MPSC - राज्य लोकसेवा आयोग
UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
परीक्षा
स्पर्धा परीक्षा
पुस्तके
Mpsc book list मिळेल का?
1 उत्तर
1
answers
Mpsc book list मिळेल का?
5
Answer link
MPSC Rajyaseva Book list
श्री. निरंजन कदमसर (तहसीलदार 2019) यांनी सांगितलेली MPSC Book List
Paper First : सामान्य अध्ययन
1) इतिहास :
Ancient/medieval : NCERT/ State board books (old and new both)
Lucent’s किंवा Unique यापैकी कोणतेही एकच पुस्तक वापरावे. फार productive विषय नाही
आधुनिक भारत :ग्रोवर आणि बेल्हेकर (अगोदर वाचलेले असल्यास) किंवा समाधान महाजन यांचे पुस्तक
महाराष्ट्र : अनिल कठारे (जुने छोटे पुस्तक), ११ वी इतिहास.
(पूर्व साठी केवळ ११ वि इतिहास हा पुष्कळ आहे मुख्य साठी कटारे वावावे).
2) भूगोल:
राज्य अभ्यासक्रमावी जुनी १० वी ११ वी वी पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत सोबत नवीन वाचावीत.
NCERT ११वी (दोन्ही पुस्तके) किंवा सवदी सर यांचे “भूगोल-पर्यावरण” पुस्तकातून सिलेक्टिव्ह टॉपिक वाचावेत.
3) पर्यावरण:
तुषार घोरपडे किंवा शंकर IAS यापैकी कोणतेही एक आणि क्रमिक पुस्तके.
4) सामान्य विज्ञान:
स्टेट बोर्ड : नवी पुस्तके महत्वाची (शक्य असल्यास जुनीसुद्धा वाचावी.)
सविन भरके सर (किंवा इतर कोणतेही एकच पुस्तक) : फक्त Highlighted पॉईट्स चा चार्ट करणे.
Lucent’s GK (Only for value addition.)
5) राज्यशास्त्र:
M.लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर कोणतेही एकच Refer करावे.
6) अर्थव्यवस्था:
कोळंबे सर किंवा देसले सर पार्ट-१ (कोणतेही एकच वाचावे, जे वाचलेले असेल ते Continue करावे Updated Edition च वाचावीत)
देसले पार्ट-२ (विकास) यातून केवळ ३ टॉपिक वाचणे विकास विषयक,लोकसंख्या, शाश्वत विकास (महत्वाचे)
7) चालू घडामोडी:
मासिक वाचलेले असल्यासच उजळणी करा अन्यथा सोडून द्या.
कोणतेही एक Compilation वाचावे. (अभिनत, Simplified इत्यादी)
Paper Second (CSAT):
जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविणे
क्लास च्या टेस्ट वेळ लावून सोडविणे
Maths-Reasoning : यातले टॉपिक येत नाही ते शोधून त्यावर नियमित तयारी करावी यासाठी
R.S.अग्रवाल/फिरोज पठाण यांची पुस्तके वापरू शकतो.
नियमितता अत्यंत महत्वाची आहे. Comprehension किंवा Maths-Reasoning यातील चांगला जम असणारा भाग निवडून त्यावर प्रभुत्व मिळवा.
परीक्षेतील सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका सोडवितानाचा व्यूहः
Productive Subjects : भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण, यात ५० प्रश्न असतात, त्यापैकी ४० तरी प्रश्न बरोबर यावेत या पद्धतीने तयारी करणे गरजेचे आहे.
मर्यादा असणारे विषय : इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी.यात चालू घडामोडी मध्ये मार्क्स मिळू शकतात. बाकी च्या विषयात किमान ५०% मार्क्स मिळविणे हे धेय्य ठेवणे.
Multiple Revisions And Paper Solving Practice Is The Only Key To Success In MPSC