कॉम्पुटर आणि लॅपटॉप खरेदी ऑनलाईन खरेदी

लॅपटॉप कोणता खरेदी केला पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

लॅपटॉप कोणता खरेदी केला पाहिजे?

9
हल्ली बाजारात टॅब्लेट-फॅब्लेटची चलती असल्याने इतर गॅजेट्सच्या तुलनेत टॅब्लेटला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र कॉम्प्युटिंग डिव्हाइस असलेले लॅपटॉप खरेदी करण्यास आजही तितकीच पसंती दिली जाते. टॅब्लेटच्या तुलनेत लॅपटॉपला की-बोर्ड, डीव्हीडी ड्राइव्हची सोय असल्याने अधिक सोयीने काम करता येतं. तसेच व्हिडीओ एडिटिंग, अ‍ॅनिमेटेड प्रेझेंटेशन बनवणे, दर्जादार ग्राफिक्स असलेले गेम्स खेळणे यासारख्या विविध गोष्टी ज्या टॅब्लेटवर शक्य होत नाहीत, त्या लॅपटॉपवर शक्य होतात. परंतु बाजारात उपलब्ध असलेले लॅपटॉपचे प्रकार, आकार, किमती पाहता नेमका कोणता आणि कसा लॅपटॉप घ्यायचा, हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असणार. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी या काही महत्त्वाच्या बाबी नक्की तपासा.

लॅपटॉपची स्क्रीन साइज : लॅपटॉपची स्क्रीन साइज विविध आकारांमध्ये उपलब्ध असून, ८-इंची अल्ट्रा पोर्टेबल नेटबुक ते १९ इंच स्क्रीन असलेले लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. परंतु १५.६ इंच स्क्रीन ही लॅपटॉपची स्टँडर्ड साइज आहे. जर तुम्ही डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपचा वापर करणार असाल, तर मोठी स्क्रीन साइज असलेला लॅपटॉप घ्यावा. पण जर तुम्ही तो तुमच्यासोबत कॅरी करणार असाल तर १५ इंच स्क्रीन असलेला लॅपटॉप अधिक सोयीचा ठरेल.

मॅट की ग्लॉसी : सध्या बाजारात येणार्‍या बहुसंख्य लॅपटॉप्सची स्क्रीन ही ग्लॉसी असते. पण तुम्ही लॅपटॉपचा वापर घराच्या बाहेर अधिक करणार असाल तर मॅट स्क्रीन कमी रिफ्लेक्ट होते व सूर्यप्रकाशात देखील डोळ्यांना त्याचा जास्त त्रास होत नाही.

लॅपटॉपचे वजन : ऑफिसला जाताना तुम्हाला लॅपटॉप सोबत घेऊन जावा लागणार असेल, तर अशावेळी लॅपटॉपचे वजनदेखील एक महत्त्वाची बाब ठरते. १५ ते १६ इंच स्क्रीन साइज असलेल्या लॅपटॉपचे वजन साधारण २ ते ३ किलो इतके असते, तर काही लॅपटॉपचे वजन एक किलो ते सहा किलो इतके असते. पण जर तुम्हाला हलक्या वजनाचा लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागेल.

बॅटरीचे आयुष्य : लॅपटॉप म्हटलं की आपण एकाच वेळी विविध अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करणर हे साहजिक आहे. पण त्यासाठी उत्तम बॅटरी बॅक-अपचीदेखील आवश्यकता आहे. मात्र अनेक लॅपटॉपची बॅटरी केवळ दोन-तीन तास चालते. जर तुम्ही ऑन द गो, रेल्वेत किंवा कारमध्ये प्रवास करताना लॅपटॉपवर काम करणार असाल, तर अशा लॅपटॉपची निवड करा की ज्याद्वारे किमान ४ ते ६ तासांचा बॅटरी बॅक अप मिळेल.

