Topic icon

UPSC - केंद्र लोकसेवा आयोग

2
UPSC च्या दोन परीक्षा असतात. एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा.
पूर्व परीक्षेचे शुल्क १०० रुपये आणि मुख्य परीक्षेचे शुल्क २०० रुपये असते.
म्हणजे एकूण तीनशे रुपयांत तुम्ही UPSC परीक्षा देऊ शकता.
पण याव्यतिरिक्त बरेच विद्यार्थी खाजगी शिकवणी लावतात किंवा शहराच्या ठिकाणी अभ्यासाला जातात. त्यासाठी राहण्याचा व शिकवणीचा मिळून दरवर्षी ५० हजार ते १ लाख इतका खर्च येऊ शकतो. हा खर्च तुम्ही कोणत्या शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता त्यावर अवलंबून राहील.
उत्तर लिहिले · 20/11/2021
कर्म · 282745
5
  1. श्रीरामजी किंवा महाग्यानी रावन घडुन गेलेत हे मी पुस्तकातुन जाणुन घेतले कारण पुस्तक लीहणारा लेखक चुकीच्या माहीतीचा प्रसार स्वताच्या लेखणाद्वारे अजीबात करणार नाही पुस्तक हे माणसाच्या आयुष्याला वळण देणार घटक आहे श्रीरामजी आणी महाग्यानी रावन हे घडुन गेल्याचे खुप पुरावे आज अस्तीवात आहेत म्हणजेच श्रीरामजी आणी महाग्यानी रावण काल्पनीक नसुन हे घडुन गेलेले आहेत हे सत्य आहे कारण मी पुरावा बघीतल्याशीवाय कोणत्याही गोष्टीवर वीश्वास ठेवत नाही
उत्तर लिहिले · 31/5/2021
कर्म · 3940
5
MPSC Rajyaseva Book list
श्री. निरंजन कदमसर (तहसीलदार 2019) यांनी सांगितलेली MPSC Book List

Paper First : सामान्य अध्ययन

1) इतिहास :

Ancient/medieval : NCERT/ State board books (old and new both)
Lucent’s किंवा Unique यापैकी कोणतेही एकच पुस्तक वापरावे. फार productive विषय नाही
आधुनिक भारत :ग्रोवर आणि बेल्हेकर (अगोदर वाचलेले असल्यास) किंवा समाधान महाजन यांचे पुस्तक
महाराष्ट्र : अनिल कठारे (जुने छोटे पुस्तक), ११ वी इतिहास.
(पूर्व साठी केवळ ११ वि इतिहास हा पुष्कळ आहे मुख्य साठी कटारे वावावे).
2) भूगोल:

राज्य अभ्यासक्रमावी जुनी १० वी ११ वी वी पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत सोबत नवीन वाचावीत.
NCERT ११वी (दोन्ही पुस्तके) किंवा सवदी सर यांचे “भूगोल-पर्यावरण” पुस्तकातून सिलेक्टिव्ह टॉपिक वाचावेत.
3) पर्यावरण:

तुषार घोरपडे किंवा शंकर IAS यापैकी कोणतेही एक आणि क्रमिक पुस्तके.
4) सामान्य विज्ञान:

स्टेट बोर्ड : नवी पुस्तके महत्वाची (शक्य असल्यास जुनीसुद्धा वाचावी.)
सविन भरके सर (किंवा इतर कोणतेही एकच पुस्तक) : फक्त Highlighted पॉईट्स चा चार्ट करणे.
Lucent’s GK (Only for value addition.)
5) राज्यशास्त्र:

M.लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर कोणतेही एकच Refer करावे.
6) अर्थव्यवस्था:

कोळंबे सर किंवा देसले सर पार्ट-१ (कोणतेही एकच वाचावे, जे वाचलेले असेल ते Continue करावे Updated Edition च वाचावीत)
देसले पार्ट-२ (विकास) यातून केवळ ३ टॉपिक वाचणे विकास विषयक,लोकसंख्या, शाश्वत विकास (महत्वाचे)
7) चालू घडामोडी:

मासिक वाचलेले असल्यासच उजळणी करा अन्यथा सोडून द्या.
कोणतेही एक Compilation वाचावे. (अभिनत, Simplified इत्यादी)
Paper Second (CSAT):

जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविणे
क्लास च्या टेस्ट वेळ लावून सोडविणे
Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी करावी यासाठी
R.S.अग्रवाल/फिरोज पठाण यांची पुस्तके वापरू शकतो.
नियमितता अत्यंत महत्वाची आहे. Comprehension किंवा Maths-Reasoning यातील चांगला जम असणारा भाग निवडून त्यावर प्रभुत्व मिळवा.
परीक्षेतील सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका सोडवितानाचा व्यूहः

Productive Subjects : भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण, यात ५० प्रश्न असतात, त्यापैकी ४० तरी प्रश्न बरोबर यावेत या पद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे.
मर्यादा असणारे विषय : इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी.यात चालू घडामोडी मध्ये मार्क्स मिळू शकतात. बाकी च्या विषयात किमान ५०% मार्क्स मिळविणे हे धेय्य ठेवणे.

Multiple Revisions And Paper Solving Practice Is The Only Key To Success In MPSC

उत्तर लिहिले · 8/2/2021
कर्म · 14895
3
UPSC साठी तुमचे वय २१ वर्षे ते ३२ वर्षांदरम्यान असावे. इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षे आणि अनुसूचित जाती जमातींची ५ वर्षे जास्त सवलत आहे.
उत्तर लिहिले · 24/1/2021
कर्म · 282745
5
UPSC आणि MPSC मधील फरक 

•यूपीएससी ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनशी संबंधित आहे जी स्वराज्य संस्था आहे जे सरकारच्या असंख्य उपविभागांकडे उमेदवार निवडण्यासाठी भारताबाहेर परीक्षांचे व्यवस्थापन करण्याच्या बळावर निवड करते.

•सिव्हील सर्व्हिसेस ही संपूर्णपणे सन्माननीय परीक्षा आहे जी यूपीएससीद्वारे घेतली जाते जी संपूर्ण भारतभरातील उज्ज्वल विद्यार्थ्यांना आकर्षित करते.

•आश्रय आणि लॉबर्सच्या कल्याणासाठी काम करण्याच्या संधीसह सरकारी नोकरीत यशस्वी होण्याची इच्छा असणारे लोक या परीक्षा मोठ्या संख्येने घेतात.

•राज्य पातळीवर घेण्यात आलेले एमपीएससी ही आणखी एक परीक्षा आहे. भारतातील सर्व राज्ये राज्यातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्यायोग्य अर्जदारांचे निर्णय घेण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेतात.

•दोन परीक्षांमधील मुख्य फरक हा आहे की एमपीएससी परीक्षा महाराष्ट्र राज्यात उपस्थित असणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्यात पदप्राप्त असणाऱ्या  अधिकाऱ्यांची निवड करणे आवश्यक असूनही यूपीएससी अर्जदारांची निवड करते ज्यांना असंख्य विभागातील कामे मिळतात. देशातील कोणत्याही क्षेत्रात स्थान प्राप्त करताना केंद्र सरकार.

•जर तुम्ही लॉ विद्यार्थी, अभियंता, डॉक्टर किंवा फक्त एक आर्ट स्टुडंट असाल तर तुम्ही ग्रॅज्युएट असल्यास आणि तुम्ही 21 वर्षे वयाची केल्यास तुम्ही यूपीएससी परीक्षेत भाग घेण्यास योग्य आहात

•जरी एमपीएससीचा हक्क असला तरी आपणास राज्याचे निवासस्थान दाखवावे लागेल. अभ्यासक्रम आणि पॅटर्नकडे लक्ष देऊन, दोन्ही परीक्षा एकदम सारख्या नसतात.

•प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा बाकी आहे ज्यानंतर स्वीकृत अर्जदार मुख्य परीक्षेत भाग घेतात.

•प्राथमिक परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असली तरी मुख्य परीक्षेची निवड तुम्ही निवडलेल्या थीमवर अवलंबून असलेल्या दोन पेपरद्वारे केली जाते. सामान्य अभ्यास पेपर उद्भवते.

•ज्या दरम्यान कोणी इंग्रजी किंवा हिंदी मध्ये पेपर लिहू शकेल, एमपीएससी झाल्यास तुम्हाला मराठी भाषेमध्ये लेखी निवड करण्याचा पर्याय दिला जाईल जो महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे.

•जे मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना वैयक्तिक मुलाखतीत उपस्थित राहण्यास सांगितले जाते.

•मुलाखतीत मिळविलेले गुण लेखी परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये जोडले जातात आणि गुणवत्ता यादी तयार केली जाते जी यशस्वी उमेदवारांची संख्या ठरवते.

•त्यानंतर परीक्षेत त्यांना मिळालेल्या रँकनुसार विविध सेवांसाठी निवडले जाते.

•यूपीएससी उत्तीर्ण झालेले सर्व अधिकारी इयत्ता पहिली श्रेणी मिळवतात, एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची रँक त्यांच्या पदांवर अवलंबून असते. ते श्रेणीच्या आधारावर किंवा वर्ग दुसरा असू शकतो.

•एमपीएससीचा एक फायदा असा आहे की आपण कमी उमेदवारांशी स्पर्धा करीत आहात आणि तेही आपल्या स्वत: च्या राज्यातून, तर यूपीएससीच्या बाबतीत तुम्हाला अखिल भारतीय पातळीवर व्यापक स्पर्धा मिळेल.
उत्तर लिहिले · 21/1/2021
कर्म · 14895
2
UPSC म्हणजे Union Public Service Commission.
मराठीत याला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतात. देशातील प्रशासनास विविध अधिकारी पुरवण्यासाठी लागणारी सर्व निवड प्रक्रिया हा आयोग पाहतो. या निवडप्रक्रियेचा मुख्य भाग आहे त्यांची परीक्षा, जिला आपण सर्व यूपीएससीची परीक्षा म्हणतो.
ही परीक्षा देऊन तुम्ही मंत्रालयातील सचिव यांपासून ते  जिल्हा पातळीवरील अधिकारी ही पदे भूषवू शकता. जितके परिक्षेत अधिक गुण तितके अधिक चांगले पद.

काही पदांची उदाहरणे:
जिल्हाधिकारी,
प्रांत अधिकारी,
सैन्यात अधिकारी,
आणि असे अगणित अधिकारी पदे
उत्तर लिहिले · 11/1/2021
कर्म · 282745
2
१०वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी करू नका. आधी तुम्ही शिक्षणावर भर द्या. सर्व नवीन गोष्टी आत्मसात करा. बुद्धी चौकस ठेवा.
स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सर्व विषयांचे सखोल ज्ञान असायला हवे असते, ते तुम्हाला शिक्षणातून मिळेल.
१०वी ते १२वी सर्व विषय शिकून घ्या, व आत्मसात करा.
फक्त स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचून तुम्ही UPSC व्हाल याची खात्री नाही. त्यामुळे आधी पाया भक्कम करण्यावर भर द्या.
१२ वी झाल्यानंतर पुढे तयारीसाठी प्रयत्न करता येतील.
उत्तर लिहिले · 2/1/2021
कर्म · 282745