2 उत्तरे
2
answers
हाय अलर्ट वर राहणे म्हणजे नेमकं काय करणं कस राहणं?
3
Answer link
खरं तर हाय अलर्ट असा काही शब्दच अस्तित्वात नाही. हाय अलर्ट हा शब्द मीडियावाल्यांनी शोधलेला शब्द आहे. केवळ मच्छीमार पावसाळ्यात जेव्हा समुद्रामध्ये जातात, तिथे समुद्रात वाऱ्याचा वेग, वादळाची शक्यता, लाटांची उंची अशा गोष्टींची सूचना ते वेगवेगळ्या रंगाचे कंदील लावून ते इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यामध्ये विविध रंग आहेत, पण हाय अलर्ट हा शब्द आपण ज्या संदर्भात वापरतो त्यामध्ये असा थेट अर्थ नाही. दहशतवाद या संज्ञेचा संदर्भ देऊन जेव्हा आपण हाय अलर्ट जारी असं म्हणतो, तेव्हा त्या घटनेचा परिणाम अधिक जाणवावा या कारणासाठी वापरण्यात येणारी ही संज्ञा असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवं. शासकीय भाषेमध्ये कोणीच हाय अलर्ट हा शब्द कागदोपत्री वापरत नाही. एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी अलर्ट पाठवण्यात येतो. रेल्वे स्टेशन, मॉल, मल्टिप्लेक्सेस, हॉस्पिटल्स अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येते. बॉम्ब किंवा दहशतवादी या संबंधी काहीही अलर्ट आला की जीवितहानी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त दक्ष राहून काळजी घेतली जाते. त्यानुसार उपाययोजना करतो. या संपूर्ण प्रक्रियेला आपण हाय अलर्ट किंवा रेड अलर्ट अशा संज्ञा वापरायला लागलो
.
.
.
.
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
.
.
.
.
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
1
Answer link
हाय अलर्ट म्हणते कुठल्याही क्षणाल आपल्याला आदेश मिडताच कूच करायला तत्पर व तयार राहणे. आणि परिस्थिति लक्षात घेऊन तिच्याशी जून्झ द्यायला कधीही तैयार रहने .