अध्यात्म देव

देव आहे का? आहे तर कोठे आहे आणि दिस का नाही?

4 उत्तरे
4 answers

देव आहे का? आहे तर कोठे आहे आणि दिस का नाही?

11
देव कुठे नाहीए? देव सर्वत्र आहे.प्रत्येक सजीवात,स्रुष्टीत,चराचरात देव आहे.देव तेव्हाच दिसतो जेव्हा तो अनुभवला जातो.आणी तो तेव्हाच अनुभवला जातो जेव्हा त्याच्या अस्तित्त्वाची जाणीव होते.आणी जाणीव तेव्हाच होते जेव्हा मनात श्रद्धा असते.जेव्हा मला कोणी अचानक मदतीला धावून येतो तेव्हा मी म्हणतो देवासारखा धावून आलास.म्हणजे मी मला मदत करणाऱ्यित देव अनुभवला.इणी अनुभवला म्हणून मला त्याच्यात देव दिसला".देव नाही मंदिरात,देव आहे हरू्दयात."देवळात देवाची मूर्ती अशासाठी ठेवतात की सर्वसामान्य माणसाला देव डोळ्याने दिसत नाही म्हणून देवाचे रूप दिसावे व त्या रुपाकडे बघून मनाला शांतता लाभावी म्हणून.मानला तर देव नाहीतर दगड.पण या दगडातूनही देवाचे दर्शन होते.देव सांगून येत नाही.तो अचानक समोर येऊन उभा रहातो.म्हणूनच एकादी व्यक्ती अचानक आपल्या समोर येते तेव्हा आपण म्हणतो "अगदी देवासारखा हजर झालास.अगदी दत्तासारखा येऊन उभा राहीलास'.ज्याप्रमाणे हरिणीला तिच्या नाभीतील कस्तूरीची जाणीव नसते त्याप्रमाणे माणसालाही (अज्ञानामुळे) स्वत:तील देवाच्या अस्तित्त्वाची जाणीव नसते.रामभक्त हनुमानाला त्याच्या हरूदयातील रामाची जाणीव होती.म्हणूनच तो स्वत:ची छाती फाडून रामाचे त्याच्या हरूदयातील अस्तित्त्व दाखवू शकला.माणूस व देव यांत द्वैत नाही हे फक्त साधूसंतच दाखवू शकतात।
उत्तर लिहिले · 4/3/2018
कर्म · 91065
3
खर सांगतो तुम्हाला तुम्ही विश्वास करा अथवा नको करा एक ही गोष्ट खोटी नाही सांगणार... मी देवाला नाही पाहीलं पण माणसातल्या देवाला मी नक्की पाहीलो..
आणि दुसरी गोष्ट खरचं देव आहे तो मी नाही पाहीला आहे पण मी देवाला अनुभवला आहे.. त्यानुसार देव आहे आणि खरच आहे..
मी साक्षात देवाला अनुभवलेला आहे.. आणि भुताला पण उघड्या डोळ्याने पाहीलं आहे...
उत्तर लिहिले · 4/3/2018
कर्म · 1700
0

देव आहे का? हा एक कठीण प्रश्न आहे ज्याचे उत्तर देणे सोपे नाही. या प्रश्नावर अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ आणि सामान्य माणसांनी अनेक विचार आणि तर्क दिलेले आहेत.

काही लोकांचा असा विश्वास आहे की देव आहे. ते म्हणतात की देव ही एक शक्ती आहे जी या विश्वाची निर्मिती आणि नियंत्रण करते. ते देवावर श्रद्धा ठेवतात आणि प्रार्थना, उपासना आणि धार्मिक विधींद्वारे त्याच्याशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न करतात.

काही लोकांचा असा विश्वास आहे की देव नाही. ते म्हणतात की देव ही केवळ एक कल्पना आहे, जी माणसांनी तयार केली आहे. ते विज्ञानावर विश्वास ठेवतात आणि जगातील घटनांचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्टिकोनातून देतात.

आता, जर देव असेल तर तो कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर देणेही कठीण आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की देव स्वर्गात आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की तो आपल्या आजूबाजूला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की देव आपल्या हृदयात आहे.

देव आपल्याला दिसत का नाही? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की देव निराकार आहे. त्याला कोणताही आकार नाही. तो केवळ एक शक्ती आहे, जी आपल्याला जाणवते.

अखेरीस, देव आहे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून असते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक पाहू शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 860

Related Questions

जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
स्वर्गात जागा बुक करणार्‍या व्यवसायाबद्दल माहिती द्या?
'माणूस मिथ्य सोने सत्य' याचा काय अर्थ होतो?
समाजात व प्रपंचात वावरताना देवाचे आचरण करावे कि गुरूचे आचरण करावे?
सापेक्ष आर्द्रता या संज्ञेची व्याख्या लिहा.
गुरू करणे का गरजेचे असते?