2 उत्तरे
2
answers
घरात देवघर कुठे असावे?
6
Answer link

देवघर वरून नेहमी चपटे असावे.
देवघर ईशान्य कोपर्यात असायला पाहिजे. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे.
देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे.
तीर्थक्षेत्रांतून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात. पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे.
मुर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे.
मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको.
नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मुर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये.
महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे. मूर्तीच्या स्वरूपात नाही.
पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे.
दिवा आग्नेय कोपर्यात (देवघराच्या) असायला पाहिजे. पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे.
पूजेत शंख-घंटीचा उपयोग जरूर करावा.
निर्माल्य-पुष्प-नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे.
पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपर्यात शिंपडायला पाहिजे.
नैवैद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा.
खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांना नवैद्य दाखवाला.
0
Answer link
घरात देवघर कोणत्या दिशेला असावे याबद्दल काही वास्तुशास्त्र टिप्स खालीलप्रमाणे:
- दिशा: देवघर नेहमी ईशान्य दिशेला (North-East) असावे. या दिशेला सकारात्मक ऊर्जा असते.
- जागा: देवघर हे शांत आणि पवित्र ठिकाणी असावे. ते शक्यतोवर किचन किंवा बेडरूममध्ये नसावे.
- रंग: देवघरासाठी हलके रंग वापरावे, जसे की पांढरा, पिवळा किंवा हलका निळा.
- स्वच्छता: देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. नियमितपणे मूर्ती आणि देवघरातील वस्तूंची स्वच्छता करावी.
- प्रकाश: देवघरात पुरेसा प्रकाश असावा.
या काही सामान्य टिप्स आहेत ज्या वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर ठेवताना उपयुक्त ठरू शकतात.