लॅपटॉपची हार्ड ड्राइव्ह : तुमचा सगळा डेटा हा तुमच्या हार्ड डाइव्हमध्ये सेव्ह होतो. त्यामुळे गरजेनुसार हार्ड डिस्कची निवड करा. स्टँडर्ड लॅपटॉपमध्ये १६0 ते ५00 जीबीची हार्ड डिस्क दिली जाते. जर तुम्ही व्हिडीओ, गेम्स या गोष्टी लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करणार नसाल तर १६0 जीबीची हार्ड डिस्क तुमच्यासाठी पुरेशी ठरू शकते. शक्यतो एसएसडी किंवा साटा कंपनीची हार्ड ड्राइव्ह घ्यावी. परंतु साटाच्या तुलनेत एसएसडीची किंमत जास्त असल्याने गरजेनुसार मेन हार्ड ड्राइव्ह साटाची घेऊन रिबुटिंगसाठी ६४ जीबीचे एसएसडी ड्राइव्ह घेऊ शकता.

सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह : स्टँडर्ड साइजच्या सर्वच लॅपटॉपमध्ये सीडी/डीव्हीडी ड्राइव्ह दिलेला असतो. परंतु लहान आकाराच्या लॅपटॉपमध्ये (नोटबुकमध्ये) ही सुविधा नसते. अशावेळी तुम्ही एक्स्टर्नल डीव्हीडी ड्राइव्ह खरेद करू शकता.


रॅम : रॅम – (रॅन्डम अँक्सेस मेमरी) कॉम्प्युटर – लॅपटॉपची रॅम ही जीबीमध्ये असते व तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा स्पीडदेखील त्यावर अवलंबून असतो. लॅपटॉपच्या लेटेस्ट मॉडेलमध्ये किमान दोन जीबीची रॅम दिली जाते. परंतु जर तुम्ही व्हिडीओ एडिटिंग किंवा ग्राफिकल वर्क करणार असाल, तर किमान ४ जीबीची रॅम बसवून घ्या.

अँटिव्हायरस इन्स्टॉलेशन : नवीन लॅपटॉप विकत घेतल्यावर आपल्याला त्यामध्ये अँटिव्हायरस इन्स्टॉल करून मिळतो. परंतु त्याचा कालावधी फार नसतो. त्यामुळे दोन महिन्यांमध्ये तो एक्स्पायर होऊ शकतो. लॅपटॉपला कोणत्याही व्हायरसमुळे धोका निर्माण होऊ नये, यासाठी अँटिव्हायरस इन्स्टॉल करणे खूप गरजेचे आहे. बाजारात विविध प्रकारचे अँटिव्हायरस उपलब्ध असून, त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे अँटिव्हायरसचा कालावधी एक वर्षाचा असतो. त्यानंतर एकतर नवीन इन्स्टॉलेशन घ्यावे किंवा तेच अँटिव्हायरस अपडेट करावे. पण तुम्ही विंडोज-८ वापरत असाल तर तुम्हाला अँटिव्हायरस घेण्याची गरज नाही. कारण त्यामध्ये ‘विंडोज डिफेंडर’ हे इन बिल्ट अँटिव्हायरस देण्यात आले असून, ते अपडेट होत राहतं अन्यथा तुम्ही नेट प्रोटेक्टर किंवा क्विक हिल यासारखे अँटिव्हायरस वापरू शकता.

वॉरंटी अ‍ॅण्ड गॅरंटी: नवीन लॅपटॉप खरेदी केल्यावर कंपनीकडून एक किंवा दोन वर्षांची ‘बेस-टू-बेस’ वॉरंटी दिली जाते. त्यामुळे जर तुमच्या लॅपटॉपमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्याची दुरुस्ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून करून दिली जाते. शक्यतो वॉरंटीच्या कालावधीत लॅपटॉपमध्ये फारसा बिघाड होत नाही. किंबहुना जर तुमचा वापर व्यवस्थित असेल, तर दीर्घकाळ तुम्हाला दुसरा लॅपटॉप घेण्याची गरज भासणार नाही. तसेच काही ब्रँड अ‍ॅक्सिडेंटल क व्हरेज देखील देतात. त्यामुळे इन्श्युरन्सचे नियम आणि अटी तपासून घ्या.

