2 उत्तरे
2 answers

जळवावर उपाय काय?

2
जळवात-

हाता-पायांना पडलेल्या भेगा लपविण्यापेक्षा त्यावर उपचार करून त्या बर्‍या करणे केव्हाही चांगले असते. दूरदर्शनवरील जाहिरातीतून भेगा बुजविणार्‍या अनेक मलमांविषयी सातत्याने दाखविले जात असते. ही मलमे उपयुक्त असतातही. पण ती महागही असतात. शिवाय ती कायम वापरणे गरजेचे असते. घरात कायम ठेवता येणारे, तुलनेते स्वस्त आणि कोणताही अपाय न करणारे कोकम तेल या मलमांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करते. असेच त्वचा रोगावरील आणखी कांही उपचार याप्रमाणे –

१) जळवातˆ हातापायांच्या भेगा – जळवात बर्‍याच वेळा उग्ररूप धारण करतो. कंड, तळहात, तळपायाची कातडी निघणे काही वेळा रक्त येणे असेही प्रकार आढळतात. त्यावर कोकमतेल गरम करून हळूवारपणे टाचेला, तळहातांना लावावे. हाता-पायाच्या भेगातही कोकम तेल भरावे, त्याने जळवात कमी होतो.

२) नायटा – हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे. नायटा झालेल्या जागेवर कडुनिंबाचे तेल व करंज तेल चोळून लावल्याने नायटा बरा होण्यास मदत होते. कडुनिंबाचे तेल व करंज तेल काष्ठौषधीच्या दुकानात मिळते.

३) इसब -ˆ बर्‍याच जणांना इसबाचा त्रास होतो. इसब हा खरेतर न बरा होणारा रोग आहे. मात्र योग्य उपचारांनी तो आवाक्यात ठेवता येतो. एरंडेल तेल ४ भाग व १ भाग करंज तेल एकत्र करून इसब असलेल्या जागी लावावे. साबण अजिबात वापरू नये.

४) खरूज -ˆ या त्वचारोगावरही कडूनिंब तेल अथवा करंज तेल चोळून लावावे.

५) गळूˆ – बर्‍याच वेळा सांध्याच्या ठिकाणी अथवा काख, मान, जांघ वा अन्य ठिकाणीही गळू होते. गळू पिकून फुटेपर्यंत तेथे ठणका जाणवतो. या गळूवर शेपूची भाजी ठेचून बांधावी. त्याने गळू लवकर फुटते. तसेच शेंदूर व अंडयाचा पांढरा बलक एकत्र खलून लेप घातल्याने ही गळू लवकर फुटतेच, त्याचा संसर्ग अन्यत्र पसरण्यासही आळा बसतो.

६) बोटाच्या बेचक्यातील चिखल्याˆ – सतत पाण्यात काम करणार्‍यांना अथवा पावसाळयाच्या दिवसात पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होतात. २० ग्रॅम एरंडेल व ५ ग्रॅम करंज तेल एकत्र करून लावल्यास चिखल्या बर्‍या होतात. (३ चमचे एरंडेल अधिक १ चमचा करंज तेल.)

उत्तर लिहिले · 2/2/2019
कर्म · 4045
0
जळवांवर उपाय अनेक आहेत, ते खालीलप्रमाणे:
  1. नैसर्गिक उपाय:
    • मीठ: जळवांना मीठ लावल्यास त्या मरून जातात.

    • हळद: हळद लावल्याने जळवा लगेच गळून पडतात.

    • व्हिनेगर: व्हिनेगर लावल्याने जळवा सुटतात.

    • लिंबू: लिंबाचा रस लावल्यासही जळवा मरतात.

  2. रासायनिक उपाय:
    • जळवा मारण्यासाठी बाजारात विशिष्ट स्प्रे मिळतात, ते वापरले जाऊ शकतात.

  3. प्रतिबंधात्मक उपाय:
    • जळवा असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.

    • शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे वापरा.

    • जंगलात किंवा तलावाजवळ जाताना मीठ किंवा तुरटीचा वापर करा.

इतर माहिती:

जळू चावल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो, त्यामुळे घाबरू नका. जखम स्वच्छ धुवून घ्या आणि आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 840

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
मोतीबिंदूवर घरगुती उपचार कोणता करता येईल?
अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न कराल?
डांग्या खोकला कसा बरा होईल?
कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो?
रेबीज या आजाराची लस कोणी तयार केली?
गुडघेदुखी थांबवण्यासाठी कोणत्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात?