औषधे आणि आरोग्य आरोग्य

माझ्या डोक्याला खूप त्रास होत आहे, त्यावर उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

माझ्या डोक्याला खूप त्रास होत आहे, त्यावर उपाय सांगा?

1
डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...
 
१. लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.   
 
२. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.  
 
३. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.  
 
४. जर तुम्ही वारंवार होणार्‍या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल. 

५.डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे.

६. बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.

७. वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळे डोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.

८. अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.

९. सर्दी अथवा बारीक ताप किवा अंग मोडून येणे यासारख्या आजारातही डोके दुखते. गरम पाण्याच्या पिशवीने डोके शेकून काढल्यास ही डोकेदुखी थांबते. अथवा अमृतांजन किवा तत्सम बाम डोक्यास चोळल्यासही आराम पडतो.

१०.बरेच वेळा जादा वाचन, टिव्ही पाहणे अथवा डोळ्यावर ताण आणणारी कामे झाल्यासही डोके दुखते. अशा वेळी डोळ्यांना चष्मा आला नाही ना याची खात्री करून घ्यावी. डोळ्याला नंबर आल्यानेही डोकेदुखी होते व योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरवात केली की ती बंद होते.

उत्तर लिहिले · 17/11/2016
कर्म · 48240
0
डोकेदुखीसाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • विश्रांती (Rest): शांत ठिकाणी झोपून किंवा बसून आराम करा.
  • पाणी (Water): पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे (Dehydration) डोकेदुखी होऊ शकते.
  • मसाज (Massage): डोक्याला आणि मानेला हलक्या हाताने मसाज करा.
  • गरम किंवा थंड शेक (Hot or Cold compress): डोक्यावर गरम किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवा.
  • औषध (Medicine): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेनकिलर (Painkiller) घ्या.
  • झोप (Sleep): रात्रीची चांगली झोप घ्या.
जर डोकेदुखी वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 840

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
मोतीबिंदूवर घरगुती उपचार कोणता करता येईल?
अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न कराल?
डांग्या खोकला कसा बरा होईल?
कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो?
रेबीज या आजाराची लस कोणी तयार केली?
गुडघेदुखी थांबवण्यासाठी कोणत्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात?