Topic icon

नौसेना

5
भारतीय नौदलात खलाशी पदापासून ते अधिकारी पदापर्यंत भरती होत असते. या भरतीत जसे पद बदलते तसा अभ्यासक्रम बदलतो.
सैनिक, खलाशी(सेलर) साठी परीक्षा सोपी असते, याउलट अधिकारी पदासाठी परीक्षा अधिक अवघड असते.

आता तुम्ही प्रश्नात नेमका कोणता पेपर आहे याचा उल्लेख केला नाही, त्यामुळे एक नवीन प्रश्न विचारा आणि त्यात नेमक्या पदाचा उल्लेख करा म्हणजे नेमके उत्तर देता येईल.
उत्तर लिहिले · 3/3/2021
कर्म · 282915
1
याबाबत मागे जिल्हापरिषद मार्फत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर परिपत्रक काढण्यात आले होते.त्याला अनेक वर्षे झाले तरी गावातील ग्रामपंचायत किंवा तालुका पंचायत समिती कडे सदर परिपत्रकाची प्रत मिळते का बघा.सदर परिपत्रक मिळाले तर ग्रामपंचायतला अर्ज द्या व सोबत सदरचे परिपत्रकाची प्रत जोडा तुमची घरपट्टी नक्कीच कमी होईल.
रामकृष्ण हरी...
उत्तर लिहिले · 6/7/2020
कर्म · 3800
3
💁‍♂ *भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ*

*MAHA DIGI | Informative*

🛳 *भारतीय नौदलाविषयी*

♟भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत.

♟भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

♟छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते.

♟‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली.

♟त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

♟1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
👨🏻‍✈ *भारतीय तटरक्षक दलाविषयी*

🚣🏻‍♂ भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे.

🚣🏻‍♂ दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.

🚣🏻‍♂ सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा,समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्‍या आहेत.

🚣🏻‍♂ या दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 22/12/2019
कर्म · 569205
9
आज भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन

प्रत्येक देशात लष्कराला वेगळं महत्त्व असतंच, पण समुद्र किनारा असणाऱ्या देशांमध्ये नौदलाचंही तितकंच महत्त्व असतं. भारतासारख्या देशात नौदलाला सतत सतर्क राहावं लागतं. आज (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन…

भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो. या साऱ्याला पार्श्वभूमी आहे ती १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाची. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाईदल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता. खरे तर १९७१च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानच्या सततच्या कारवायांनी भारताच्या संयमाचा कडेलोट होणेच केवळ बाकी होते. अशा वेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्णयाविरोधात कोणाचीही बोलण्याची शामत नव्हती, अशा कालखंडात सॅम माणेकशॉ यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले. खरे तर बांगलादेश युद्धाच्या मुळाशी हा धाडसाचा पाया होता. त्यांनी नोव्हेंबपर्यंत थांबवण्याचा सल्ला दिला, जो मान्य करण्यात आला. तोपर्यंत सैन्याची जुळवाजुळवही व्यवस्थित करता येईल, याची खात्रीही देण्यास ते विसरले नाहीत. अखेरीस इरेस पेटलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी ती चूक केलीच. त्यांनी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. मात्र तेच लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला.

भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तान नौदलाने केलेली नव्हती, किंबहुना तिकडची ताकद पूर्वेकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता, पण त्यालाच नौदलाने सुरुंग लावला.

३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये दीर्घकाळ केवळ भारतीय नौदलच सामर्थ्यशाली नौदल म्हणून वावरत होते. आज भारताचे नौदल हे शक्तीशाली नौदल म्हणून ओळखले जाते.

पुढील माहितीसाठी लोकसत्ता पेजला भेट द्या. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-navy-day-4th-december-know-why-we-celebrate-this-day-india-pakistan-war-jud-87-2028214/
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 458520
4
भारतीय नौदल 17 व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.

इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 34195
9
NCC अर्थात National Cadet Corps म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना.

  • तीनही दलांचे मूलभूत प्रशिक्षण छात्रांना राष्ट्रीय छात्र सेना देते.




छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा, समयनिष्ठता, ज्ञाधारकपणा, इत्यादी गुणांचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय छात्र सेना कार्य करते.

सोबतच असे गुणी छात्र सैन्यात भरती करता यावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते.

राष्ट्रीय छात्र सेना देशपातळीवर तीन प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करते.

शालेय स्तरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती ए प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना ए प्रमाणपत्र मिळते.

महाविद्यालयीन स्थरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती बी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना बी प्रमाणपत्र मिळते.

महाविद्यालयीन स्थरावर ३ वर्षांचे प्रशिक्षणांती व बी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास सी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना सी प्रमाणपत्र मिळते.

उपरोक्त सर्व प्रमाणपत्रांवर श्रेणी दिलेल्या असतात. ए किंवा बी श्रेणीत उत्तीर्ण होणे गरचेचे असते.

ज्या छात्रांना सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा  बी श्रेणी प्राप्त होते ते खालील फायदे मिळवू शकतात.

  • सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा  बी श्रेणी प्राप्त छात्र राष्ट्रीय छात्र सेना विशेष प्रवेश योजनेद्वारे अर्थात एन सी सी स्पेशल एन्ट्री स्कीमद्वारे कोणतीही लेखी परीक्षा न देता, सेवा निवड आयोग अर्थात सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस एस बी) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या साक्षात्कारास उपस्थित राहू शकतात आणि सैन्यात अधिकारी म्हणून भरती होऊ शकतात.
  • याउपर सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ए किंवा बी श्रेणी प्राप्त छात्र, सैनिक पदाकरिता लेखी परीक्षा न देता सैन्यात भरती होऊ शकतात.
  • पोलीस खात्यात भरतीप्रक्रियेमध्ये सी प्रमाणपत्राचे वाढीव गुण मिळतात शिवाय प्रमाणपत्राचा उपयोग बढती वेळेस ही होतो.
टीप: अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 11720
3
खरं तर हाय अलर्ट असा काही शब्दच अस्तित्वात नाही. हाय अलर्ट हा शब्द मीडियावाल्यांनी शोधलेला शब्द आहे. केवळ मच्छीमार पावसाळ्यात जेव्हा समुद्रामध्ये जातात, तिथे समुद्रात वाऱ्याचा वेग, वादळाची शक्यता, लाटांची उंची अशा गोष्टींची सूचना ते वेगवेगळ्या रंगाचे कंदील लावून ते इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यामध्ये विविध रंग आहेत, पण हाय अलर्ट हा शब्द आपण ज्या संदर्भात वापरतो त्यामध्ये असा थेट अर्थ नाही. दहशतवाद या संज्ञेचा संदर्भ देऊन जेव्हा आपण हाय अलर्ट जारी असं म्हणतो, तेव्हा त्या घटनेचा परिणाम अधिक जाणवावा या कारणासाठी वापरण्यात येणारी ही संज्ञा असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवं. शासकीय भाषेमध्ये कोणीच हाय अलर्ट हा शब्द कागदोपत्री वापरत नाही. एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी अलर्ट पाठवण्यात येतो. रेल्वे स्टेशन, मॉल, मल्टिप्लेक्सेस, हॉस्पिटल्स अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येते. बॉम्ब किंवा दहशतवादी या संबंधी काहीही अलर्ट आला की जीवितहानी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त दक्ष राहून काळजी घेतली जाते. त्यानुसार उपाययोजना करतो. या संपूर्ण प्रक्रियेला आपण हाय अलर्ट किंवा रेड अलर्ट अशा संज्ञा वापरायला लागलो 
.
.
.
.
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
उत्तर लिहिले · 3/3/2019
कर्म · 2410