नरेंद्र मोदी पंतप्रधान

नरेंद्र मोदींबद्दल सर्व माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

नरेंद्र मोदींबद्दल सर्व माहिती मिळेल का?

5
नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ते वेबचा वापर करतात. Facebook, Twitter, Google+, Instagram, sound cloud, Linkedin, weibo यांसारख्या अन्य सोशल मिडिया व्यासपीठावर ते खूप सक्रिय आहेत.

राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे. ते आपल्या दिवसाची सुरुवात योग साधनेतून करतात. योग केल्यामुळे त्यांचे शरीर आणि मन संतुलित राहते आणि अतिशय धकाधकीच्या दैनंदिन जीवनात त्यांना शांतीची अनुभूती मिळते.

ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिला.
उत्तर लिहिले · 18/8/2020
कर्म · 8640

Related Questions

15 ऑगस्ट 1947 साली भारतात स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत क्रमवारी अनुसार पंतप्रधानाची संपूर्ण नावे लिहा प्रभारीसह?
मा.पंतप्रधान नरेद्र मोदी यांना कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे?
पदावर असताना मृत्यु पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
2023 चे पंतप्रधान कोण?
१५ आँगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्या पासून आतापर्यंत क्रमवारी नुसार पंतप्रधानांची संपूर्ण नावे लिहा?
फेसबुक अकाउंट कसे डिलीट करावे?
पंतप्रधान आणि त्यांचे कार्य कोणते आहे?