फ्लॅश कॅचे : अल्ट्राबुक व काही इतर नोटबुक्समध्ये ८, १६ जीबी कॅचे मेमरी मिळते. परंतु ३२ जीबी मेमरी असल्यास त्याचा फायदा तुमच्या कॉम्प्युटरवरील परफॉर्मन्सवर होऊ शकतो.

डिस्प्ले : जेवढय़ा जास्त पिक्सेलची स्क्रीन तेवढय़ा चांगल्या प्रकारे तुम्हाला स्क्रीन वील कन्टेन्ट बघता येईल. बरेच मेन स्ट्रीम नोटबुक १३६६ – ७६८ या पिक्सेल रेझोल्युशनमध्ये येतात. पण जर तुमचे पर्याय खुले असतील आणि बजेट असेल तर १६00-९0 किंवा १९२0 -१0८0 या रेझोल्युशनचे लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमच्या डिस्प्लेचे रेझोल्युशन चांगले असेल तर वेब पेजेस, चित्रपट बघण्याचा अधिक चांगला अनुभव मिळेल.

ग्राफिक्स कार्ड : जर केवळ रोजच्या वापरासाठी लॅपटॉप घेणार असाल तर तुम्हाला एक जीबी ग्राफिक्स कार्ड पुरेसे आहे. परंतु, जर तुम्ही गेम्स, विशेषत: जीटीएसारखे गेम्स खेळणार असाल तर दोन जीबीचे ग्राफिक्स कार्ड घ्यावे. एनव्हीडी किंवा एटीआय या कंपन्यांचे ग्राफिक्स कार्ड तुम्ही घेऊ शकता.

की-बोर्ड : बर्‍याचदा आपल्याला डेस्कटॉप कॉम्प्युटरची सवय असते. त्यामुळे लॅपटॉप घेताना लॅपटॉपचा की-बोर्ड हाताळून पाहावा. प्रत्येक लॅपटॉपचा की-बोर्ड वेगळा असतो. काही लॅपटॉपच्या की खूप जवळ असतात, तर काहींच्या छोट्या, नाजूक आणि बारीक असतात. जर की-बोर्ड व्यवस्थित हाताळता येत नसेल तर महागातला लॅपटॉप घेऊनही तो वापरण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टीम: ऑपरेटिंग सिस्टीम हा खूप महत्त्वाचा भाग असून तुमच्या लॅपटॉपचा इंटरफेसदेखील त्यावर अवलंबून असतो. गरजेनुसार, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स यापैकी एका ऑपरेटिंग सिस्टीमचा लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही व्यावसायिक कामांसाठी लॅपटॉप घेत असाल तर विंडोज घेण्यास हरकत नाही. पण, जर तुम्ही प्रोग्रामिंगसाठी त्याचा अधिक वापर करणार असाल, तर लिनक्सला प्राधान्य द्यावे.

प्रोसेसर: जर तुम्ही नोटबुक घेणार असाल तर अँटम किंवा डुअल कोर यापैकी एका प्रोसेसरची तुम्ही निवड करू शकता. पण जर हायर रेंडरिंगसाठी किंवा ग्राफिकल वर्कसाठी थर्ड जनरेशनचे आय- ३, ५, ७ इंटेल किंवा एएमडी या प्रोसेसरची निवड करता येईल.


