म्हणतात की, लोक पहिली भेट कधीच विसरत नसतात. तुमची पहिली भेट तुमच्या नात्याला नवीन दिशा देणारी ठरते. अशात तुम्ही जर एखाद्या मुलीला भेटणार असाल तर ती भेट अधिकच स्पेशल असते. त्यामुळे पहिल्या भेटीत मुली काय नोटीस करतात, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. चला जाणून घेऊया मुली कोणत्या गोष्टी नोटीस करतात.
1) शारीरिक मापदंड
अर्थातच मुलीचं सर्वातआधी लक्ष तुमच्या शरीरयष्टीवर जातं. खूप जास्त उंची असलेले किंवा कमी उंची असलेले मुले मुलींना फार आवडत नाहीत. भारतात 5.4 ते 6.2 फूट उंची सामान्य मानली जाते.
2) तुमचं दिसणं
शरीरयष्टीनंतर मुली लक्ष देतात ते तुमच्या दिसण्यावर, तुमच्या चेह-यावर. प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते त्यामुळे कुणाला तुम्ही आवडाल तर कुणाला नाही. पण दाढी-केस नीट करुन गेलात तर बरं होईल.
3) तुमचं हसणं
पहिल्या भेटीत तुम्हा दोघांचही थोडं लाजणं सामान्य बाब आहे. पहिल्या भेटीत प्रत्येकालाच एकमेकांचा हसरा चेहरा बघायचा असतो. त्यामुळे मुली सुद्धा तुमचं हसणं नोटीस करतात. पण याचा जास्त विचार करु नका. कारण हसताना प्रत्येक व्यक्ती चांगला दिसतो. फक्त फार वेड्यासारखं हसू नका.
4) तुमची विनोदबुद्धी
आपल्या गंमतीदार गोष्टींनी इतरांना हसवण्याची क्षमता ठेवणाऱ्या मुलांवर मुली जीव ओवाळतात. अशा मुलांच्या आसपास मुली राहणं पसंत करतात.
5) आत्मविश्वास
असे म्हणतात की, आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते. हे इथेही लागू होतं. तुमच्या वागण्यातील, बोलण्यातील आत्मविश्वासाकडे त्यांचं चांगलंच बारीक लक्ष असतं.
6) बोलणं
जास्तीत जास्त मुलींना अधिक बोलणं पसंत असतं. त्यामुळे त्यांच्याशी नीट बोला. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांचं ऐकायचं नाही. जितकं चांगलं तुम्ही बोलाल तितकंच चांगलं तुम्हाला ऐकताही यायला हवं. )
****************************************
3) अनेकदा अनेकजण घाई गडबडीत काहीही बोलतात. हे टाळलं पाहिजे. जे बोलायचं आहे ते विचार करुन बोला. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थही निघू शकतो.
4) सर्वांना आत्मविश्वासाने भेटा. तुमच्या बसण्यात आणि चालण्यात आत्मविश्वास असायला हवा. याने मुलीच्या घरच्यांवर तुमचं इम्प्रेशन पडेल.
5) मुलगी बघायला गेल्यावर सतत फोनवर बोलत बसू नका. फारच अर्जंट असेल तरच फोन घ्या.
6) तुम्हाला तिथे लोक काही प्रश्नही विचारतील. अशात तुम्ही शांतपणे उत्तरे द्या. अशावेळी कुणी काही विचारलंच तर इगो दुखावू देऊ नका. कारण तुम्ही इथे मुलगी बघण्यासाठी आला आहात.
7) तुम्ही आहात तसे राहा. उगाच समोरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी नाटकी वागू नका. ते कुणी नोटीस केलं तर तुमचं काम अवघड होईल.
1
Answer link
पायाला वारंवार चप्पल घासली गेल्याने झालेली जखम त्याला शू बाईट म्हणतात. यामुळे चप्पल घालणं अवघड होतं आणि वेदना जाणवतात. शूजचं मटेरिअल चांगलं नसल्यास किंवा आकारापेक्षा लहान आणि घट्ट चपला घातल्यामुळे शू बाईट होऊ शकतं. तर चला यावर घरगुती उपाय जाणून घ्या-
बँडेड
कधीकधी नवीन शूजची समस्या अशी असते की ते एका बोटावर घट्ट असतात, विशेषत: करंगळीवर. हे तेथील त्वचा काढून टाकतं, ज्यामुळे नंतर खूप वेदना होतात. हे टाळण्यासाठी, आपण त्यावर बँडेड लावू शकता. ज्याने पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी घासलं जाणार नाही.
वर्तमानपत्र
नवीन असल्यामुळे जोडा जरा घट्ट असेल तर काही जाड वर्तमानपत्राचे रोल बनवून त्यात काही दिवस ठेवावे. शूज घालत नसाल तोपर्यंत हे त्यात राहू द्या ज्याने बूट जरा मोकळे होतील. एका पायात जोडा घट्ट असेल तर ही युक्ती विशेषतः फायदेशीर ठरते.
हेअर स्प्रे
जर पाय शूच्या आत घसरत असेल किंवा बूट किंचित सैल असेल तर ते घालण्यापूर्वी पायात काही हेअर स्प्रे घाला. याने शूज एका ठिकाणी फिक्स होण्यात मदत मिळेल.यासह, शूज घालताना खूप घाम येत असेल तर मोजे घालण्यापूर्वी पायांवर पावडर लावा. पायातून दुर्गंध येणार नाही.
कॉटन पॅड
टाचांचा वरचा भाग सोलल्यास येथे कॉटन पॅड किंवा लावले जाऊ शकतात. यामुळे पायातून येणारा वास आणि घाम यापासूनही सुटका मिळेल.
नव्या चपला किंवा शूज घालण्याची मजा तेव्हा मूड खराब करुन जाते जेव्हा पायाला जखम होते किंवा खाज सुटू लागते. शू बाईट हा प्रकार सामान्य आहे. सर्वांनाच कधी ना कधी हा त्रास सहन करावा लागला असेलच. पण शू बाईटमुळे चपला किंवा शूज घालणं सोडता येत नाही म्हणून या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जाणून घ्या काही सोपे टिप्स-
पायाला वारंवार चप्पल घासली गेल्याने झालेली जखम त्याला शू बाईट म्हणतात. यामुळे चप्पल घालणं अवघड होतं आणि वेदना जाणवतात. शूजचं मटेरिअल चांगलं नसल्यास किंवा आकारापेक्षा लहान आणि घट्ट चपला घातल्यामुळे शू बाईट होऊ शकतं. तर चला यावर घरगुती उपाय जाणून घ्या-
बँडेड
कधीकधी नवीन शूजची समस्या अशी असते की ते एका बोटावर घट्ट असतात, विशेषत: करंगळीवर. हे तेथील त्वचा काढून टाकतं, ज्यामुळे नंतर खूप वेदना होतात. हे टाळण्यासाठी, आपण त्यावर बँडेड लावू शकता. ज्याने पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी घासलं जाणार नाही.
वर्तमानपत्र
नवीन असल्यामुळे जोडा जरा घट्ट असेल तर काही जाड वर्तमानपत्राचे रोल बनवून त्यात काही दिवस ठेवावे. शूज घालत नसाल तोपर्यंत हे त्यात राहू द्या ज्याने बूट जरा मोकळे होतील. एका पायात जोडा घट्ट असेल तर ही युक्ती विशेषतः फायदेशीर ठरते.
हेअर स्प्रे
जर पाय शूच्या आत घसरत असेल किंवा बूट किंचित सैल असेल तर ते घालण्यापूर्वी पायात काही हेअर स्प्रे घाला. याने शूज एका ठिकाणी फिक्स होण्यात मदत मिळेल.यासह, शूज घालताना खूप घाम येत असेल तर मोजे घालण्यापूर्वी पायांवर पावडर लावा. पायातून दुर्गंध येणार नाही.
कॉटन पॅड
टाचांचा वरचा भाग सोलल्यास येथे कॉटन पॅड किंवा लावले जाऊ शकतात. यामुळे पायातून येणारा वास आणि घाम यापासूनही सुटका मिळेल.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
|
कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर
प्रत्येक महिलेच्या कपाटात इतके कपडे असतात की, ते काढून टाकायचा विचार केला तरी मन ते कपडे फेकून द्यायला तयार होत नाही. काही कपडे बोहारी घेतात. त्या बदल्यात एखादं भांड, बादली,टब अशा काही वस्तू तुम्हाला परत देतो. त्यात साड्या, पँट, शर्ट अशा काही कपड्यांचा समावेश असतो. लहान मुलांचे कपडे, टिशर्ट वगैरे अशा वस्तू सहसा कोणी घेत नाही (म्हणजे तुम्ही गरीबांना देता, पण हल्ली त्यांनाही फार गरज नसते.)अशा कपड्यांचा उपयोग तुम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकता. कदाचित तुम्ही या आधी याचा असा वापर कधीच करुन पाहिला नसेल.
होजिअरीपासून बनवता येतील या वस्तू
सिथेंटिक कपड्यांचा करता येईल हा उपयोग
कॉटन मटेरिअलचे उपयोगच उपयोग
जुन्या साड्यांपासून बनवा असे मस्त ड्रेस की तुम्हालाही विश्वास बसणार नाही
होजिअरीपासून बनवता येतील या वस्तू
कपाटात टिशर्ट म्हणजेच होजिअरी मटेरिअलच्या अनेक कपडे असतात. त्यांचे बरेच उपयोग आतापर्यंत तुम्ही केले असतील.म्हणजे होजिअरी टिशर्टचा पायपुसण हा वापर अगदी सगळ्याच घरात सर्रास केला जातो. जुना टिशर्ट घेतला की, तो टाकला बाथरुम बाहेर… हो ना.. पण ‘कुछ अलग सोचो यार’ त्या प्लेन टिशर्टपासून तुम्हाला एखादे फॅन्सी पायपुसणे बनवता येऊ शकते. जे तुमच्या घराची शोभा देखील वाढवू शकते. आता या टिशर्टपासून आपल्याला काय काय बनवता येईल ते देखील पाहुयात
पायपुसण
आता टिशर्ट असाच बाथरुम किंवा वॉशरुम बाहेर टाकण्यापेक्षा थोडा काहीतरी नवा विचार करा ना… टिशर्टचं पायपुसण यात काय नवी असे तुम्हाला वाटत असेल तर आहे ना. तुमच्याकडे जर खूप टिशर्ट असतील तर तुम्ही हे मल्टीकलर आणि सुंदर डीझाईन्सच पायपुसण बनवूच शकता. असे डोअरमॅट हल्ली अनेक ठिकाणी रेडिमेडसुद्धा मिळतात किंवा तुमचे जुने टिशर्ट घेऊन असे डोअरमॅट बनवून देणारेही अनेक जण सध्या आहेत.
कसे बनवाल पायपुसण:
तुम्हाला जे टिशर्ट फाडायचे असतील. त्यांचे 4 ते 5 इंचाचे कपडे लांब लांब तुकडे करुन घ्या. तुम्हाला वेणी घालणे माहीतच असेल असे समजून तुम्हाला आता सगळे लांब लांब तुकडे जोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचे पायपुसणे हवे असतील तितके तुकडे तुम्हाला जोडावे लागतील. तीन तुकड्यांच्या सुरुवातीला एक टाका घालून तुम्हाला लांबसडक वेणी बांधायला घ्यायची आहे. वेणी घालून झाल्यानंतर तुम्हाला वेणीचे एक टोक घेऊन गोलाकार आकारात गुंडाळायला घ्यायचे आहे. तुम्हाला पाय पुसण्याचा आकार किती हवा आहे तितके तुम्हाला गुंडाळायचे आहे. तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह पायपुसणे तयार झालेले दिसले. जर तुमचे टि-शर्ट कलर फुल असतील तर ते पायपुसणे अधिक सुंदर दिसेल.
हेअरबँड
पायपुसणं बनवून झाल्यानंतर काही पट्टया शिल्लक असतील. तर त्याचे हेअरबँड चांगले दिसू शकतात. बाजारात मिळणारे हेअर बँड तुम्हाला कानापाठी लागतात. पण टिशर्ट पासून बनवलेले हेअरबँड अजिबात लागत नाहीत. ते दिसायलाही चांगले दिसतात.
कसे बनवाल हेअरबँड:
टिशर्टचा लांब तुकडा कापून तुमच्या डोक्याचे माप घेऊन त्याला खाली गाठ किंवा धाव दोऱ्याने शिलाई मारुन घ्या. झाल तुमचा हेअर बँड तयार. शिवाय तुम्ही बारीक बारीक पट्टा काढून त्याची वेणी बांधूनही हेअरबँड तयार करु शकता.
मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुबंई दौऱ्याला नाही अर्थ
क्लिपहोल्डर
घरात ठिकठिकाणी दिसणार हेअर क्लिप तुम्हाला एकत्र ठेवायचे असतील. तर त्यासाठी घरच्या घरी, वॉशेबल, टिशर्टपासून बनवता येणारे क्लिपहोल्डर बनवा.
कसे बनवाल क्लिप होल्डर:
टिशर्टचे साधारण 4 ते 5 इंचाचे लांब तुकडे काढून घ्या. तुकडे थोडे ताणून घ्या. त्याची सैलसर वेणी घालून घ्या. अगदी आपण केसांची वेणी घालतो.तशी वेणी घाला. बरं वेणीच्या वरच्या बाजूला टिशर्टपासूनच एक होल्डर करुन घ्या. हे होल्डर तुम्ही खिडक्यांना पडद्याच्या रॉडवर अडकवू शकता आणि त्याला तुमचे सगळे क्लिप लावू शकता.
क्रोकरी क्लिनर
बनियन, टिशर्टचा कपडा इतका नरम आणि मुलायम असतो की, तुमच्या नाजूक वस्तू साफ करण्याचे काम तो करु शकतो. जर तुमच्या टिशर्ट किंवा बनियनची अगदीच दुरवस्था झाली असेल. तर त्याचे साधारण चौकोनी तुकडे कापून तुम्ही त्यांचा वापर क्रोकरी क्लिनर म्हणून करु शकता. या शिवाय घरी असलेल्या काचेच्या इतर वस्तू पुसण्यासाठी, टेबल टॉप पुसण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.
ट्रेंडी बॅग
प्लास्टिक बंदी झाल्यापासून अनेक जण कापडी बॅगा वापरायला लागले आहेत. जर तुम्हाला मजबूत आणि हटके बॅग हवी असेल तर तुम्ही जुन्या टिशर्टपासून बॅग बनवू शकता. आता बॅग बनवण्यासाठी अशा टिशर्टची निवड करा. जे टिशर्ट बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असतील. टिशर्ट जर प्रिंटेट असतील तर तुमची बॅग जास्त कलरफुल आणि चांगली दिसू शकेल.
कशी बनवाल बॅग:
तुम्हाला ज्या आकाराची बॅग बनवायची आहे. त्या आकाराचा टिशर्ट तुम्ही घ्या. टिशर्टचा खालील भाग शिवून घ्या. आणि बाह्या कापून टाका… तुमची बॅग तयार… तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह डोकं लावूनही बॅगसच्या वेगवेगळ्या डीझाईन्स करता येऊ शकतात.
उशीचे कव्हर
जर तुम्ही तुमच्या उशीला थेट उशीचे कव्हर घालत असाल तर आतापासून तसे करु नका. कारण उशीला थेट कव्हर घालण्यामुळे उशीवर थेट डाग पडण्याचू शक्यता जास्त असते. तुम्ही तुमची उशी नीट पाहा त्याला घामाचे, तेलाचे डाग असतात. आता हे डाग तुम्हाला कमी करायचे असतील. तर मुख्य कव्हरच्या आत आणखी एक कव्हर घालणे कधीही चांगले. जुन्या टिशर्टचा उपयोग याच कव्हरसाठी तुम्ही करु शकता.टिशर्टचा गळ्याचा आणि बाहयांचा भाग कापून उरलेला आयताकृती तुकडा तुम्ही तुमच्या उशीभोवती शिवू शकता. त्यावर उशीचे कव्हर चढवू शकता.
होजिअरी मुलायम असल्यामुळे तुम्हाला तुमच्या उशीचा स्पर्श ही मुलायम लागेल. साधारण दोन महिने सलग तुम्ही हे उशीचे कव्हर वापरले तर चालेल. पण तुम्ही तेलकट केस घेऊन उशीवर झोपत असाल तर तुम्ही होजिअरी मटेरिअलच्या उशीच्या कव्हरना झीप लावू शकता. शिवाय तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही थेट उशीचे कव्हरही अशा टिशर्टपासून बनवू शकता.
पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
सिथेंटिक कपड्यांचा करता येईल हा उपयो
आता हे झाले होजिअरी मटेरिअल संदर्भात… पण सिंथेटिक मटेरिअलचे करायचे काय.? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचाही उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो.
*हल्ली सगळीकडे बेड कव्हर नावाचा प्रकार मिळतो. तो तसा महागही असतो. पावसाळ्यात बाहेरुन आल्यानंतर चादर भिजण्याची शक्यता जास्त असते अशावेळी तुम्ही ओढणी किंवा सिथेंटिक मटेरिएल एकत्र करुन त्याचे बेडकव्हर तयार करु शकता. त्यामुळे बेड भिजण्याची शक्यता थोडी कमी असते. शिवाय हा कपडा पाणी शोषून घेतो आणि लवकर वाळतो.
*जर तुमच्याकडे अशा मटेरिअलच्या साड्या असतील त्याचे उत्तम पडदे बनवता येऊ शकता. पावसाचे चार महिने तुम्ही तुमच्या घरांना या मटेरिअलचे पडदे शिवून लावू शकतात. कारण ते वाळायला अगदी सोपे असतात.
कॉटन मटेरिअलचे उपयोगच उपयोग
घरात असलेल्या कॉटन कपड्यांचे तर उपयोगच उपयोग असतात. घरी आजी असेल तर तिने जुन्या कॉटनच्या साड्यांपासून गोधड्या बनवलेल्या तुम्ही पाहिल्यात असतील. मग काय अगदी सोपे आहे की, कॉटन मटेरिअलपासून तुम्ही अशाच प्रकार गोधड्या बनवू शकता.
या शिवाय कॉटनच्या बॅग्स, रुमाल, टॉवेल अशा वस्तू देखील तुम्ही यापासून बनवू शकता.