पंतप्रधान
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
15 ऑगस्ट 1947 साली भारतात स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत क्रमवारी अनुसार पंतप्रधानांची संपूर्ण नावे खालीलप्रमाणे आहेत:
क्रमांक पंतप्रधान कार्यकाळ पक्ष
1 जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 - 27 मे 1964 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2 गुलजारीलाल नंदा 27 मे 1964 - 9 जून 1964 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3 लालबहादुर शास्त्री 9 जून 1964 - 11 जानेवारी 1966 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4 इंदिरा गांधी 19 जानेवारी 1966 - 24 मार्च 1977 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
5 मोरारजी देसाई 24 मार्च 1977 - 28 जुलै 1979 जनसंघ
6 चंद्रशेखर 28 जुलै 1979 - 21 जून 1980 जनता पक्ष
7 इंदिरा गांधी 21 जून 1980 - 31 ऑक्टोबर 1984 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
8 राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 - 21 मे 1991 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9 चंद्रशेखर 21 मे 1991 - 10 नवंबर 1991 जनता दल
10 पी. व्ही. नरसिंहराव 10 नवंबर 1991 - 21 मे 1996 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
11 अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 - 11 मार्च 1998 भारतीय जनता पक्ष
12 इंद्रकुमार गुजराल 11 मार्च 1998 - 12 मार्च 1999 राष्ट्रीय जनता दल
13 अटलबिहारी वाजपेयी 13 मार्च 1999 - 22 मे 2004 भारतीय जनता पक्ष
14 मनमोहन सिंग 22 मे 2004 - 26 मे 2014 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
15 नरेंद्र मोदी 26 मे 2014 - चालू भारतीय जनता पक्ष
3
Answer link
पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
पंतप्रधान मोदींना गेल्या सात वर्षात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांवर एक नजर टाकूया
विविध देशांनी दिलेले पुरस्कार
1. एप्रिल 2016 मध्ये, त्यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंग अब्दुलअझीझ सश- हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
2.अफगणिस्थान - त्याच वर्षी, पंतप्रधान मोदींना स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान – हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.
3. पॅलेस्टाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2018 मध्ये, पॅलेस्टाईनला ऐतिहासिक भेट दिली तेव्हा त्यांना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परदेशातील मान्यवरांना दिला जाणारा हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान आहे.
4.संयुक्त अरब अमिरात - 2019 मध्ये, पंतप्रधानांना ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
5. रशियाने पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये त्यांचा - ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.
6. मालदीव - ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन- हा परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.
8. अमेरिका - उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीतील यश तसेच गुणवत्तापूर्ण वर्तनासाठी अमेरिकेच्या सरकारद्वारे दिला जाणारा लीजन ऑफ मेरिट, हा अमेरिकेच्या सशस्त्र दलाचा पुरस्कार 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.
9. भूतानने डिसेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो या त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
......................................................................................
अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांव्यतिरिक्त, जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
1. सोल शांतता पुरस्कार: मानवजातीमध्ये सुसंवाद, विविध राष्ट्रांमध्ये सलोखा निर्माण करण्यात तसेच जागतिक शांततेसाठी योगदान देऊन आपला ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना सोल पीस प्राइज कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने हा द्विवार्षिक पुरस्कार प्रदान केला जातो. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2. युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार: हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असून, UN ने 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांच्या धाडसी पर्यावरण नेतृत्वाला जागतिक मंचावरून कौतुकाची थाप दिली.
3. पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये पहिला-वहिला फिलिप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी एखाद्या देशाच्या नेत्याला हा पुरस्कार दिला जातो. “देशाचे उत्कृष्टरीत्या नेतृत्व” केल्याबद्दल पंतप्रधान मोदींची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे त्यांना पुरस्कारासोबत देण्यात आलेल्या मानपत्रात म्हटले होते.
4. ‘2019 मध्ये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे पंतप्रधान मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेचे “लोक चळवळी”त रूपांतर करून दैनंदिन जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला होता.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही