आयुर्वेद आरोग्य

जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे काय फायदे आहेत?

1 उत्तर
1 answers

जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे काय फायदे आहेत?

6

तुम्ही जेवल्यानंतर ‘बडीशेप’ खाता, तर 
 बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जात. आपल्या कडे बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खान पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमूळे तुमच्या तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. त्यामुळे रोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप नक्की खा!

 बडीशेप खाण्याचे काही लाभदायी फायदे –

– बडीशेप मध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखे म्हत्वाचे घडक आहेत. जे कि तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. त्यामुळे दररोज जेवणानंतर एक चमचा बडीशेपचे सेवन नक्की करायला हवे.

– बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे कि, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. बडीशेप खाल्यास आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, मुरुम येत असतील तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात.

– बडीशेप मुळे रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत होते. बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बडीशेप मदत करते.

– सर्वात महत्वाचा फायदा हा हृदयाशी निगडित आहे. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, कदाचित हे तुम्हाला माहित नसेल.

– बडीशेप मुळे तुमचे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. हे घटक तुम्हाला बडीशेप मध्ये मिळतात.
उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 121725

Related Questions

आयुर्वेद संशोधन पद्धती म्हणजे काय?
कडुनिबांच्या पानाचे फायदे काय आहेत?
हर्बल औषधे म्हणजे वनस्पतीपासून बनवलेली असतात का? आणि इतर औषधे कशापासून बनवला ली असतात?
आयुर्वेद औषधने दम्या वर उपचार होतो का?
बेलाच्या पानाचा उपयोग काय?
काटेसावरीचा रंग कोणता?
कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे?