2 उत्तरे
2
answers
कलिंगड खरेदी करताना ते लाल आहे हे कसे ओळखावे?
0
Answer link
कलिंगड खरेदी करताना ते लाल आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या:
- कलिंगडाचा आकार आणि वजन: कलिंगड आकाराने गोल आणि वजनाने जड असावे.
- कलिंगडावरील पिवळा डाग: कलिंगडावर जमिनीच्या बाजूला एक पिवळा डाग असतो. तो डाग गडद पिवळा किंवा केशरी रंगाचा असल्यास कलिंगड पिकलेले असते.
- कलिंगडाचा देठ: कलिंगडाचा देठ सुकलेला असावा, देठ हिरवागार नसावा.
- कलिंगडाला वाजवून पाहा: कलिंगडाला हलकेच वाजवून पाहा. जर आवाज खोल आणि स्पष्ट आला तर कलिंगड पिकलेले समजावे.
या काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही चांगले आणि लाल कलिंगड निवडू शकता.
0
Answer link
*🍉 कलिंगड घेताना ते लाल आहे हे कसे आोळखावे*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
कलिंगड विकत घेताना कधीतरी ते आतून अर्धेअधिक पांढरे निघते. तर कधी आतून पिवळसरही असते. अशावेळी कलिंगड विकत घेताना काही गोष्टी या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कलिंगड घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर, कलिंगड घेणे हे अगदी सोपे होईल.
कलिंगड घेताना दोन कलिंगड हातात आळीपाळीने घेऊन बघावे. कलिंगड हाताला जड मजबूत लागला तर तो कलिंगड चांगला आहे असे समजावे.
कलिंगडाची वरची साल पूर्णपणे काळपट हिरवी असायला हवी हे लक्षात ठेवा.
कलिंगडावर थोडासा पिवळसर डाग असेल तर, ते कलिंगड आतून लाल असणार हे नक्की.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫कलिंगड हातात घेऊन सर्वात आधी ठोकून बघावे. कलिंगड आतून पिकलेले असेल तर आवाज येईल. समजा बाहेरून ठोकल्यानंतर आवाज नाही आला तर समजायचे कलिंगड कच्चे आहे.

वजनाला हलके कलिंगड असेल तर ते अजिबात घेऊ नये.
कलिंगड घेताना गोलसर किंवा अंडाकृती आकाराचे कलिंगड निवडावे.
कलिंगड वजनाला हलका लागल्यास तो कलिंगड विकत घेऊ नये.
कलिंगडाला बाहेरुन ठोकल्यावर त्यातून हलका आवाज आला तर तो कलिंगड घेऊ नये.