पैसा प्रॉव्हिडंट फंड

व्हॉलंटरी पीएफ बद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

व्हॉलंटरी पीएफ बद्दल माहिती द्या?

0
व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) म्हणजे ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी होय.  या इपीएफओच्या योजनेतून लाभ घेणारे कर्मचारी हे स्वच्छेने आपल्या वेतनातील कितीही टक्के वाटा प्रॉव्हिडंट खात्यात जमा करू शकतात.हे योगदान सरकारकडून आवश्यक 12 टक्केपीएफच्या निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असावे, असा नियम आहे. अशावेळी मात्र कंपनी कोणत्याच प्रकारे व्हीपीएफची रक्कम देण्यास बांधील नसते.            

बचत खाते, अन्य मुदत ठेवी योजनेच्या तुलनेत पीएफ आणि व्हीपीएफवर चांगले व्याज असल्याने नोकरदार वर्गाने व्हीपीएफ सुरू करण्याबाबत आग्रही असावे.  याबाबत कंपनीतील लेखा विभागाशी संपर्क साधून व्हीपीएफच्या नियम आणि अटी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, व्हीपीएफच्या माध्यमातून आपण निवृत्त निधीत चांगली वाढ करू शकतो, हे निश्चित.अन्य खात्याप्रमाणे व्हीपीएफचे वेगळे खाते नसते. या खात्याचे पीएफ खात्यातच  समायोजन केलेले असते. कर्मचारी आपले मूळ वेतन आणि महागाई भत्ता याचे शंभर टक्के योगदान व्हीपीएफमध्ये देऊ शकतो. व्हीपीएफवर आकारले जाणारे व्याज हे ईपीएफप्रमाणे लागू असते. वेगळे खाते नसल्याने व्हीपीएफची रक्कम ही दरमहा पीएफच्या खात्यातच जमा होते.
*🔹फंडमध्ये योगदान 🔹*
व्हीपीएफ आणि पीपीएफ या दोन्हीतही योगदान ऐच्छिक आहे. केवळ पगारदार नोकर व्हीपीएफची निवड करू शकतात. तरपीपीएफ खाते हे पगारदार आणि बिगर पगारदार व्यक्ती सुरू करू शकतात. एखाद्या कर्मचार्याला निवृत्तीच्या बचतीत वाढ करायची असेल तर व्हीपीएफचा पर्याय निवडायला हरकत नाही. एखादा कर्मचारी शंभर टक्के मूळ वेतन आणि महागाई भत्ता व्हीपीएफसाठी योगदान करू शकतो. पीपीएफ खात्यात वार्षिक दीड लाखांपर्यंत मर्यादा आहे तर व्हीपीएफमध्ये योगदान देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा  नाही.
▪व्हीपीएफवर परतावा▪
सद्य:स्थितीत पीपीएफ खात्यावर 7.7 टक्के व्याज दर दिला जात आहे. पीपीएफचे व्याजदर हे सरकारच्या बाँड यिल्डशी निगडित असलेल्या योजनेवर आधारित आहेत. सरकारी बाँड हे किमान जोखीम असणार्या योजना असतात. तर दुसरीकडे व्हीपीएफचा व्याजदर हा जी-बाँड यिल्डशी निगडित नसतो. त्यामुळे त्यावरील व्याजदर हा पीएफप्रमाणे आहे. सद्य:स्थितीत ईपीएफचा व्याजदर हा 8.7 टक्के आहे. हा व्याजदर पीपीएफपेक्षा अधिक आहे.
▪करसवलत▪
जर कर्मचार्याने पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपेक्षा काम केले असेल तर इपीएफ आणि व्हीपीएफकडून मॅच्युरिटी उत्पन्नाला करसवलत दिली जाते. जर आपण पाच वर्षाच्या अगोदरच पैसे काढत असाल तर मॅच्युरिटी परताव्यावर काही प्रमाणात कर बसू शकतो. दुसरीकडे पीपीएफचा परतावा हा करमुक्त आहे.
▪कर्जाची सुविधा▪ इपीएफ आणि व्हीपीएफमधील जमा फंडच्या आधारे कर्ज घेण्यासाठी कोणीही अर्ज करू शकतो. याशिवाय संपूर्ण गुंतवणूक काढून घेऊ शकतो. पीपीएफवर कर्ज घेताना चौथ्या वर्षाच्या अखेरीस असलेल्या एकूण रकमेच्या 50 टक्केच रक्कम ही पीपीएफ खात्याच्या सहाव्या वर्षाच्या सुरुवातीला काढू शकतो.पीपीएफमध्ये कर्जाऊ म्हणून संपूर्णपणे रक्कम काढता येत नाही.  अर्थात यासंबंधी सविस्तर माहिती आणि नियम हे कंपनीच्या लेखाविभागाकडून मिळू शकते. या नियमात ठराविक काळानंतर होणार्या बदलाचा परिणाम कर्जाच्या निकषावरही होतो.
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🔵
______________________________
https://m.facebook.com/story.php?story_fbid=486091741788754&id=100011637976439
0

व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund - VPF) हा एक प्रकारचा भविष्य निर्वाह निधी आहे. हा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड (Employees' Provident Fund - EPF) चाच एक भाग आहे, पण तो कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक असतो.

VPF बद्दल काही महत्त्वाची माहिती:

  • ऐच्छिक गुंतवणूक: VPF मध्ये गुंतवणूक करणे कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक नाही. ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पगारातून काही रक्कम VPF मध्ये गुंतवू शकतात.
  • गुंतवणुकीची मर्यादा: VPF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या १००% पर्यंत रक्कम गुंतवू शकतात.
  • व्याज दर: VPF वरील व्याज दर EPF प्रमाणेच असतो. सरकार वेळोवेळी हा दर ठरवते.
  • कर लाभ: VPF मध्ये गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो.
  • परिपक्वता: VPF खाते निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडल्यानंतर बंद करता येते. काही विशिष्ट परिस्थितीत जसे की, वैद्यकीय आणीबाणी, मुलांचे शिक्षण, किंवा घरासाठीDown Payment इत्यादी कारणांसाठी अकाली पैसे काढण्याची मुभा असते.

VPF चे फायदे:

  • जास्त बचत: EPF च्या तुलनेत VPF मध्ये जास्त बचत करता येते.
  • सुरक्षित गुंतवणूक: VPF ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे, कारण यावर सरकारची हमी असते.
  • चक्रवाढ व्याज: VPF मध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज (Compound Interest) मिळतं, ज्यामुळे दीर्घकाळात चांगली वाढ होते.

VPF ही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना निवृत्तीसाठी जास्त बचत करायची आहे आणि ज्यांच्याकडे गुंतवणुकीचे इतर सुरक्षित पर्याय उपलब्ध नाहीत.

अधिक माहितीसाठी तुम्ही EPFO (Employee Provident Fund Organisation) च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: www.epfindia.gov.in

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 720

Related Questions

उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स आहेत, तर मी पैसे कमवण्यासाठी याचा उपयोग कसा करू?
पैसा कमावण्यासाठी काय करावे?
पैसा म्हणजे पैशाचे कार्य ही व्याख्या कोणी दिली?
पैसा म्हणजे काय? पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य कसे स्पष्ट कराल?
पैसा म्हणजे पैशाची कार्ये ही व्याख्या कोणाची आहे?
तात्काळ पैसा घेण्यासाठी कोणते ॲप छान आहे?