सरकार शेती नरेंद्र मोदी शेतकरी

मोदी सरकारने शेतकरी "कृषी विधेयक" आणले आहे. त्यात नेमके काय आहे?

1 उत्तर
1 answers

मोदी सरकारने शेतकरी "कृषी विधेयक" आणले आहे. त्यात नेमके काय आहे?

5
 कृषी विधेयक : नेमके काय आहे या विधेयकात.

दि २० सप्टेबर २०२०
https://bit.ly/3hN8UNo
आज रविवारी कृषी विधेयक संबधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली आहेत. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.
या गोंधळातच शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं मंजूर करण्यात आली.
या विधेयकांविरुद्ध पंजाब आणि हरयाणामध्ये अनेक शेतकरी मोदी सरकारविरोधात रस्त्यांवर उतरलेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांचं आता कायद्यात रुपांतर करायचं ठरवलंय. ही तिन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत.
🅰️ हे कायदे करून शेतकऱ्यांचंच भलं होणार असं सरकार म्हणतंय तर विरोधक म्हणतायत की हा खासगी उद्योगांचं भलं होणार 🅰️
ही तीन विधेयकं शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करू पाहतायत आणि त्यांना विरोध का होतोय हे समजून घेऊया.
केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं आहे.
या विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जातायत, ते आधी पाहूया.


🅰️ काय आहेत ही तीन विधेयक 🅰️
पहिलं विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक. हे विधेयक कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं.
〰️ यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत -
कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री
कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे.
मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे
इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे.
    〰️याबद्दलचे आक्षेप〰️
बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचं काय होणार?
किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल.
APMC बाहेर विक्री झाल्यास 'बाजार शुल्क' न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल.
https://bit.ly/3hN8UNo
      🅰️ दुसरं विधेयक 🅰️
हे कंत्राटी शेतीबद्दल आहे. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.
〰️१)  ५ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल
२) बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील.
मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,
३) आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल.
         〰️  आक्षेप 〰️
कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का?
अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का?
       🅰️ तिसरं विधेयक 🅰️
अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हे तिसरं विधेयक आहे ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याच्या तरतूदी काय आहेत?
१)डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद: युद्धसदृश असामान्य परिस्थिती.
२)निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल.
३)किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ४)ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा.
         〰️ आक्षेप 〰️
शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती
कांदा निर्यातबंदी सारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दल साशंकता.
मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील.
https://bit.ly/3hN8UNo
अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून निर्मला सीतारमण यांनी शेती क्षेत्रात लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकलंय. 2019-20 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून येतं की ECA मुळे साखर, कांदा आणि डाळींच्या किंमती वाढायच्या आणि साठेबाजांवर धाडी टाकण्यात फक्त व्यापारांचं शोषण व्हायचं."
आता सरकारने हि विधेयक मंजुर करून घेतली आहेत.याचे परिणाम चांगले की वाईट हे दिसायला कालावधी जावा लागेल.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव.

Related Questions

नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात राहतात?
नरेंद्र मोदी कोण आहे?
नरेंद्र मोदी स्टेडियम कहा है?
पी एम ओ चा फुल फॉर्म काय आहे?
नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 (स्वातंत्र्यदिनी) रोजी तिन्ही संरक्षण दलाचे एकत्रीत नेतृत्व करणाऱ्या पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली ते पद कोणते?
नरेंद्र मोदींचे पूर्ण नाव काय ?
नरेंद्र मोदींबद्दल सर्व माहिती मिळेल का?