धरण शाहू महाराज इतिहास

शाहू महाराज व राधानगरी धरण माहिती दया?

1 उत्तर
1 answers

शाहू महाराज व राधानगरी धरण माहिती दया?

3
 राधानगरी धरण 

http://bit.ly/3smWhOc




_____________________________
 माहिती सेवा गृप पेठवड़गाव.
_____________________________
भारतातील काही बड्या संस्थानिकांसह छत्रपती शाहू महाराज युरोप दौऱ्यावर गेले होते. महाराजांचा हा युरोप दौरा करवीर रियासतीच्या दृष्टीने आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणणारा ठरला. महाराजांच्या सोबत असणारे इतर राजे-महाराजे सहलीचा आनंद उपभोगत होते तेव्हा हा रयतेचा राजा युरोपातील प्रगत तंत्रज्ञान, तेथील शेतीच्या पद्धती अशा मिळेल त्या गोष्टींचा अभ्यास करीत होता. या दौऱ्यात महाराजांनी रोमचे मैदान पाहिले यावरुनच महाराजांना खासबाग मैदान निर्माण करण्याची कल्पना सुचली. आज लाखो शेतकऱ्यांना "जीवन" देणारे व महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र असणारे "राधानगरी धरण" सुद्धा महाराजांच्या अशाच एक कल्पनेची परिणती ! 
 युरोप दौऱ्याहून परत आल्यानंतर युरोपमध्ये पाहिल्याप्रमाणे एक धरण आपल्या शेतकऱ्यांसाठीही बांधावे असे महाराजांना सतत वाटायचे. त्यानुसार महाराजांनी हालचाली सुरु केल्या. स्वतः संपूर्ण राज्यात फिरुन सर्व्हे केला व फेजिवडे गावानजिक भोगावती नदीवर धरण बांधण्याचे निश्चित केले. खास म्हैसूरहून सर एम. विश्वेश्वरैया यांना पाचारण करुन त्यांच्यापुढे ही योजना मांडली. त्यांनाही योजना व ठिकाण पसंत पडले. युरोपीयन धरणतज्ञांनी अकरा लाखांचे अंदाजपत्रक मांडले. लागलीच महाराजांनी १९०७ साली आपल्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते पायाखुदाईची कुदळ मारली.........
अनेक तज्ञ इंजिनियर्स, कुशल कारागीर असे दोन हजारहून अधिक लोक धरणबांधणीच्या कामाला लागले. या लोकांना राहण्यासाठी धरणालगतच महाराजांनी *आपल्या मातोश्री राधाबाई यांच्या नावे "राधानगर" हे गाव वसवले*
भारतात प्रथमच धरणबांधणीस सुरुवात होत होती मात्र धरणाचे काम सुरु असतानाच अचानक पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. युरोपातून येणारी सामुग्री खंडित झाली.
http://bit.ly/3smWhOc
 महागाई गगनाला भिडली परिणामी धरणतज्ञांच्या मते अकरा लाख रुपयांत बांधून पूर्ण होणारे धरण १९१७ पर्यंत चौदा लाख रुपये खर्च झाले तरी निम्मे देखील बांधून झाले नाही. धरणाबरोबरच पुणे येथे शिवस्मारक, कोल्हापूर शहरात सुसज्ज नाट्यगृह, खासबाग मैदान, अतिग्रे, शिरोळ व पेठवड़गाव येथे तलाव बांधणी नद्यांवर बंधाऱ्यांची बांधणी अशी लाखो रुपयांची कामे सुरु होती. या कामांवर छत्रपतींचा संपूर्ण खजिना रिकामा झाला पण महाराजांना त्याची अजिबात काळजी नव्हती. माझा खजिना माझ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगात येत नसेल तर त्याचा काय उपयोग असे महाराज नेहमी म्हणायचे मात्र १९१७ साली आर्थिक टंचाईमुळे महाराजांना धरणाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या गडबडीत नाट्यगृह, खासबाग मैदान, तलाव व बंधाऱ्यांची बांधणी अशी तुलनेने कमी खर्चिक कामे महाराजांनी पूर्ण केली. मात्र इतका आटापीटा करुन, आवाक्याबाहेर खर्च करुन, मानसिक व शारीरिक ताण सहन करुनदेखील महाराजांना धरण बांधल्याचे भाग्य दिसून येईना. राज्याचा संपूर्ण खजिना संपला तरी महाराजांचे स्वप्न असणारे राधानगरी धरण व पुणे येथील शिवस्मारकाचे काम पैशांअभावी रखडले. शिवस्मारक व धरण पूर्ण झाल्याचे पाहणे महाराजांच्या नशिबी नव्हते. ६ मे १९२२ रोजी महाराज शिवछत्रपतींच्या चरणी चिरनिद्रीस्त जाहले.
शाहू महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले. महाराजांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय राजाराम महाराजांनी केला. पुण्यातील शिवस्मारका बरोबरच १९१७ साली बंद पडलेल्या धरणाच्या कामास महाराजांनी पुन्हा सुरुवात केली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट पैसा खर्च करुन महाराजांनी धरण बांधून पूर्ण केले. धरणाच्या जलाशयाला महाराणी लक्ष्मीसागर असे नाव दिले. आजतागायत राधानगरी धरण शाहू महाराजांच्या रयतेची अखंड सेवा करीत आहे. धरणामुळे ६० हजार हेक्टरहून अधिक जमिन ओलिताखाली आली आहे त्याचबरोबर राधानगरी धरण हे महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जानिर्मिती केंद्रांपैकी एक आहे. 
करवीर राज्याचा आकार व त्याकाळची आर्थिक कुवत लक्षात घेता छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या धरण बांधणीच्या निर्णयामधून महाराजांची दूरदृष्टी व महाराजांची रयतेप्रती असणारी निष्ठा प्रतीत होते. भारतातील काही स्वयंघोषित राजे -महाराजे स्वतःच्या अय्याशीसाठी व इंग्रजांची विशेष मर्जी राखण्यासाठी महागडे महाल बांधत होते, महागड्या विलायती गाड्या व चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करीत होते, आपल्या संपत्तीची व इंग्रज दरबाराने आपल्याला दिलेल्या सन्मानाची मिजास मारत फिरत होते तेव्हा शाहू महाराज रयतेच्या कल्याणासाठी झुरत होते. छत्रपतींचा खजिना ही रयतेचीच संपत्ती मानून रयतेसाठी ती कारणी लावत होते म्हणूनच छत्रपती शाहू महाराज जगत् वंदनीय आहेत. राजेशाही धुडकावून "लोकशाही"चा अंगिकार केलेल्या भारताच्या सर्वोच्च सभागृहात पुतळा उभा आहे. ♏

Related Questions

प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?
इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती?
इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा?
वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
मानसशास्त्र चा इतिहास?
इतिहासाचे महत्वाचे चार घटक कोणत?