1 उत्तर
1
answers
मर्चंट नेव्ही म्हणजे काय ?
4
Answer link
मर्चंट नेव्ही-
'मर्चंट नेव्ही’ हे सागरामार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतूकीशी संबंधित आहे. या मालवाहतुकीचं माध्यम म्हणजे जहाज, जहाजावर विविध प्रकारची कामं करणाऱ्या माणसांची गरज असते. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने डेक विभाग (नॉटिकल सायन्स) आणि इंजिन विभाग (मरीन इंजिनीयरिंग) असे दोन विभाग पडतात. त्यातील डेक विभागातील करिअर संधींची माहिती घेऊयात.
डेक विभाग
या विभागाचा किंबहुना सर्व जहाजाचा प्रमुख हा 'कॅप्टन' असतो. जहाज समुद्रात असताना नौकानयनाचे जबाबदारीचं काम कॅप्टनला करायचं असतं. अथांग पसरलेल्या समुद्रात जहाजाचं स्थान होकायंत्र व तत्सम उपकरणं तसंच सूर्य वा अन्य ताऱ्याच्या स्थितीवरून निश्चितपणे वर्तण्याचं काम कॅप्टनचं असतं. समुद्राचा विस्तार प्रचंड असला तरी कमीत कमी धोके असलेल्या पट्टयातूनच मालवाहतूक करणारी जहाजे प्रवास करतात. त्यामुळे जहाजांची टक्कर टाळण्यासाठी काळजी घेण्याचं कामही कॅप्टनवर असतं. जहाजात असलेल्या मालाची काळजी घेण्याची जबाबदारीही त्याची असते.
नाशवंत मालासाठी वातानुकूलन व्यवस्था पुरवणं, आर्द्रतेचं प्रमाण योग्य ठेवणं, ज्वालाग्राही पदार्थ आगीपासून सुरक्षित ठेवणं इत्यादीची अंतिम जबाबदारीच त्याच्यावर असते. खवळलेल्या समुद्रातून किंवा धुक्याने भरलेल्या वातावरणातून जहाज सुखरूप बाहेर काढण्याची जोखीमही त्याला घ्यावी लागते. त्याचबरोबर जहाजावरील जीवनावश्यक गोष्टींचा पुरेसा साठा ठेवणं, बंदरावर लागल्यानंतर मालाच्या चढ-उतारीवर लक्ष ठेवणं व आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय नियमांचे व कायद्याचे पालन करणं हे कॅप्टनला करावं लागतं.
कॅप्टनच्या मदतीला त्याचे कनिष्ठ सहकारी असतात. कॅप्टन, चीफऑफिसर, सेकंडऑफिसर, थर्डऑफिसर अशीही उतरंड असते.