Topic icon

पहिलवान

3
तुमचा मुलगा आत्ता सहावीत आहे.म्हणजे मोठ्या कबडीस्पर्धेत किवा कुस्तीस्पर्धेत भाग घेण्यासाठी लहानच आहे.त्याची शाळा संपायलाही अजून चार वर्षे बाकी आहेत.तोपर्यत शाळेतिल PT च्या शिक्षकांना त्याला कबडीत मार्गदर्शन करण्याची विनंती करा .तसेच त्याला एकाद्या सार्वजनिक व्यायामशाळेत/तालमीत ( तुम्हाला खाजगी व्यायामशाळेची/तालमीची फी देणे कठीण जाईल म्हणून) दाखल करा.त्याला आवड असल्याने तो या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आत्मसात करेल.पण भविष्याच्या द्रुष्टीने त्याच्या खुराकाकडे मात्र तुम्ही लक्ष ठेवायला पाहीजे ( व तसे लक्ष तुम्ही ठेवालच).मोठ्या स्पर्धेत त्याने भाग घेण्यापूर्वी त्याला या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेउ द्या म्हणजे तो प्राविण्य मिळवून मोठ्या स्पर्धांमधे भाग घेऊ शकेल.एकदा का त्याचे नाव झाले तर त्याला sponsor करण्यासाठी कोणीना कोणी पुढे येईलच.
उत्तर लिहिले · 22/2/2018
कर्म · 91070
2
Undertaker आनी kane रियल लाइफमधे दोघेही चांगले मित्र असुन एकमेकांचा खुप respect करतात. WWE ची storyline आहे कि ते भाऊ आहे पन तस काहिही नाही
उत्तर लिहिले · 23/1/2018
कर्म · 26370
9
दादा,
मला वाटत दोन्हीही गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत
तुम्ही तुमच्या कामाचं वेळापत्रक तयार करा
आणि त्याप्रमाणे कामे करा
कुस्तीसाठी काही वेळ राखून ठेवा
जेवढा वेळ तुम्ही कुस्तीसाठी देणार आहात त्यावेळी राजकीय गोष्टी बाजूला ठेवा आणि खेळावर जास्त लक्ष केंद्रित करा

मला आशा आहे माझ्या उत्तराने आपलं समाधान होईल

Best luck
आकाश 😊👍
उत्तर लिहिले · 15/12/2017
कर्म · 8200
3
हा तुमि करिअर करू शकता...पण तुम्ही आता नवीनच रेसलिंग शिकत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल...तुम्ही कोणत्याही एका चांगल्या रेसलिंग टीचर पासून सुरवात करू शकता..व रेसलिंग २ टाईप मध्ये असते त्यामध्ये तुम्ही कोणती चॉईस करणार त्यावर अवलंबून आहे.
उत्तर लिहिले · 13/8/2017
कर्म · 60
28
तुमच्यापैकी बहुतेक तरुणांना डब्लूडब्लूइ (World Wrestling Entertainment) हा शो आवडत असेलच, कारण जगातील आणि आपल्या भारतातील कितीतरी तरुण मंडळी या शोचे खूप मोठे चाहते आहेत. ते पण छोटे – मोठे चाहते नाहीतर, खूप मोठे चाहते. पण हा डब्लूडब्लूइ शो जो आपण एवढ्या उत्साहाने बघतो, तो खरच तेवढा चांगला आहे का ? त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या मारामाऱ्या खरंच खऱ्या असतात का ?

डब्लूडब्लूइ हा शो एक मनोरंजनाच कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. डब्लूडब्लूइ या शोला कोणत्याही प्रकारच्या खेळाचा दर्जा देण्यात आलेला नाही आहे. तो फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यातील रेस्लरना खेळाडूंचा दर्जा देण्यात येत नाही. सोमवारी रात्री डब्लूडब्लूइचा रॉ हा शो असतो, मंगळवारी स्मॅक डाऊन हा शो असतो. या दोन शोमधील प्रत्येक सामने हे खूप रंजक असतात.

कधी – कधी तर असे काहीतरी या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये घडते ज्याची कधीही आपण अपेक्षा केलेली नसते.

कधी दोन रेसलरची मॅच चालू असताना तिसरा रेसलर तिथे येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांची मॅच तिथेच संपते. असे कितीतरी वेळा होते, जे आपल्यासाठी आश्चर्यकारक असते. असे अनेक प्रसंग तुम्ही देखील या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये पाहिले असतील. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, डब्लूडब्लूइ हा शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असतो. त्याच्यामधील बहुतेक गोष्टी खऱ्या नसतात. एवढेच काय, तर हे डब्लूडब्लूइचे सुपरस्टार्स जी फाईट करतात ती देखील खोटी असते.

या डब्लूडब्लूइच्या सुपरस्टार्सनी यासाठी योग्य तो सराव केलेला असतो आणि हे वेल ट्रेन असतात. त्यामुळे ते प्रत्येक मूव्ह योग्यप्रकारे करतात. प्रत्येक सामना कोण जिंकणार आहे, हे पहिलेच ठरलेले असते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना देखील काही प्रमाणात याबद्दलची माहिती असते.

या सुपरस्टार्सच्या डोक्यातून किंवा शरीरामधून येणारे रक्त देखील खोटे असते. यासाठी हे सुपरस्टार्स ब्लड कॅप्सूलचा वापर करतात. त्यांच्या मूव्ह्स एवढ्या व्यवस्थित असतात की, असे वाटते, ते खरच एकमेकांना खूप मारत आहेत. पण ते एकप्रकारचा अभिनय आपल्या समोर सादर करत असतात.

खूप कमी मॅच आहेत, ज्या स्क्रिप्टेड नसतात. त्यातीलच एक म्हणजे डेड मॅन म्हणजेच द अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांच्यामध्ये झालेला रेस्लेमेनियाचा सामना. यामध्ये काय होणार आहे, हे पंचाला देखील माहित नव्हते. त्याला एवढेच सांगितले होते की, प्रत्येकवेळी तीन काउंट करायचे आणि तसेच त्याने केले.

कधी – कधी हे पंच सुपरस्टार्स पुढची मूव्ह विसरल्यास त्यांच्या जवळ जाऊन त्यांना त्याची आठवण करून देतात. ते त्यांची विचारपूस करत असल्याचे लोकांना भासवत असतात. ते एकतर पुढे काय करायचे ते सांगतात किंवा काही बॅक स्टेजमधून महत्त्वाचा संदेश अचानक आला तर तो सांगितला जातो. एका मॅचमध्ये रोमन रिंग्सला कोमेंट्री करणार्याने ब्लड कॅप्सूल दिली होती.

असा हा तरुणांचा आवडता डब्लूडब्लूइ शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असतो. डब्लूडब्लूइच काय तर इतरही बहुतेक शो हे स्क्रिप्टेड असतात, पण बघताना लोकांना ते खरोखरच असे होत आहे असे वाटते. युट्युबवर देखील तुम्हाला याबद्दलच्या कितीतरी व्हिडीओज पाहायला मिळतील.

त्यामुळे या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका असेही शोच्या दरम्यान सांगितले जाते. या फाईट पाहणे मनोरंजक असते यात शंका नाही. पण त्या घरी करून पाहणे धोकादायक असते हेही लक्षात ठेवले पाहिजे.

धन्यवाद😊😊
उत्तर लिहिले · 23/3/2018
कर्म · 21615