पुस्तके
गरोदर स्त्रीने कोणते पुस्तके वाचावे?
1 उत्तर
1
answers
गरोदर स्त्रीने कोणते पुस्तके वाचावे?
0
Answer link
धार्मिक , वैज्ञानिक, महान व्यक्ती चे चरित्र, बाळ संस्कार होतील असे आजूबाजूला वातावरण निर्मिती व स्वतः माता पित्याने प्रसंन्न समाधानी रहावे.
जन्मणारे बाळ हुशार, बुद्धीमान, चाणाक्ष, नितीवान असावे, यासाठी गर्भात असल्यापासून त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे गर्भसंस्कार म्हणून गरोदरपणात आईने चांगली पुस्तके वाचावीत, यासाठी अनेक घरांमध्ये आग्रह धरला जातो. मात्र, चांगल्या गर्भसंस्कारासाठी नेमकी कोणती पुस्तके वाचावी, असा प्रश्न पडतो. बाजारात गरोदरपणात वाचायची पुस्तकेअनेक आहेत. पण, नक्की कोणत्या पुस्तकांमधून आपल्याला चांगली आणि योग्य माहिती मिळेल असाही प्रश्न असतो. काही पुस्तकांविषयी आज आपण जाणून घेऊया, जी गरोदरपणात महिलांनी वाचायला हवीत.
आयुर्वेदीय गर्भ संस्कार
गर्भधारणेची पूर्वतयारी, निरोगी बालकासाठी पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, काय खावे, योगासने, कोणते संगीत ऐकावे, आहारयोजना, दैनंदिन आचरण, बाळाचे संगोपन कसे करावे, बाळ अधिक तेजस्वी आणि बुद्धीमान होण्यासाठी नक्की काय-काय करायला हवे याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. या पुस्तकातील भाषाही अत्यंत सोपी असल्याने अगदी पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलांनाही समजणे सोपे होते. हे पुस्तक किंडल (Kidle) वरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना अगदी बाजारातून घेऊन येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईनही हे पुस्तक वाचता येते. आजपर्यंत हे पुस्तक लाखो मातांना उपयोगी ठरले आहे. त्याची किंमत 700 रुपये इतकी आहे.
संपूर्ण गर्भसंस्कार
मराठीमध्ये मुलांवरील गर्भसंस्कारांवर फारच कमी पुस्तकं आहेत, ज्यामध्ये योग्य माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी संपूर्ण गर्भसंस्कार हे नक्कीच वाचण्याजोगे पुस्तक आहे. प्रतिभा हॅम्प्रस यानी लिहिलेले हे पुस्तक आपल्याला गरोदर काळात नक्की कशी काळजी घेता यावी यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करते. बाळ पोटात असताना नक्की काय काय बदल होतात आणि कशाप्रकारे आपण बाळाशी संवाद साधायला हवा, याची माहिती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाची किंमत 125 रुपये आहे.
आई होताना – डॉ. सीमा चांदेकर
गरोदरपणा म्हटला की आधीच थोडी धाकधूक असते. पहिल्यांदाच होणारं बाळ, त्याची काळजी नीट घेता येईल का, बाळाशी कसं वागायचं, पोटात बाळ असताना नक्की काय काय खायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, बाळाशी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे, इत्यादी गोष्टींची आपल्याला अचूक माहिती हवी असते. कारण, बहुतांशी घरातील, नात्यातील महिला रुढी-परंपरेने चालत आलेल्या गोष्टी सांगत असतात.
‘आई होताना’ या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा सखोल परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक विवाहेच्छू स्त्री पुरुषाने हे पुस्तक वाचले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेताना या पुस्तकाचा अभ्यास करावा. प्रत्येक घरात असावे, असे हे पुस्तक आहे. त्याची किंमत 226 रुपये आहे.
बुद्धिमान बालकाचा जन्म
आपलं बाळ हुशार आणि बुद्धिमान असावं असं कोणाला वाटणार नाही. सगळ्यांनाच आपल्या बाळाने हुशार असावं असं वाटत असतं. त्यासाठी योग्य संस्कार होणंही गरेजेचे आहे. लेखक नाना पाटील यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. या पुस्तकातून तुम्हाला बाळाबद्दलची योग्य माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू शकता. त्याशिवाय याची किंमतही खिशाला परवडण्यासारखी आहे. हे पुस्तक 135 रुपयांना मिळते.
वंशवेल
आपली मुलं जन्मतःच मुकेपणा, बहिरेपणा, मतिमंदत्व यांसारखी काही विकृती घेऊन येऊ नयेत, ती सुदृढ, निरोगी असावीत आणि पुढेही त्यांची चांगली वाढ व्हावी, ती आरोग्यसंपन्न, उत्साही, समंजस, बुद्धिमान व्हावीत, असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्व भावी मातापित्यांनी गर्भधारणेपासून आपले आहार-नियोजन कसे करावे, मुलांच्या जन्मापासून ती वयात येईपर्यंत त्यांच्या आहाराचे नियोजन कसे करावे, यासंबंधी तपशीलवार मार्गदर्शन या पुस्तकात आहारतज्ज्ञ मालती कारवारकर यांनी केले आहे.
डॉ. मालती कारवारकर यांच्या अनुभवातून लिहिले गेलेले हे पुस्तक गर्भवती महिलांसाठी नक्कीच उपयोगी ठरते. आपल्या घरात अगदी सुदृढ आणि निरोगी बाळ जन्माला यावं हे सर्वांनाच वाटत असतं आणि त्यासाठी कोणती योग्य काळजी घ्यायला हवी याचा संपूर्ण आराखडा यामध्ये देण्यात आला आहे. पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे.