Topic icon

कॉम्पुटर आणि लॅपटॉप

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
तुम्ही 16 gb रॅम, i5 किंवा i7 (११व्या genration च्या पुढे) किंवा amd रयझेन 7 (५ व्या genration च्या पुढील genration) चा लॅपटॉप घ्यावा। जर तुम्हाला ऑटो कॅड, design चे सॉफ्टवेअर चालवायचे असतील तर ग्राफिक्स कार्ड laptop मध्ये  असावे। 
पण असा लॅपटॉप किमान 60,000 च्या पुढेच राहील।
उत्तर लिहिले · 6/10/2021
कर्म · 15400
9
हल्ली बाजारात टॅब्लेट-फॅब्लेटची चलती असल्याने इतर गॅजेट्सच्या तुलनेत टॅब्लेटला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र कॉम्प्युटिंग डिव्हाइस असलेले लॅपटॉप खरेदी करण्यास आजही तितकीच पसंती दिली जाते. टॅब्लेटच्या तुलनेत लॅपटॉपला की-बोर्ड, डीव्हीडी ड्राइव्हची सोय असल्याने अधिक सोयीने काम करता येतं. तसेच व्हिडीओ एडिटिंग, अ‍ॅनिमेटेड प्रेझेंटेशन बनवणे, दर्जादार ग्राफिक्स असलेले गेम्स खेळणे यासारख्या विविध गोष्टी ज्या टॅब्लेटवर शक्य होत नाहीत, त्या लॅपटॉपवर शक्य होतात. परंतु बाजारात उपलब्ध असलेले लॅपटॉपचे प्रकार, आकार, किमती पाहता नेमका कोणता आणि कसा लॅपटॉप घ्यायचा, हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असणार. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी या काही महत्त्वाच्या बाबी नक्की तपासा.

लॅपटॉपची स्क्रीन साइज : लॅपटॉपची स्क्रीन साइज विविध आकारांमध्ये उपलब्ध असून, ८-इंची अल्ट्रा पोर्टेबल नेटबुक ते १९ इंच स्क्रीन असलेले लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. परंतु १५.६ इंच स्क्रीन ही लॅपटॉपची स्टँडर्ड साइज आहे. जर तुम्ही डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपचा वापर करणार असाल, तर मोठी स्क्रीन साइज असलेला लॅपटॉप घ्यावा. पण जर तुम्ही तो तुमच्यासोबत कॅरी करणार असाल तर १५ इंच स्क्रीन असलेला लॅपटॉप अधिक सोयीचा ठरेल.

मॅट की ग्लॉसी : सध्या बाजारात येणार्‍या बहुसंख्य लॅपटॉप्सची स्क्रीन ही ग्लॉसी असते. पण तुम्ही लॅपटॉपचा वापर घराच्या बाहेर अधिक करणार असाल तर मॅट स्क्रीन कमी रिफ्लेक्ट होते व सूर्यप्रकाशात देखील डोळ्यांना त्याचा जास्त त्रास होत नाही.

लॅपटॉपचे वजन : ऑफिसला जाताना तुम्हाला लॅपटॉप सोबत घेऊन जावा लागणार असेल, तर अशावेळी लॅपटॉपचे वजनदेखील एक महत्त्वाची बाब ठरते. १५ ते १६ इंच स्क्रीन साइज असलेल्या लॅपटॉपचे वजन साधारण २ ते ३ किलो इतके असते, तर काही लॅपटॉपचे वजन एक किलो ते सहा किलो इतके असते. पण जर तुम्हाला हलक्या वजनाचा लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागेल.

बॅटरीचे आयुष्य : लॅपटॉप म्हटलं की आपण एकाच वेळी विविध अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करणर हे साहजिक आहे. पण त्यासाठी उत्तम बॅटरी बॅक-अपचीदेखील आवश्यकता आहे. मात्र अनेक लॅपटॉपची बॅटरी केवळ दोन-तीन तास चालते. जर तुम्ही ऑन द गो, रेल्वेत किंवा कारमध्ये प्रवास करताना लॅपटॉपवर काम करणार असाल, तर अशा लॅपटॉपची निवड करा की ज्याद्वारे किमान ४ ते ६ तासांचा बॅटरी बॅक अप मिळेल.

लॅपटॉपची हार्ड ड्राइव्ह : तुमचा सगळा डेटा हा तुमच्या हार्ड डाइव्हमध्ये सेव्ह होतो. त्यामुळे गरजेनुसार हार्ड डिस्कची निवड करा. स्टँडर्ड लॅपटॉपमध्ये १६0 ते ५00 जीबीची हार्ड डिस्क दिली जाते. जर तुम्ही व्हिडीओ, गेम्स या गोष्टी लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करणार नसाल तर १६0 जीबीची हार्ड डिस्क तुमच्यासाठी पुरेशी ठरू शकते. शक्यतो एसएसडी किंवा साटा कंपनीची हार्ड ड्राइव्ह घ्यावी. परंतु साटाच्या तुलनेत एसएसडीची किंमत जास्त असल्याने गरजेनुसार मेन हार्ड ड्राइव्ह साटाची घेऊन रिबुटिंगसाठी ६४ जीबीचे एसएसडी ड्राइव्ह घेऊ शकता.

सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह : स्टँडर्ड साइजच्या सर्वच लॅपटॉपमध्ये सीडी/डीव्हीडी ड्राइव्ह दिलेला असतो. परंतु लहान आकाराच्या लॅपटॉपमध्ये (नोटबुकमध्ये) ही सुविधा नसते. अशावेळी तुम्ही एक्स्टर्नल डीव्हीडी ड्राइव्ह खरेद करू शकता.


रॅम : रॅम – (रॅन्डम अँक्सेस मेमरी) कॉम्प्युटर – लॅपटॉपची रॅम ही जीबीमध्ये असते व तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा स्पीडदेखील त्यावर अवलंबून असतो. लॅपटॉपच्या लेटेस्ट मॉडेलमध्ये किमान दोन जीबीची रॅम दिली जाते. परंतु जर तुम्ही व्हिडीओ एडिटिंग किंवा ग्राफिकल वर्क करणार असाल, तर किमान ४ जीबीची रॅम बसवून घ्या.

अँटिव्हायरस इन्स्टॉलेशन : नवीन लॅपटॉप विकत घेतल्यावर आपल्याला त्यामध्ये अँटिव्हायरस इन्स्टॉल करून मिळतो. परंतु त्याचा कालावधी फार नसतो. त्यामुळे दोन महिन्यांमध्ये तो एक्स्पायर होऊ शकतो. लॅपटॉपला कोणत्याही व्हायरसमुळे धोका निर्माण होऊ नये, यासाठी अँटिव्हायरस इन्स्टॉल करणे खूप गरजेचे आहे. बाजारात विविध प्रकारचे अँटिव्हायरस उपलब्ध असून, त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे अँटिव्हायरसचा कालावधी एक वर्षाचा असतो. त्यानंतर एकतर नवीन इन्स्टॉलेशन घ्यावे किंवा तेच अँटिव्हायरस अपडेट करावे. पण तुम्ही विंडोज-८ वापरत असाल तर तुम्हाला अँटिव्हायरस घेण्याची गरज नाही. कारण त्यामध्ये ‘विंडोज डिफेंडर’ हे इन बिल्ट अँटिव्हायरस देण्यात आले असून, ते अपडेट होत राहतं अन्यथा तुम्ही नेट प्रोटेक्टर किंवा क्विक हिल यासारखे अँटिव्हायरस वापरू शकता.

वॉरंटी अ‍ॅण्ड गॅरंटी: नवीन लॅपटॉप खरेदी केल्यावर कंपनीकडून एक किंवा दोन वर्षांची ‘बेस-टू-बेस’ वॉरंटी दिली जाते. त्यामुळे जर तुमच्या लॅपटॉपमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्याची दुरुस्ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून करून दिली जाते. शक्यतो वॉरंटीच्या कालावधीत लॅपटॉपमध्ये फारसा बिघाड होत नाही. किंबहुना जर तुमचा वापर व्यवस्थित असेल, तर दीर्घकाळ तुम्हाला दुसरा लॅपटॉप घेण्याची गरज भासणार नाही. तसेच काही ब्रँड अ‍ॅक्सिडेंटल क व्हरेज देखील देतात. त्यामुळे इन्श्युरन्सचे नियम आणि अटी तपासून घ्या.

फ्लॅश कॅचे : अल्ट्राबुक व काही इतर नोटबुक्समध्ये ८, १६ जीबी कॅचे मेमरी मिळते. परंतु ३२ जीबी मेमरी असल्यास त्याचा फायदा तुमच्या कॉम्प्युटरवरील परफॉर्मन्सवर होऊ शकतो.

डिस्प्ले : जेवढय़ा जास्त पिक्सेलची स्क्रीन तेवढय़ा चांगल्या प्रकारे तुम्हाला स्क्रीन वील कन्टेन्ट बघता येईल. बरेच मेन स्ट्रीम नोटबुक १३६६ – ७६८ या पिक्सेल रेझोल्युशनमध्ये येतात. पण जर तुमचे पर्याय खुले असतील आणि बजेट असेल तर १६00-९0 किंवा १९२0 -१0८0 या रेझोल्युशनचे लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमच्या डिस्प्लेचे रेझोल्युशन चांगले असेल तर वेब पेजेस, चित्रपट बघण्याचा अधिक चांगला अनुभव मिळेल.

ग्राफिक्स कार्ड : जर केवळ रोजच्या वापरासाठी लॅपटॉप घेणार असाल तर तुम्हाला एक जीबी ग्राफिक्स कार्ड पुरेसे आहे. परंतु, जर तुम्ही गेम्स, विशेषत: जीटीएसारखे गेम्स खेळणार असाल तर दोन जीबीचे ग्राफिक्स कार्ड घ्यावे. एनव्हीडी किंवा एटीआय या कंपन्यांचे ग्राफिक्स कार्ड तुम्ही घेऊ शकता.

की-बोर्ड : बर्‍याचदा आपल्याला डेस्कटॉप कॉम्प्युटरची सवय असते. त्यामुळे लॅपटॉप घेताना लॅपटॉपचा की-बोर्ड हाताळून पाहावा. प्रत्येक लॅपटॉपचा की-बोर्ड वेगळा असतो. काही लॅपटॉपच्या की खूप जवळ असतात, तर काहींच्या छोट्या, नाजूक आणि बारीक असतात. जर की-बोर्ड व्यवस्थित हाताळता येत नसेल तर महागातला लॅपटॉप घेऊनही तो वापरण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टीम: ऑपरेटिंग सिस्टीम हा खूप महत्त्वाचा भाग असून तुमच्या लॅपटॉपचा इंटरफेसदेखील त्यावर अवलंबून असतो. गरजेनुसार, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स यापैकी एका ऑपरेटिंग सिस्टीमचा लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही व्यावसायिक कामांसाठी लॅपटॉप घेत असाल तर विंडोज घेण्यास हरकत नाही. पण, जर तुम्ही प्रोग्रामिंगसाठी त्याचा अधिक वापर करणार असाल, तर लिनक्सला प्राधान्य द्यावे.

प्रोसेसर: जर तुम्ही नोटबुक घेणार असाल तर अँटम किंवा डुअल कोर यापैकी एका प्रोसेसरची तुम्ही निवड करू शकता. पण जर हायर रेंडरिंगसाठी किंवा ग्राफिकल वर्कसाठी थर्ड जनरेशनचे आय- ३, ५, ७ इंटेल किंवा एएमडी या प्रोसेसरची निवड करता येईल.


उत्तर लिहिले · 23/2/2019
कर्म · 55350
9
हो करू शकता. दुसरं नॅनो रिसीव्हर त्याच कंपनीचं आणि त्या मॉडेलशी सुसंगत असल्याची खात्री करून घ्या.
किंवा बाजारात युनिव्हर्सल रिसिव्हर देखील मिळतात, जे सर्व माउस किंवा कीबोर्ड साठी चालतात. तेदेखील तुम्ही वापरू शकता.
महत्वाचे म्हणजे तुमच्या माउस च्या मॉडेलनुसार रिसिव्हर घ्या, नक्की चालेल.
उत्तर लिहिले · 22/1/2019
कर्म · 282915
4
हॅलो, सर्वांना
तुमचा लॅपटॉप चा प्रोसेसर लेटेस्ट असणे गरजे चा आहे तसेच लॅपटॉप मध्ये ssd असेल तर आणखीन फरक पडतो,तसेच आपला प्रोसेसर जरी ऍडव्हान्स असला तरी आपल्याला स्पीड भेटत नाही बरोबर या साठी आपण लॅपटॉप मध्ये स्टँडर्ड अँटी वायरस असणे गरजे चा आहे तसेच लॅपटॉप मध्ये अनवॉन्टेड फाइल्स वेळो वेळी डिलिट केल्या पाहिजे त्या साठी ही command वापरून आपण junk फाईल रेमोव्ह करू शकतो =रन=type cleanmgr=ok यात आपल्या जंक फाईल क्लिअर करू शकता.

उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 90