कुतूहल पहिलवान

WWE मॅचेस खऱ्या असतात का ?

2 उत्तरे
2 answers

WWE मॅचेस खऱ्या असतात का ?

28
तुमच्यापैकी बहुतेक तरुणांना डब्लूडब्लूइ (World Wrestling Entertainment) हा शो आवडत असेलच, कारण जगातील आणि आपल्या भारतातील कितीतरी तरुण मंडळी या शोचे खूप मोठे चाहते आहेत. ते पण छोटे – मोठे चाहते नाहीतर, खूप मोठे चाहते. पण हा डब्लूडब्लूइ शो जो आपण एवढ्या उत्साहाने बघतो, तो खरच तेवढा चांगला आहे का ? त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या मारामाऱ्या खरंच खऱ्या असतात का ?

डब्लूडब्लूइ हा शो एक मनोरंजनाच कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. डब्लूडब्लूइ या शोला कोणत्याही प्रकारच्या खेळाचा दर्जा देण्यात आलेला नाही आहे. तो फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यातील रेस्लरना खेळाडूंचा दर्जा देण्यात येत नाही. सोमवारी रात्री डब्लूडब्लूइचा रॉ हा शो असतो, मंगळवारी स्मॅक डाऊन हा शो असतो. या दोन शोमधील प्रत्येक सामने हे खूप रंजक असतात.

कधी – कधी तर असे काहीतरी या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये घडते ज्याची कधीही आपण अपेक्षा केलेली नसते.

कधी दोन रेसलरची मॅच चालू असताना तिसरा रेसलर तिथे येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांची मॅच तिथेच संपते. असे कितीतरी वेळा होते, जे आपल्यासाठी आश्चर्यकारक असते. असे अनेक प्रसंग तुम्ही देखील या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये पाहिले असतील. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, डब्लूडब्लूइ हा शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असतो. त्याच्यामधील बहुतेक गोष्टी खऱ्या नसतात. एवढेच काय, तर हे डब्लूडब्लूइचे सुपरस्टार्स जी फाईट करतात ती देखील खोटी असते.

या डब्लूडब्लूइच्या सुपरस्टार्सनी यासाठी योग्य तो सराव केलेला असतो आणि हे वेल ट्रेन असतात. त्यामुळे ते प्रत्येक मूव्ह योग्यप्रकारे करतात. प्रत्येक सामना कोण जिंकणार आहे, हे पहिलेच ठरलेले असते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना देखील काही प्रमाणात याबद्दलची माहिती असते.

या सुपरस्टार्सच्या डोक्यातून किंवा शरीरामधून येणारे रक्त देखील खोटे असते. यासाठी हे सुपरस्टार्स ब्लड कॅप्सूलचा वापर करतात. त्यांच्या मूव्ह्स एवढ्या व्यवस्थित असतात की, असे वाटते, ते खरच एकमेकांना खूप मारत आहेत. पण ते एकप्रकारचा अभिनय आपल्या समोर सादर करत असतात.

खूप कमी मॅच आहेत, ज्या स्क्रिप्टेड नसतात. त्यातीलच एक म्हणजे डेड मॅन म्हणजेच द अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांच्यामध्ये झालेला रेस्लेमेनियाचा सामना. यामध्ये काय होणार आहे, हे पंचाला देखील माहित नव्हते. त्याला एवढेच सांगितले होते की, प्रत्येकवेळी तीन काउंट करायचे आणि तसेच त्याने केले.

कधी – कधी हे पंच सुपरस्टार्स पुढची मूव्ह विसरल्यास त्यांच्या जवळ जाऊन त्यांना त्याची आठवण करून देतात. ते त्यांची विचारपूस करत असल्याचे लोकांना भासवत असतात. ते एकतर पुढे काय करायचे ते सांगतात किंवा काही बॅक स्टेजमधून महत्त्वाचा संदेश अचानक आला तर तो सांगितला जातो. एका मॅचमध्ये रोमन रिंग्सला कोमेंट्री करणार्याने ब्लड कॅप्सूल दिली होती.

असा हा तरुणांचा आवडता डब्लूडब्लूइ शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असतो. डब्लूडब्लूइच काय तर इतरही बहुतेक शो हे स्क्रिप्टेड असतात, पण बघताना लोकांना ते खरोखरच असे होत आहे असे वाटते. युट्युबवर देखील तुम्हाला याबद्दलच्या कितीतरी व्हिडीओज पाहायला मिळतील.

त्यामुळे या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका असेही शोच्या दरम्यान सांगितले जाते. या फाईट पाहणे मनोरंजक असते यात शंका नाही. पण त्या घरी करून पाहणे धोकादायक असते हेही लक्षात ठेवले पाहिजे.

धन्यवाद😊😊
उत्तर लिहिले · 23/3/2018
कर्म · 21615
3
नाही WWE हे पूर्णपने Scripted असत अगदी आपल्या Movies सारखं...

यात सर्व काही आधीच ठरलेल असत की कोण जिंकेल अणि हरेल...
उत्तर लिहिले · 22/5/2017
कर्म · 705

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
माझा मुलगा इयत्ता ६वी आहे त्याला कबड्डी व कुस्ती ची खुपच आवड आहे. माझी परिस्थिती अगदी साधारण आहे तरी पण मला शिक्षणासोबतच त्याचे ध्येय पुर्ण करण्याची ईच्छा आहे, मला योग्य मार्गदर्शन मिळेल का ?
wwe wrestler undertaker आणि kane चे नाते?
मी कुस्ती करतो म्हणजे पैलवान आहे आणि आमच्या गावातील राजकारण करतो मी आता आमच्या गावचा उपसरपंच आहे आणि दोन्ही कुस्ती आणी राजकारण आवडते आणि ते दोन्ही पण मला करायचे आहेत ,राजकारण करायचे म्हणजे वेळ लागतो त्यामुळे माझे पर्सनल गेम कडे दुर्लक्ष आहे ,त्यामुळे फार टेशन मध्ये आहे ?
मला Wrestling शिकायचे आहे माझे वय २२ वर्षे आहे मी wrestling मध्ये करिअर करू शकेन काय ?