क्रीडा पहिलवान

माझा मुलगा इयत्ता ६वी आहे त्याला कबड्डी व कुस्ती ची खुपच आवड आहे. माझी परिस्थिती अगदी साधारण आहे तरी पण मला शिक्षणासोबतच त्याचे ध्येय पुर्ण करण्याची ईच्छा आहे, मला योग्य मार्गदर्शन मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

माझा मुलगा इयत्ता ६वी आहे त्याला कबड्डी व कुस्ती ची खुपच आवड आहे. माझी परिस्थिती अगदी साधारण आहे तरी पण मला शिक्षणासोबतच त्याचे ध्येय पुर्ण करण्याची ईच्छा आहे, मला योग्य मार्गदर्शन मिळेल का ?

3
तुमचा मुलगा आत्ता सहावीत आहे.म्हणजे मोठ्या कबडीस्पर्धेत किवा कुस्तीस्पर्धेत भाग घेण्यासाठी लहानच आहे.त्याची शाळा संपायलाही अजून चार वर्षे बाकी आहेत.तोपर्यत शाळेतिल PT च्या शिक्षकांना त्याला कबडीत मार्गदर्शन करण्याची विनंती करा .तसेच त्याला एकाद्या सार्वजनिक व्यायामशाळेत/तालमीत ( तुम्हाला खाजगी व्यायामशाळेची/तालमीची फी देणे कठीण जाईल म्हणून) दाखल करा.त्याला आवड असल्याने तो या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आत्मसात करेल.पण भविष्याच्या द्रुष्टीने त्याच्या खुराकाकडे मात्र तुम्ही लक्ष ठेवायला पाहीजे ( व तसे लक्ष तुम्ही ठेवालच).मोठ्या स्पर्धेत त्याने भाग घेण्यापूर्वी त्याला या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेउ द्या म्हणजे तो प्राविण्य मिळवून मोठ्या स्पर्धांमधे भाग घेऊ शकेल.एकदा का त्याचे नाव झाले तर त्याला sponsor करण्यासाठी कोणीना कोणी पुढे येईलच.
उत्तर लिहिले · 22/2/2018
कर्म · 91070
3
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने राज्यातील खेळ परंपरा, अंत:सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन या क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्याच्या वेगवेगळया भागातील विशिष्ट खेळामधील विजयाची परंपरा व त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सोई सुविधा या बाबींचा विचार करुन प्रत्येक प्रबोधिनीसाठी वेगवेगळे क्रीडा प्रकार निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने दि. ३१ जानेवारी १९९६ रोजी क्रीडापीठाची मुहूर्त मेढ पुणे येथे रोवली व राज्यात ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यांत आल्या.

क्रीडा प्रबोधिनीत निवड करण्यांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, क्रीडा गणवेष इ. वरील खर्च शासनाच्या क्रीडापीठाच्या तरतूदीतून भागविण्यात येतो. सरासरी रु. ७,५००/- दरमहा प्रत्येक खेळाडूवर खर्च करण्यात येतो.

◆उद्देश

आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांमुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करुन आठ ते दहा वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करुन व अदयावत क्रीडा उपकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे हा क्रीडा प्रबोधिनीचा उद्देश आहे.

● भारतीय क्रीडा प्राधिकरण,  .(SAI)या द्वारे प्रतिभावंत खेळाडू घडवण्यासाठी सरकार अनुदान देत असते.....या योजनेचा फायदा घेता येत असेल पहा...
उत्तर लिहिले · 22/2/2018
कर्म · 123520

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
wwe wrestler undertaker आणि kane चे नाते?
मी कुस्ती करतो म्हणजे पैलवान आहे आणि आमच्या गावातील राजकारण करतो मी आता आमच्या गावचा उपसरपंच आहे आणि दोन्ही कुस्ती आणी राजकारण आवडते आणि ते दोन्ही पण मला करायचे आहेत ,राजकारण करायचे म्हणजे वेळ लागतो त्यामुळे माझे पर्सनल गेम कडे दुर्लक्ष आहे ,त्यामुळे फार टेशन मध्ये आहे ?
मला Wrestling शिकायचे आहे माझे वय २२ वर्षे आहे मी wrestling मध्ये करिअर करू शकेन काय ?
WWE मॅचेस खऱ्या असतात का ?