उत्तर लिहिले · 23/2/2019
कर्म · 55350
0

लॅपटॉप खरेदी करताना तुमच्या गरजा व बजेटनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. काही निवडक पर्याय खालीलप्रमाणे:

१. ॲपल MacBook Air M1:
  • ॲपल MacBook Air M1 हा उत्तम लॅपटॉप आहे. यात ऍपलच्या M1 चिपमुळे उत्कृष्ट कार्यक्षमता मिळते.
  • हे मॉडेल पातळ आणि हलके असल्यामुळे सोबत घेऊन जाण्यासाठी सोपे आहे.
  • ॲपलची उत्पादन गुणवत्ता आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
  • किंमत: ₹ 80,000 ते ₹ 90,000 पर्यंत.
  • ॲपल MacBook Air M1 (अधिकृत वेबसाईट)
२. Dell XPS 13:
  • Dell XPS 13 हा लॅपटॉप त्याच्या आकर्षक डिझाइन आणि उत्तम कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो.
  • यात Intel Core i5 किंवा i7 प्रोसेसर असतो, जोmultitasking आणि productive कामांसाठी चांगला आहे.
  • याची screen borderless असल्यामुळे Display चा अनुभव खूप छान येतो.
  • किंमत: ₹ 90,000 ते ₹ 1,20,000 पर्यंत.
  • Dell XPS 13 (अधिकृत वेबसाईट)
३. HP Spectre x360:
  • HP Spectre x360 हा 2-in-1 लॅपटॉप आहे, जो tablet म्हणूनही वापरला जाऊ शकतो.
  • यात टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि तो 360 अंशांमध्ये फिरवता येतो.
  • हे productive कामांसाठी तसेच creative कामांसाठी उत्तम आहे.
  • किंमत: ₹ 1,00,000 ते ₹ 1,30,000 पर्यंत.
  • HP Spectre x360 (अधिकृत वेबसाईट)
४. Lenovo ThinkPad X1 Carbon:
  • Lenovo ThinkPad X1 Carbon हा व्यवसायिकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
  • हे मॉडेल खूप हलके आणि टिकाऊ आहे.
  • यात उत्तम keyboard आणि सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
  • किंमत: ₹ 1,20,000 ते ₹ 1,50,000 पर्यंत.
  • Lenovo ThinkPad X1 Carbon (अधिकृत वेबसाईट)

हे काही पर्याय आहेत. तुमच्या विशिष्ट गरजा आणि बजेटनुसार तुम्ही आणखी संशोधन करू शकता.

तुम्हाला विशिष्ट वापरासाठी (उदा. गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग, ऑफिस वर्क) लॅपटॉप हवा असल्यास, त्यानुसार पर्याय बदलू शकतात.

टीप: किमती वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट्स किंवा विक्रेत्यांकडून नवीनतम माहिती तपासा.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 300

Related Questions

संगम.कॉम वेबसाईट कशी आहे? नाव नोंदणी केली तर फसवणूक होईल का?
मी सिव्हिल इंजिनियर आहे, मला नवीन जनरेशनचा लॅपटॉप घ्यायचा आहे. मला बरेच सॉफ्टवेअर एकाच वेळी चालवावे लागतात, त्यामुळे लॅपटॉप हँग होतो. तसेच, बाहेरगावी लॅपटॉप घेऊन जाव लागतो, त्यामुळे बॅटरी बॅकअप चांगला हवा. असा लॅपटॉप कोणता?
ब्लॉगिंग आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी आपण कोणता लॅपटॉप सुचवाल?
माझ्याकडे एक लॅपटॉप आहे, त्याच्या मदतीने मी पैसे कसे मिळवू शकेन?
लॅपटॉपच्या माउसचा नॅनो रिसीव्हर गहाळ झाला असेल, तर दुसरे नवीन रिसीव्हर त्याला कनेक्ट करू शकतो का?
लॅपटॉप व मोबाईलचा वेग कशावर अवलंबून असतो?
मला ऑफिसमध्ये वायफाय बसवायचे आहे. त्यावर 3 लॅपटॉप चालले पाहिजे. यासाठी कोणत्या कंपनीचे कनेक्शन चांगले आहे आणि महिन्याचे रिचार्ज किती करावे लागेल?