भारतीय सेना नौसेना सुरक्षा

नौदल व तटरक्षक दल विषयी माहिती मिळेल का ?

1 उत्तर
1 answers

नौदल व तटरक्षक दल विषयी माहिती मिळेल का ?

3
💁‍♂ *भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ*

*MAHA DIGI | Informative*

🛳 *भारतीय नौदलाविषयी*

♟भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत.

♟भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

♟छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते.

♟‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली.

♟त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

♟1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
👨🏻‍✈ *भारतीय तटरक्षक दलाविषयी*

🚣🏻‍♂ भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे.

🚣🏻‍♂ दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.

🚣🏻‍♂ सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा,समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्‍या आहेत.

🚣🏻‍♂ या दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 22/12/2019
कर्म · 569205

Related Questions

भारतीय नौदलाचा पेपर कसा असतो?
माजी सैनिकसाठी घरपट्टी माफ होण्यासाठी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र कसे काढावे, कृपया माहिती द्या?
४ डिसेंबर भारतीय नौदल दिवसा निमित्त माहिती मिळेल का ?
नौदल विषयी माहिती द्या?
NCC चे फायदे कोणते ?
हाय अलर्ट वर राहणे म्हणजे नेमकं काय करणं कस राहणं?
मर्चंट नेव्ही म्हणजे काय ?